तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 8 November 2019

फक्त पैशाने सुख मिळते,ही कल्पना भ्रामक - हभप विजयानंद महाराज आघावपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-         फक्त पैशानेच सुख मिळते ही कल्पना भ्रामक असल्याचे प्रतिपादन हभप भागवताचार्य विजयानंद महाराज आघाव यांनी केले. ते मौजे तळेगाव येथे  कार्तिकी एकादशी निमीत्त आयोजित किर्तन सेवेत बोलत होते.                                               
       याबाबत सविस्तर वृत्त असे की मौजे तळेगाव परळी येथे प्रत्येक एकादशीला हरिकिर्तनाचे आयोजन केले जाते,यातील कार्तिकी एकादशीचे आयोजन वारकरी संप्रदायातील अजातशत्रु वै. आदरणीय हभप निवृत्तीकाका तळेगांवकर यांचे सुपुत्र हभप लक्ष्मणराव तळेगावकर सर यांच्यावतीने करण्यात आले होते. याअंतर्गत हभप निवृत्तीकाकांप्रमाणेच संयमी असणारे भागवताचार्य हभप विजयानंद महाराज आघाव  यांच्या किर्तनाचे आयोजन करण्यात आले होते.या किर्तन सेवेत बोलताना महाराजांनी ऐहिक सुखाच्या संकल्पना स्पष्ट करताना श्रीमद्‍ भगवत गीतेतील तामसी सुख,राजसी सुख,सात्विक सुख याविषयी आलेले निरूपण अभ्यासपूर्ण पद्धतीने केले. तसेच व्यवहारात पैसा म्हणजेच सर्व सुखास कारण आहे,ही जी भ्रामक कल्पना सर्वमान्य होत आहे व ज्यामुळे समाजात भ्रष्टाचार,अनाचार,दहशदवाद आदि अनिष्ट गोष्टी फोफावत आहेत. या गोष्टीमुळे जगाच्या चिंतेत व दू:खात भर पडलेली आहे. पैसा व्यवहारात आवश्यक असेलही परंतू फक्त पैशानेच सुख मिळत असते तर संत तुकोबाराय असे म्हटलेच नसते की,तुमचे येर वित्त धन।ते मज मृत्तीके समाण।।  पैसाच फक्त सुख देऊ शकतो या भ्रामक कल्पनेची प्रखरता कमी झाल्यानेच समाजात शांती व आरोग्य नांदेल असे प्रतिपादन महाराजांनी केले. तसेच वारकरी होऊन भक्तीचा आनंद घ्यायचा असेल तर तुळशीमाळ घालून एकादशी व्रत्त करावे असा उपदेश महाराजांनी केला. 
 किर्तनास मुरलीआण्णा डाबीकर,रामेश्वर महाराज,दत्ता महाराज मांडवेकर,सोपानराव गीत्ते,जगदीश महाराज सोनवणे,आत्माराम मुंडे,सदाशीव मुंडे,आेमप्रकाश मुंडे,हभप संजय महाराज तांबडे,यांच्यासह गावातील व परिसरातील भजनी मंडळींनी साथसंगत केली. किर्तनास उपस्थीतांमध्ये कृषी उत्पन्न बाजार समीतीचे मा.अध्यक्ष सूर्यभान नाना मुंडे,संजय भाऊ मुंडे,राजेभाऊ गुट्टे,हभप तांबडे,हभप नाकाडे महाराज,हभप आण्णासाहेब डॉक्टर यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक श्रोत्यांचा समावेश होता. यावेळी महाराजांनी तळेगावचे नामांकित भजनी हभप निवृत्तीकाकांसोबतच नामांकित गायक हभप आप्पाराव तांबडे,लक्ष्मणतात्या मुंडे यांची आठवण केली. सर्व उपस्थीतांना यावेळी हभप लक्ष्मणराव मुंडे सर व प्रशांत मुंडे सर यांच्या वतीने फलाहार वाटप करण्यात आला.

No comments:

Post a Comment