तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 1 November 2019

नवगणराजूरीच्या गणपतीच्या दोन दानपेट्या चोरट्यांनी पळवल्याबीड (प्रतिनिधी) :- काल चोरट्यांनी माजलगाव येथील केसापुरी कॅम्पवर दरोडा टाकल्यानंतर रात्री बीड तालुक्यातील नवगण राजूरी येथील गपतीच्या दोन दानपेट्या पळवल्या. तर  मंदिरासमोर लावलेली एक दुचाकीही लंपास केली. दानपेटीमध्ये अंदाजे ४५ हजाराची रोकड असल्याचे पुजारी गणपत सखाराम शिंदे यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
काल दरोडेखोरांनी माजलगाव तालुक्यातील केसापुरी कॅम्प येथे दरोडा टाकून त्यामध्ये लाखोंचा ऐवज लंपास केला होता. याचा तपास सुरु असतांनाच चोरट्यांनी बीड तालुक्यातील नवगण राजूरी येथील गणपतीच्या दोन दान पेट्या लंपास केल्याची घटना रात्री तीन ते साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली. याच वेळी गणपती मंदिरासमोर बाळू कदम यांनी लावली दुचाकीही चोरट्याने लंपास केली. या प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात मंदिराचे पुजारी गणपत सखाराम शिंदे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी एलसीबीचे पीआय भारत राऊत, ग्रामीण पोलीस ठाण्याचे एपीआय सुजीत बडे यांनी पंचनामा केला.
चौकट....
हिरापूरच्या सिंदफना नदीत सापडली तिजोरी
 अज्ञात चोरट्याने गेल्या तीन दिवसापूर्वी सिंदफना नदीवरील जुन्या पुलावरून तिजोरी फेकल्याची माहिती पोलीसांना मिळाल्यानंतर आज बीड ग्रामीण पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत ती तिजोरी बाहेर काढली. 
गेल्या दोन-तीन दिवसापूर्वी चार चाकी वाहनातून अज्ञात चोरट्यांनी सिंदफना नदी पात्रातील जुन्या पुलावरून मोठी तिजोरी फेकल्याची घटना घडली होती. यानंतर आज ग्रामीण पोलीस ठाण्याचे एपीआय सुजीत बडे यांनी धाव घेत ग्रामस्थांच्या मदतीने ती तिजोरी बाहेर काढली. यावेळी ती अज्ञात चोरट्याने कटरच्या सहाय्याने फोडून त्यातील मुद्देमाल लंपास करून ती  नदी पात्रात फेकल्याचे समजते. आता ही तिजोरी नेमकं कशाची आहे? ती सिंदफना नदी पात्रात का फेकली याचा पोलीस शोध घेत आहेत.

No comments:

Post a comment