तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 5 November 2019

लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे गोपीनाथ गडावर ; मुंडे साहेब, अमर रहे च्या घोषणांनी परिसर दुमदुमला
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- दि. ०५ ------- शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी आज गोपीनाथ गडावर येऊन लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी कार्यकर्त्यांच्या 'अमर रहे, अमर रहे, मुंडे साहेब, अमर रहे' घोषणांनी गडाचा परिसर दुमदुमून गेला होता.

   शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे हे मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीच्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी   आले होते, गंगाखेडहून बीडकडे जातांना लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचे समाधीस्थळ असलेल्या गोपीनाथ गड येथे भेट देऊन नतमस्तक होत त्यांनी दर्शन घेतले. यावेळी मंत्री एकनाथ शिंदे, चंद्रकांत खैरे, अनिल देसाई, मिलिंद नार्वेकर आदी शिवसेनेचे नेते त्यांचेसमवेत होते. भाजपचे प्रदेश चिटणीस राजेश देशमुख, जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख कुंडलिक खांडे, सचिन मुळूक, भाजपचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव गुट्टे, दिनकर मुंडे गुरूजी, श्रीहरी मुंडे, जीवराज ढाकणे, नामदेवराव आघाव, प्रा. विजय मुंडे यांच्यासह भाजपचे असंख्य कार्यकर्ते तसेच शिवसेनेचे तालुकाप्रमुख व्यंकटेश शिंदे व पदाधिका-यांनी त्यांचे स्वागत केले. बीड जिल्हातील मुंडे समर्थक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कौटुंबिक जिव्हाळा कायम राहो- ना. पंकजाताई मुंडे यांचे ट्विट

भाजपच्या कोअर कमिटीची बैठक असल्याने राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री  ना. पंकजाताई मुंडे आज मुंबईत होत्या. उध्दव ठाकरे यांच्या भेटीनंतर त्यांनी ट्विट करतांना म्हटले आहे की, आदरणीय उद्धवजी ठाकरे गोपीनाथ गड येथे पोचले आहेत मी त्यांचे स्वतः प्रत्यक्षात स्वागत करण्यासाठी नाही पण मनापासून स्वागत!! राजकारणा पलीकडे हा वैयक्तिक जिव्हाळा आपल्या परिवारात नेहमी होता, मुंडे साहेबांच्या पश्चात आपण तो तसाच ठेवलात ते प्रेम सदैव कायम राहो!

No comments:

Post a Comment