तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 30 November 2019

महाराष्ट्राच्या महासरकारचे परळी तीनही पक्षांकडून जल्लोषात स्वागत चंदुलाल बियाणी यांच्या वतीने ११ हजार लाडूंचे वाटप

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 
राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेना यांनी मिळून केलेल्या महाविकास आघाडीचा नेत्रदिपक महाशपथविधी सोहळा दि.२८ नोव्हेंबर रोजी शिवतीर्थावर पार पडला. याप्रसंगी आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांच्यासह सहा मंत्र्यांनी पद व गोपनियतेची शपथ घेतली. याप्रसंगाचा आनंदोत्सव परळीत जल्लोषात साजरा करण्यात आला. राजकारणाच्या ईतिहासात राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्र येत परळीत पहिल्यांदाच जल्लोष केला. शहरात सर्वत्र फिरून महापुरूषांच्या पुतळ्यांना अभिवादन व पुष्पहार अर्पण केला तर राणी लक्ष्मीबाई टॉवर येथे फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली.

महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात आल्याचा आनंदोत्सव परळीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने साजरा करण्यात आला. जिल्हा उपाध्यक्ष चंदुलाल बियाणी यांच्या संकल्पनेतून परळीतील नागरीकांना ११ हजार लाडू पाकीटे वाटून तोंड गोड करण्यात आले. गुरूकृपा नगर येथील त्यांच्या संपर्क कार्यालयात हा कार्यक्रम शपथविधी सोहळ्याच्या वेळी म्हणजे सायंकाळी ६ वाजता आयोजित करण्यात आला होता. नव्या सरकारची स्थापना व आ.धनंजय मुंडे यांचा होत असलेला मंत्रीमंडळातील समावेश या दुग्धशर्करा योग साधून हा आनंदोत्सव साजरा करण्यात आला. गुरूवार, दि.२८ नोव्हेंबर रोजी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच राणी लक्ष्मीबाई टॉवर येथे फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली.  यावेळी महाविकास आघाडी सरकारचा विजय असो… स्व.बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो… खा.शरद पवार यांचा विजय असो… सोनियाजी गांधी यांचा विजय असो अशा घोषणा देण्यात आल्या.

परळीत साजरा करण्यात आलेल्या आनंद  सोहळ्याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष चंदुलाल बियाणी, शिवसेनेचे तालुका प्रमुख व्यंकटेश शिंदे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अड.अनिल मुंडे, शहराध्यक्ष बाबु नंबरदार, शिवसेना विद्यार्थी आघाडीचे जिल्हा प्रमुख प्रा.अतुल दुबे, शिवसेना शहर प्रमुख राजेश विभूते, रा.काँ.जेष्ठ नेते केशवभाऊ बळवंत, जिल्हा उपाध्यक्ष सुरेश टाक, अड.जीवनराव देशमुख, चेतन सौंदळे, नगरसेवक शंकर आडेपवार, शकील कुरेशी, अनिल अष्टेकर, विजयप्रकाश लड्डा, रज्जाक कच्छी, माधवराव ताटे, विश्वनाथराव गायकवाड, रमेश भोयटे, विजयप्रसाद अवस्थी, देवेंद्र कासार, पिन्टू सारडा, शम्मोभाई, रमेश चौंडे, महेंद्र रोडे, सुरेंद्र कावरे, सय्यद ईफरोज, गणपत कोरे, शेख निस्सार, गिरीष भोसले, फरकुंद अली आदींसह शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसचे शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.चंदुलाल बियाणी यांनी केले परळीकरांचे तोंड गोड!

महाराष्ट्राचा महाशपथविधी सोहळा व परळीचे विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय लोकप्रतिनिधी धनंजय मुंडे यांचा मंत्रीमंडळात होत असलेल्या समावेशाच्या अनंदात राष्ट्रावादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष चंदुलाल बियाणी यांच्या वतीने शहरातील नागरीकांना ११ हजार लाडूंचे पाकीटे वाटून तोंड गोड करण्यात आले.

No comments:

Post a comment