तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 9 November 2019

ब्रेट लीच्या जीवन पैलूवर एक नजर


               ब्रेट ली म्हंटलं की आपल्या डोळ्यासमोर लांबलचक रन अप घेतलेला सडपातळ देहयष्टीचा उंचा पुरा भन्नाट वेगाने चेंडू फेकणाऱ्या ऑस्ट्रेलियन गोलंदाजाची प्रतिमा उभी राहते. जगात मोजक्या वेगवान गोलंदाजात गणना होणारा ब्रेट ली पाकिस्तानच्या शोएब अख्तर नंतर दुसऱ्या क्रमांकाचा जलदगती गोलंदाज म्हणून गणला जात होता. ४३ वर्षीय ब्रेट लीने आपल्या जीवघेण्या वेगाच्या जोरावर जगभरातील ७०० पेक्षा अधिक फलंदाजांना तंबूत पिटाळले आहे. यामध्ये सचिन तेंडूलकर, राहुल द्रवीड, व्ही व्ही एस लक्ष्मण, ब्रायन लारा, इंझमाम उल हक, कुमार संगकारा, महेला जयवर्धने, अलीस्टर कुक व आदी नामवंत फलंदाजांचा समावेश आहे.
                अशा या दिग्गज गोलंदाजाबद्दल या काही खास गोष्टी.  ब्रेट लीचा जन्म ८ नोव्हेंबर १९७६ रोजी ऑस्ट्रेेलियातील न्यू साऊथ वेल्स परगण्यातील वोलोंंगॅग येथे झाला. ब्रेटलीने आपल्या कारकीर्दीची सुरूवात स्थानिक संघाच्या ओक फ्लॅट्स रॅट्स ज्यूनियर संघाकडून केली. १७ वर्षांखालील आणि १९ वर्षांखालील ऑस्ट्रेलियन संघासाठी चांगली कामगिरी केल्यामुळे ब्रेट लीला शेफल्ड शिल्डच्या एन एस डब्ल्यू संघात स्थान मिळाले. ब्रेट लीने वेस्टर्न ऑस्ट्रेलियाविरुद्ध प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले.  पदार्पणाच्या सामन्यात त्याने ११४ धावात ३ फलंदाज बाद केले.
            ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा तत्कालीन कर्णधार स्टीव्ह वॉ एनएसडब्ल्यू संघातर्फे ब्रेट लीने केलेल्या कामगिरीने प्रभावित झाला आणि  त्यानंतर ब्रेट लीने सन १९९९  मध्ये भारताविरुद्ध कसोटी क्रिकेटचा श्रीगणेशा केला. त्याने पदार्पणाच्या सामन्यातच प्रभावी कामगिरी करत पहिल्या डावात ५ आणि दुसऱ्या डावात २ अस एकूण ७ बळी घेतले.
               ब्रेट लीने  सन १९९९ - २००० च्या आपल्या पहिल्याच सत्रारात केवळ ७ कसोटी सामन्यात ४२ फलंदाजांचा फडशा पाडत प्रतिष्ठेचा " सर डॉन ब्रॅडमन युवा क्रिकेटपटू " हा पुरस्कार मिळविला.
                सन २००० मध्ये दुखापतींचा ससेमिरा त्याच्या पाठीमागे लागला. त्याच दरम्यान दुखापतीमुळे एक वर्ष त्याला क्रिकेटपासून दूर राहावे लागलेे .सन २००१ मध्ये अँशेससाठी संघात परतला. परंतु पुन्हा एकदा दुखापतग्रस्त झाल्यानेे त्याला संघाबाहेर जावे लागले. त्यानंतर न्यूझिलंडविरूद्ध ३ कसोटीत १४ बळी घेत यशस्वी पुनरागमन केले.
               सन २००३ च्या एकदिवशीय सामन्यांच्या विश्वचषक स्पर्धेत केनिया विरूद्ध घेतलेल्या हॅट्रीकसह २२ बळी घेत ऑस्ट्रेलियाच्या विजेतेपदात मोलाचा वाटा उचलला. इतकेच नाहीतर सन २००७ च्या पहिल्या टि - २० विश्वचषक स्पर्धेतही बांगलादेश विरूद्ध हॅट्रीक घेतली. अशा प्रकार
टि २० मध्ये हॅट्रीक घेणारा तो पहीला गोलंदाज ठरला. विशेष म्हणजे या दोन्ही स्पर्धा दक्षिण आफ्रिकेत झाल्या आहेत. वनडे व टि २० विश्वचषकात हॅट्रीक घेणारा तो पहिला गोलंदाज आहे.
                  ब्रेट लीने त्याच्या खाजगी जीवनात दोन लग्न केले आहेत. ब्रेट लीची पहिली पत्नी एलिझाबेथ केंप  हिला त्याने सन २००८ मध्ये घटस्फोट दिला. केम्प व्यवसायाने डॉक्टर होती. हे प्रोस्टन नावाचा मुलगाही या दाम्पत्याला आहेे. त्यानंतर सन २०१४ मध्ये लाना अँडरसन हिच्याशी त्याने दुसरे लग्न केले. लाना ऑस्ट्रेलियातील अतिशय प्रसिध्द महिला असून दिसायलाही अतिशय सुंदर आहे. मुळातच ब्रेट ली सुध्दा अतिशय सुस्वरूप असून गायन कलेत तो प्रविण आहे. बॉलीवूडमध्येही त्याने आपला प्रताप दाखविला आहे. ख्यातनाम गायिका आशा भोसलेंसह त्याचे गाण्याचे अल्बमही प्रसिद्ध आहेत.

लेखक : -दत्ता विघावे 
क्रिकेट समिक्षक.
इंटरनॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट, मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल प्रतिनिधी भारत.Email:  dattavighave@gmail.comमोबाईल. ९०९६३७२०८२.

No comments:

Post a Comment