तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 28 November 2019

परळी तालुक्यात गटविकास अधिकारी आणि गटशिक्षणाधिकारी यांच्या संगनमताने शिक्षकांच्या प्रतिनियुक्त्यांचा घोडेबाजार. विद्यार्थ्यांचे होत आहे शैक्षणिक नुकसान


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- जिल्हा परिषद शिक्षकांची नियुक्ती केवळ अध्यापन व शैक्षणिक कामासाठी करावे हा महाराष्ट्र शासनाचा आदेश पायदळी तुडवीत परळी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी आणि परळीचे गट शिक्षण अधिकारी हे संगनमताने परळी तालुक्यातील जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्या प्रतिनियुक्ती या गोंडस नावाखाली करीत असल्याने शिक्षणाचा बोजवारा उडाला असून अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. यामध्ये मोठे आर्थिक देवाणघेवाणीचे प्रकार होत आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी बीड यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी अधिकाऱ्यावर व शाळा बुडव्या शिक्षकांवर कठोर कार्यवाही करावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
        याबाबत सविस्तर माहिती अशी की ग्राम विकास विभाग महाराष्ट्र शासनाचे उपसचिव पी. एस. कांबळे यांनी आदेश क्रमांक जिपव 4818 ( प्र क्र 52 / 2018/ आस्था - 14 दिनांक 20/ 9/ 2019 नुसार राज्यातील जिल्हा परिषदांना जिल्हा परिषद शिक्षकांच्या नियुक्त्या केवळ अध्यापन व शैक्षणिक कामासाठी करण्यात याव्यात असा आदेश दिला. मात्र परळी तालुक्यात पंचायत समितीचे गट विकास अधिकारी संजय केंद्रे आणि गटशिक्षणाधिकारी गणेश गिरी हे संगनमताने शासनाचा आदेश पायदळी तुडवीत सर्रास जिल्हा परिषद शिक्षकांच्या मनातील येईल त्याठिकाणी प्रतिनियुक्तीवर बदल्या करीत आहेत.
          सखोल चौकशी केली असता गट विकास अधिकारी संजय केंद्रे आणि गटशिक्षणाधिकारी गणेश गिरी यांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर करून गशीअप/  487/ 2019 दिनांक 11 /11 /2019 या पत्रानुसार ह्या दोघा बेजबाबदार अधिकाऱ्यांनी आपल्या सहीनिशी तालुक्यातील प्रदीप बालाजी चाटे, शिवाजी बाबुराव पिंगळे, सुनिल चंद्रकांत देशमुख, गोविंद श्रीरंगराव कराड, यांच्या प्रतिनियुक्तीवर बदल्या केल्या. अधिक चौकशी केली असता ह्यापैकी सुनिल चंद्रकांत देशमुख यांनी कामावर कुठेही न जाता परळी शहरातील अरुणोदय मार्केट या ठिकाणी आपले खाजगी दुकान थाटले आहे.
       प्रतिनियुक्ती करण्यात आलेले शिक्षक सुनील चंद्रकांत देशमुख यांची सध्या कागदोपत्री परळी तालुक्यातील बेलंबा याठिकाणी प्राथमिक जिल्हा परिषद शाळा या ठिकाणी नियुक्ती आहे. देशमुख हे 2011 पासून प्रतिनियुक्तीवर शाळेत दांड्या मारून संबंधित अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने आपल्या खाजगी दुकानावर काम करीत आहेत. अधिक चौकशी केली असता सुनील देशमुख परळी तालुक्यातील 14 केंद्रातील शिक्षकांचे वेतन व बीले पास करून देतात. या पोटी त्यांना प्रत्येक केंद्राचे जवळपास सात ते आठ हजार रुपये मिळतात अशा रीतीने एक लाख ते सव्वा लाख प्रती महिना सुनील देशमुख कमावतात यात वरिष्ठांचाही हिस्सा असल्याचे समजते. सुनील देशमुख हे आपल्या खाजगी कार्यालयात शासनाचा शालार्थ पासवर्ड आयडी वापरत आहेत जे की खासगी कार्यालयात वापरता येत नाही. जर हा पासवर्ड चोरीस गेला तर शासनाचे मोठे नुकसान होणे टाळता येत नाही.
          वरील चार शिक्षका सोबतच गट विकास अधिकारी संजय केंद्रे आणि गटशिक्षणाधिकारी गणेश गिरी यांनी तालुक्यातील अनेक शिक्षकांच्या प्रतिनियुक्तीवर बदल्या केल्याचे समजते. सदरच्या शिक्षकांनी आपल्या सोयीनुसार आपला खाजगी व्यवसाय करता यावा या दृष्टिकोनातून बदल्या करून घेतलेल्या आहेत. त्यापैकी काही शिक्षक बाहेरगावी गुत्तेदारीचा व्यवसाय करतात. संबंधित अधिकारी हे मोठ्या आर्थिक देवान घेवाणीतुन  शिक्षकांच्या प्रतिनियुक्तीवर बदल्या करीत आहेत अशी संतप्त प्रतिक्रिया काही शिक्षकांनी व्यक्त केली. गटविकास अधिकारी आणि गटशिक्षणाधिकारी यांच्या गैरकारभार आणि मनमानी कारभाराचा परिणाम तालुक्यातील शाळांवर आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होत आहे. 
        तेव्हा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी परळी तालुक्यातील पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संजय केंद्रे व गटशिक्षणाधिकारी गणेश गिरी यांच्या शिक्षकांची प्रतीनियुक्त्यांच्या नावावर झालेल्या घोडेबाजाराची सखोल चौकशी करून अधिकाराचा गैरवापर करून करण्यात आलेल्या शिक्षकांच्या बदल्या ह्या कोणत्या व कुठे गेल्या व सध्या ते शिक्षक त्या ठिकाणी कार्यरत आहेत का याची सखोल चौकशी करावी व दोषी अधिकारी व शिक्षकावर कठोर कार्यवाही करावी अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे.
           
     ''बदल्यांचा अधिकारच नाही''
आरटीई 2009 च्या आदेशानुसार गटशिक्षणाधिकारी यांना शिक्षकांच्या प्रतिनियुक्तीवर बदल्या करण्याचा अधिकारच नाही असा निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे. तरीही हा निर्णय पायदळी तुडवून गटशिक्षणाधिकारी गणेश गिरी हे शिक्षकांच्या प्रतिनियुक्तीवर मनमानी बदल्या करीत आहेत. याचीही सखोल चौकशी करण्यात याव

No comments:

Post a comment