तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 20 November 2019

आरोग्य विषयक योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी - जिल्हाधिकारी:-- एड्स नियंत्रण, लसीकरण, पीसीपीएनडीटी बैठक

:-- तंबाखू खाण्याच्या दुष्परीणामांविषयी जनजागृती करावी

बुलडाणा, दि. 20 : शासन विविध आरोग्यविषयीच्या कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून आरोग्यवर्धनासाठी काम करते. आरोग्याच्या योजनांतून लाभार्थ्यांना उपचार, प्रतिबंधात्मक माहिती मिळते. अनेक योजनांमुळे संबंधित आजाराविषयी जनजागृती होवून नागरिकांकडून आजार न होण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय करण्यात येतात. शासनाच्या आरोग्यविषयक योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. निरूपमा डांगे यांनी आज दिल्या.
  जिल्हाधिकारी यांच्या दालनामध्ये आज विविध आरोग्य विषयक योजनांच्या अंमलबजावणीबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीला माता व बाल संगोपण अधिकारी डॉ. गोफणे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालकल्याण) श्री. रामरामे, संबंधित विभागाचे विभागप्रमुख आदी उपस्थित होते.
    जास्तीत जास्त लोकसंख्येची एचआयव्ही तपासणी करण्याचे निर्देश देत जिल्हाधिकारी म्हणाल्या, एचआयव्ही तपासणी करताना अधिकाधिक लोकांचा सहभाग घ्यायला पाहिजे. जिल्ह्यातील संपूर्ण गावे त्यामध्ये आली पाहिजेत. 'हाय रिस्क' लोकसंख्येची तपासणी करून आजुबाजूच्या गावातील, परिसरातील लोकांची तपासणीही करून घ्यावी. एड्स नियंत्रण कार्यक्रमात जिल्हा अव्वल असावा. एआरटीवर असणाऱ्या रूग्णांना विनात्रास औषधे उपलब्ध करून द्यावीत. क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम राबविताना जिल्ह्याचे काम अव्वल दर्जाचे असावे. लसीकरण मोहिम राबविताना शासनाकडून देण्यात येणाऱ्या लसींचा पुरवठा पर्याप्त संख्येत ठेवावा. लसीकरणातंर्गत सर्व पात्र बालके घ्यावीत.
      पीसीपीएनडीटी कायद्यातंर्गत सोनोग्राफी केंद्रांची नियमित तपासणी करण्याच्या सूचना देत जिल्हाधिकारी म्हणाल्या, स्त्री भ्रुण हत्या जास्त होत असलेल्या भागांमध्ये जनजागृती करण्यात यावी. प्रत्येक महिन्यात मुलांच्या जन्मांची संख्या, मुलींच्या जन्मांची संख्या व आढळणारी तफावत याचा सखोल विश्लेषणात्मक अहवाल सादर करावा. ज्या गावांत, तालुक्यात हे प्रमाण व्यस्त्‍ असेल तिथे लक्ष केंद्रीत करून तपासण्या बारकाईने कराव्या. अशा ठिकाणी केसेस दाखल कराव्यात. मुलींचा जन्मदर कमी राहत असलेल्या गावाचा, भागाचा बारकाईने तपास करून कारणांसह अहवाल सादर करावा. राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमातंर्गत तंबाखू नियंत्रण प्रभावीपणे करण्यासाठी कार्यवाही करावी. तंबाखू नियंत्रण कायद्याचा प्रभावीरित्या उपयोग करावा.
  त्या पुढे म्हणाल्या, तंबाखू नियंत्रणासाठी महाविद्यालयीन व शालेय विद्यार्थ्यांचा गट, तंबाखूमुळे कर्करोग झालेल्या नागरिकांचा एक गट अशा पद्धतीने  कार्यवाही करावी.  विद्यार्थी गटात तंबाखूचे दुष्परिणाम समजवून जनजागृती करावी, तर कर्करोग झालेल्या गटात उपचारासाठी कार्यवाही करावी. तंबाखू नियंत्रण करताना जिल्ह्यात तंबाखूमुळे कर्करोग झालेल्या नागरिकांचा अहवाल सादर करावा. यामध्ये तालुकानिहाय आकडेवारी असावी. बैठकीप्रसंगी संबंधित शाखेचे जिल्हा समन्वयक, गजानन देशमुख, डॉ लता बाहेकर आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
                                                                       _____________________----
                                                                             
        जिल्ह्यात 2 डिसेंबरपासून लसीकरणाची विशेष इंद्रधनुष्य मोहिम
बुलडाणा, दि. 20 : जिल्ह्यात लसीकरण सक्षमीकरणासाठी ‘विशेष इंद्रधनुष्य मोहिम 2.0’ येत्या 2 डिसेंबर 2019 पासून सुरू करण्यात येणार आहे. सदर मोहिमेंतर्गत जिह्यातील लसीकरणापासून वंचित 0 ते 2 वर्षे वयोगटातील बालके व गरोदर माता यांचा सर्व्हे करून त्यांच्यासाठी अतिरिक्त लसीकरण सत्रांचे आयोजन करण्यात येणार आहे.
   या मोहिमेच्या अंमलबजावणीबाबत आज 20 नोव्हेंबर 2019 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हाधिकारी डॉ.निरुपमा डांगे, यांचे अध्यक्षतेखाली नियमित लसीकरण सक्षमीकरण जिल्हा कृती समितीची सभा घेण्यात आली.  जिल्हाधिकारी यांनी जिह्यातील लसीकरण कार्यक्रमाचा यावेळी आढावा घेतला.
   जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. रवींद्र गोफणे यांनी विशेष इंद्रधनुष्य लसीकरण मोहिमेविषयी माहिती दिली. सदर मोहिमेचे प्रभावी नियोजन करून सर्व विभागांच्या समन्वयातून मोहीम यशस्वी करण्याबाबत निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले. यावेळी आरोग्य विभागाचे विविध अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बाल कल्याण) अरविंद रामरामे याचेसह विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी हजर होते.
                                                                                 - - - - - - - - - - - - - - - - -    
                                               
काप

No comments:

Post a comment