तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!tej news

Tuesday, 5 November 2019

मुस्लिम समाजात वेगळं स्थान निर्माण करणाऱ्या ११ युवकाना 'समाज भूषनने' गौरवले! डोणगांव येथील मुस्लिम समाजातील विविध क्षेत्रात आपले नाव कमवून इतरांना प्रेरणा देणाऱ्या युवकांना अल्पसंख्याक बहुउद्देशीय शिक्षण संस्थेने समाज भूषण पुरस्कार देऊन गौरविले.

डोणगांव 5 मुस्लिम समाज आज सुद्धा शिक्षण,आर्थिक,सामाजिक अश्या कित्येक ठिकाणी मागासलेला आहे तेव्हा या मुस्लिम समाजास मुख्य प्रवाहात आणण्या साठी एक उपाय योजना आणि प्रेरणा म्हणून जयहिंद अल्पसंख्याक बहुउद्देशीय शिक्षण संस्था डोणगांव यांच्या वतीने 'एक कदम कामीयाबी की और' या कार्यक्रमात मुस्लिम समाजातील विविध क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या 11 युवकाना दिवंगत बाबा शाह यांच्या नावे समाज भूषण पुरुस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते 4 नव्हेंबर रोजी गौरविण्यात आले. डोणगांव येथील जयहिंद अल्पसंख्याक बहुद्देशीय शिक्षण संस्थेने 4 नव्हेंबर रोजी एक कदम कमियाबी की और हा कार्यक्रम घेऊन फक्रोद्दीन अली अहमद हायस्कूल चे संस्थापक सचिव बाबा शाह यांच्या नावे मुस्लिम समाजातील शिक्षण,उद्योग,व्यवसाय,राजकारण,सामाजिक व पत्रकारिता अश्या विवीध क्षेत्रात आपला ठसा उंमटविणाऱ्या 11 युवकांचा समाज भूषण पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष दिलदार शाह ठेकेदार,प्रमुख पाव्हने म्हणून शेर महोम्मद अभियंता औरंगाबाद,साबीर शाह साबीर सा खेर्डा ,ऍड फरहद बेग चंद्रपूर,कालीम खान मेहकर,आयुब कुरेशी दे मही,वसीम खान,बशीर शाह,शे बशीर टेलर,नाजीम कुरेशी,हयात ठेकेदार,शब्बीर पलंबर,भोले खान,सद्दाम शाह,नयमतुल्ला मामू इत्यादि प्रमुख उपस्थित यांच्या उपस्थितीत यांच्या उपस्थितीत डोणगांव येथील विविध क्षेत्रात काम करुण आपला ठसा उमट वणाऱ्या जमीर शाह अजीज शाह,शेख यासिन शेख नसिम,सरफराज खान उमर खान,शेख युसुफ फलाही ,यासिन बेग अख्तर बेग,अबरार खान अकबर खान,जोईब खान बिस्मिल्ला खान सरपंच ,वसिम अहेमद खान ,जावेद खान ठेकेदार ,युसुफ खान सलीम खान,असलम खान या युवकाना पुरुस्कार देऊन सन्मानित करण्यात आले या वेळी मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले तर अस्लमअली शाह यांनी प्रस्तावना मांडली तर उमर फारूक शाह व सद्दाम शाह यांनी संचालन केले यावेळी कार्यक्रम यशस्विते साठी फिरोज शाह,अय्युब शाह,युनूस अली शाह,सलीम शाह,सोहेल शाह,जुबेर शाह,परवेज शाह इत्यादींनी मेहनत घेतली तर कार्यक्रमाचा शेवट राष्ट्रगीताने करण्यात आला.

जमील पठाण
8805381333

No comments:

Post a Comment