तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 27 November 2019

खिरोडा येथील शिक्षक भास्कर डोसे राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक

 गुणगौरव शिक्षक रत्न पुरस्कारांने सन्मानीत

संग्रामपुर [ प्रतिनिधी] तालुक्यातील खिरोडा येथील जि.प.म.उ.प्राथमिक शाळेत सहाय्यक शिक्षक म्हणुन कार्यरत भास्कर चिंतामण डोसे यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक गुणगौरव शिक्षकरत्न पुरस्कारांने सन्मानीत करण्यात आले. मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी,मुंबई च्या वतीने नाशिक शहर येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय गुणिजन गौरव महासम्मेलनात सुप्रसिद्ध कीर्तनकार व थोर तत्त्वचिंतक ह.भ.प.श्यामसुंदर महाराज सोन्नर यांचे हस्ते राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक गुणगौरव शिक्षकरत्न पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले सहाय्यक शिक्षक भास्कर डोसे यांनी केलेल्या विद्यार्थिधिष्ठित कार्यांसाठी त्यांना मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी,मुंबईच्या वतीने २०१९ चा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक गुणगौरव शिक्षक रत्न मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. शिक्षक डोसे यांचे सर्वस्तरावरून कौतुक होत आहे

No comments:

Post a comment