तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!



tej news

Monday, 4 November 2019

कन्हेरवाडी येथील पै. प्रतिक्षा मुंडे यांची अंतर विद्यापीठातुन हरीयाना साठी निवड



परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  तालुक्यातील मौजे कन्हेरवाडी येथील पैलवान प्रतिक्षा सूर्यकांत मुंडे हिची नुकत्याच झालेल्या निवड चाचणीतून पुणे येथील भारती विद्यापीठातून महिला आंत विद्यापीठासाठी 55 किलो गटातून हरियाणा येथील रोतक याठिकाणी पाच नोव्हेंबर ते 7 नोव्हेंबर या दरम्यान पार पडणाऱ्या भारतातील सर्व विद्यापीठांच्या महिला कुस्ती स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. 

बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ तालुक्यातील मौजे कन्हेरवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते सूर्यकांत मुंडे यांची ही कन्या आहे. पैलवान प्रतिक्षा हिने यापुढेही अशी उत्तम कामगिरी केलेली आहे त्याचा अनुभवातुन पुणे विभागातील पुणे पिंपरी-चिंचवड सातारा सोलापूर या सर्व भागातून प्रथम येण्याचा मान मिळवून भारतातील सर्व विद्यापीठांच्या कुस्ती स्पर्धेसाठी दिनांक 3 नोव्हेंबर रोजी रवाना होत आहे. ती सध्या आंतरराष्ट्रीय पंच प्रा.दिनेश गुंड सर यांच्या जोग महाराज व्यायाम शाळा या ठिकाणी सराव करत आहे त्यांच्या मार्गदर्शनाखालीच तिने आतापर्यंत खाशाबा जाधव शालेय स्पर्धा विद्यापीठ स्पर्धा यांमध्ये उत्तम कामगिरी केली आहे. तिचे या निवडीबद्दल नवनिर्वाचित आ.धनंजय मुंडे व कुस्तीप्रेमी क्रीडा क्षेत्रातील सर्व मान्यवरांनी तिचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी तिला हार्दिक शुभेच्छा दिला.

No comments:

Post a Comment