तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 27 November 2019

विद्युत शॉक लागून महिलेचा मृत्यू, (वरवट बकाल येथील घटना.)संग्रामपूर [ प्रतिनिधी] तालुक्यातील वरवट बकाल येथील 60 वर्षीय महिलेचा विद्युत शॉक लागून जागीच मृत्यू झाल्याची घटना 26 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता घडली. वरवट बकाल ता. संग्रामपूर येथील शोभाताई वसंतराव काकड वय 60 वर्ष ह्या घराजवळ साफसफाई करतांना त्यांच्या हाताला विजेच्या वायरचा शॉक लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती कळताच मुलगा बबलू काकड यांनी विद्युत पुरवठा बंद केला व आईला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे. मृतक शोभाताई काकड यांच्या पश्चात 2 मुले, 1 मुलगी, सुना, नातवंड असा आप्त परिवार आहे.

No comments:

Post a comment