तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 16 November 2019

राज्यपालांच्या मदतीमुळे राज्यातील नुकसानग्रस्त शेतक-यांना दिलासा - पंकजाताई मुंडेमुंबई (प्रतिनिधी) :- राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना  मदत जाहीर केली आहे. दोन हेक्टरपर्यंतच्या खरीप पिकांसाठी ८ हजारांची तर फळबागांसाठी १८ हजार रुपयांची प्रति हेक्टरी मदत घोषित करण्यात आली आहे.  राज्यपालांनी जाहीर केलेल्या या मदतीमुळे अवकाळी पावसाने उध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे, अशी प्रतिक्रिया माजी ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजाताई मुंडे यांनी व्यक्त केली आहे. 

महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास मातीमोल झाला आहे. शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी आम्ही राज्यपालांकडे मागणी केली होती. राज्यातील कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी दोन हेक्टरपर्यंतच्या पिकांच्या नुकसानीसाठी आठ हजारांची प्रतिहेक्टरी मदत तर बागायत शेतीसाठी १८ हजार रुपयांची मदत तात्काळ शेतकऱ्यांना देण्याचे निर्देश राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिले आहेत. याशिवाय नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांचा शेतसारा, विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याचे आदेश देखील राज्यपालांनी दिले आहेत असे पंकजाताई मुंडे यांनी म्हटले आहे.

No comments:

Post a comment