तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 19 November 2019

परळी रेल्वे संघर्ष समितीच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करू –गजानन माल्या ; परळी रेल्वे संघर्ष समितीने दिले विविध निवेदन; विविध क्षेत्रातील अनेकांची उपस्थिती


परळी वैजनाथ  (प्रतिनिधी) :  
मुंबई रेल्वेसह आपण सादर केलेल्या मागण्यांबाबत दक्षीण-मध्य रेल्वे सकारात्मक असून, प्रशासन परळी रेल्वे संघर्ष समितीच्या मुलभूत मागण्यांबाबत वरिष्ठांपर्यंत आग्रही राहील असे आश्वासन महाप्रबंधक गजानन माल्या यांनी दिले. आज मंगळवारी विभागीय महाव्यवस्थापक माल्या यांनी परळी रेल्वे स्थानकात भेट दिली. यावेळी परळी रेल्वे संघर्ष समितीच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन त्यांना सादर करण्यात आले.  दरम्यान परळी-बीड-नगर रेल्वे मार्गाचे काम चालू असून, त्यास रेल्वे विभागाने निधीची कमतरता भासू दिली नसल्याचे ते म्हणाले.
परळी रेल्वे संघर्ष समितीच्या वतीने मंगळवार, दि.१९ नोव्हेंबर रोजी दक्षीण-मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक गजानन माल्या यांना निवेदन देण्यात आले. रेल्वेच्या वार्षीक सर्वेक्षणासाठी महाव्यवस्थापक परळी येथे आले असता त्यांची परळी रेल्वे संघर्ष समितीचे निमंत्रक चंदुलाल बियाणी, प्रवाशी संघटनेचे अध्यक्ष जी.एस.सौंदळे यांच्यासह पदाधिकारी व सदस्यांच्या व्यापक शिष्टमंडळाने भेट घेतली. यावेळी रेल्वे संदर्भात दिलेल्या निवेदनात परळी –मुंबई रेल्वे सुरू करावी, तिरूपती तसेच विविध तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी जाण्यासाठी परळी येथून रेल्वेची सेवा सुरू करावी, परळी रेल्वे स्थानकात वातानुकूलीत प्रतिक्षालय निर्माण करावे, रिझर्व्हेशन काऊंटरची संख्या वाढवून रिझर्व्हेशनचा कालावधी आठ तासांच्या ऐवजी १२ तास करावा, रेल्वे स्थानकावर सीसीटिव्ही कॅमेरे बसवावेत, रेल्वे स्टेशन ते बसस्थानकादरम्यान पदपथ निर्माण करावेत, हैदराबाद-औरंगाबाद व औरंगाबाद-हैदराबाद या पॅसेंजर रेल्वेस वातानुकूलीत नविन कोच जोडावेत, मिरज-परळी रेल्वेस स्लिपर कोच जोडावेत, सिकंदराबाद-बिदर-हैदराबाद इंटरसिटी एक्सप्रेसला परळीपर्यंत विस्तारीत वाढ द्यावी अशी मागणी करण्यात आली.
प्रस्तुत निवेदनात निजामाबाद-पंढरपूर गाडीचा विस्तार, परळी-अकोला शेगावपर्यंत विस्तारीत करणे, तिरूपती बालाजीसाठी विकाराबाद येथे रॉयलसिमाला कनेक्टीव्ह रेल्वे देणे यांसह अनेक महत्वपूर्ण मागण्या करण्यात आल्या आहेत. यावेळी बोलतांना महावस्थापक गजानन माल्या यांनी सांगितले की, आपल्या मागण्या प्रवाशी आणि रेल्वे प्रशासनासाठी निश्चितच महत्वाच्या आहेत. रेल्वाचा क्रु तपासून काही नव्या गाड्या सुरू करणे, गाड्यांचा पुढे विस्तार करणे याबाबतीत आम्ही सकारात्मकतेने पाहुत असे ते म्हणाले. यावेळी रेल्वे संघर्ष समितीचे निमंत्रक चंदुलाल बियाणी, प्रवाशी संघटनेचे अध्यक्ष जी.एस.सौंदळे, जि.प.सदस्य मधुकर आघाव, केशवभाऊ बळवंत, कॉ.पी.एस.घाडगे, नगरसेवक जयप्रकाश लड्डा, शंकरराव आडेपवार, अजिजभाई कच्छी सतिश बियाणी, ओमप्रकाश बुरांडे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अड.अनिल मुंडे, जेष्ठ नेते माधव ताटे, ओमप्रकाश तापडीया, चेतन सौंदळे, विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अतुल दुबे, वंदे मातरम सेनेचे प्रदेशाध्यक्ष दिलीप जोशी, रमेश भोयटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते सुरेश टाक, अनंत इंगळे, संतोष शिंदे, शिराजभाई, महादेव रोडे, नंदकिशोर बियाणी, प्रा.बैजुलाल बियाणी, ओमप्रकाश मुंदडा, रज्जाक कच्छी, सुधिर बंग, सतिश बंग, बद्रीनारायण बाहेती, कॉ.पांडुरंग राठोड, शेख गफ्फार कादार, सुभाष वाघमारे, अजिजभाई कच्छी, हरिभाऊ चौलवार, पांडुरंग इंगळे, स्वरनक्षत्र कला अकादमीचे कृष्णा बळवंत, प्रमोद जयगावकर, ईश्वरलाल बाहेती, शेख शम्मो, मजस्सोद्दीन इनामदार, सुमंतराव देशमुख, राजाभाऊ देशमुख, नमितासिंग रॉय, चंद्रप्रकाश काबरा यांच्यासह परळी शहरातील पत्रकार, वकील, डॉक्टर, सामाजिक कार्यकर्ते, प्राध्यापक, शिक्षक आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. वार्षीक तपासणीच्या प्रचंड घाईतसुध्दा महाव्यवस्थापकांनी वेळ दिल्याबद्दल परळी रेल्वे संघर्ष समितीनी त्यांचे आभार व्यक्त केले.

No comments:

Post a comment