तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 6 November 2019

फक्त घोषणा नको... कृती करा ओला दुष्काळग्रस्त व पूरबाधित विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क व वसतीगृह शुल्क सरसकट माफ करा छात्र भारती विद्यार्थी संघटनेची मागणी


बाळू राऊत प्रतिनिधी 
मुंबई :राज्यात सर्वत्र परतीचा पाऊस लांबल्याने व जोरदार बरसल्याने काढणीला आलेल्या शेतमालाचे प्रचंड नुकसान झालेले आहे. अति पावसामुळे खरिपाची पिके सडून गेली आहेत. दिवाळीत शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकरी प्रचंड अडचणीत आला आहे. या दुष्काळग्रस्त भागातून आलेले अनेक विद्यार्थी मुंबई विद्यापीठात शिकायला आहेत. ऑगस्ट - सप्टेंबर मध्ये सांगली, कोल्हापूर, गडचिरोलीसह कोकणातील जिल्ह्यांमध्ये आलेल्या महापुरामध्ये अनेक संसारे उद्ध्वस्त झाली आहेत. महापुरामुळे शेतकऱ्यांचे अगणित नुकसान झाले आहे. या ओला दुष्काळग्रस्त व पूरबाधित विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क व वसतीगृह शुल्क सरसकट माफ करण्याची मागणी छात्र भारती विद्यार्थी संघटनेने मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु सुहास पेडणेकर यांच्याकडे आज केली. अशीच मागणी राज्यातील सर्व विद्यापीठांचे कुलपती असणाऱ्या महामहीम राज्यपाल यांच्याकडेही छात्र भारतीने निवेदनाद्वारे केली आहे. 
यावेळी कुलगुरुंनी सात दिवसात या प्रश्नावर तोडगा काढून या दुष्काळग्रस्त व पूरबाधित विद्यार्थ्यांना आधार देण्याचे आश्वासन छात्र भारतीच्या कार्यकर्त्यांना दिले. जर सात दिवसात विद्यापीठ प्रशासनाने योग्य तो निर्णय घेतला नाही तर छात्र भारती विद्यापीठा विरोधात तीव्र आंदोलन छेडेल असा इशारा छात्र भारतीचे मुंबई अध्यक्ष रोहीत ढाले यांनी दिला. 
या सर्व ओला दुष्काळग्रस्त व पूरबाधित जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी मुंबई विद्यापीठामध्ये शिकत आहेत. आर्थिक परिस्थितीमुळे शैक्षणिक शुल्क न भरता आल्याने अनेक विद्यार्थ्यांना शिक्षण सोडण्याचा निर्णय घ्यावा लागतो. अशी वेळ कुठल्याही विद्यार्थ्यांवर येऊ नये त्यामुळे यावर तातडीने विचार करुन ओला दुष्काळग्रस्त व पूरबाधित जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष सन २०१९-२० व शैक्षणिक वर्ष सन २०२०-२१ची शैक्षणिक शुल्क व वसतीगृह शुल्क सरसकट माफ करण्याचा निर्णय घ्यावा तसेच संलग्न महाविद्यालयांनी व विद्यापीठाने कोणतेही शुल्क न आकारता प्रवेश द्यावा असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी छात्र भारती मुंबईचे पदाधिकारी सचिन काकड, विकास पटेकर, दिपाली आंब्रे, मोहन गायकवाड, समीर कांबळे, योगिता साळुंखे हे उपस्थित होते. 
अधिक माहितीसाठी संपर्क - रोहित ढाले -8291503650

No comments:

Post a comment