तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 26 November 2019

डॉ बाबासाहेब आंबेडकर पदवीधर संघटनेच्या वतीने संविधान दिन साजराफुलचंद भगत
 वाशिम(प्रतिनिधी) स्थानिक डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ डॉ बाबासाहेब आंबेडकर पदवीधर संघटनेच्या वतीने 70 वा भारतीय संविधान दिन 26 नोव्हेंबर रोजी सकाळी11वाजता उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष संघटनेचे अध्यक्ष मधुकरराव जुमडे होते तर प्रमुख अतिथी जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष ऍड दिलीपराव सरनाईक, पिरिपाचे जिल्हाध्यक्ष दौलतराव हिवराळे,डॉ बाबासाहेब आंबेडकर पदवीधर संघटनेचे अध्यक्ष राजकुमार पडघाण,प्रविण पट्टेबहादूर एस टी पतसंस्थेचे व्यवस्थापक राजीव दारोकार,अंनिसचे पि.एस.खंदारे,डायमंड कोचिंग क्लासचे माधव डोंगरदिवे,युवानेते संतोष इंगळे,सुरेश भालेराव,वानखेडे आदींची उपस्थिती होती.यावेळी सर्वप्रथम उपस्थितांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला हारर्पण करण्यात आले.नंतर पि. एस. खंदारे यांनी उपस्थितांना भारतीय संविधानाच्या प्रस्ताविकेचे वाचन करण्यात आले.या कार्यक्रमाचे संचालन व प्रास्ताविक कार्यक्रमाचे आयोजक राजकुमार पडघाणयांनी केले तर आभार प्रविण पट्टेबहादूर यांनी मानले

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206

No comments:

Post a comment