तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 25 November 2019

आनंद येथे विमा कामगार संघटनेचे पश्चिम विभागीय त्रैवार्षिक अधिवेशन

             

सेलू / प्रतिनिधी : अखिल भारतीय विमा कामगार संघटनेचे (ए, आय, आय, ई,ए) पश्चिम विभागीय 22 वे त्रैवार्षिक अधिवेशन येत्या 1 ते 3 डिसेंबर या कालावधीत आनंद (गुजरात) येथे होणार आहे. 
या अधिवेशनाचे उद्घाटन कॉ अमनउल्ला खान(अध्यक्ष ए आय आय ई ए)यांचे हस्ते होणार असून प्रमुख अतिथी म्हणून कॉ व्ही, रमेश(सरचिटणीस ,ए आय आय ई ए) हे उपस्थित राहणार आहेत तसेच कॉ के, वेणुगोपाल प्रतिनिधि सत्रा मध्य मुख्य मार्गदर्शन करणार आहेत.या अधिवेशनाला कॉ एच आय भट्ट(सरचिटणीस, ए आय आय ई ए पश्चिम क्षेत्र), कॉ व्ही एस नलावडे (अध्यक्ष ए आय आय ई ए पश्चिम क्षेत्र) आदी उपस्थित राहणार आहेत. तसेच महाराष्ट्र, गुजरात,गोवा या राज्यातून विमा कामगार संघटनेचे कर्मचारी उपस्थित राहणार आहेत. 
या अधिवेशनास दिनांक एक ऑगस्ट पासून जो वेतन करार अपेक्षित आहे तो मंडळालाची एकूण प्रगती बघून चांगला वेतन करार होण्यासाठी ठोस पाऊले ठरविली जातील. हा करार आदर्श ठरला पाहिजे. हा निर्धार व्यक्त केला जाईल. चार्टरवरील चर्चेची मागील फेरी संपूण आता सात महिन्यापेक्षा अधिक काळ लोटला असून सुधारित देकार देण्यावर होत असलेल्या असामान्य विलंबा बदल (ए आय आय ई ए ) ने नापसंती दर्शविली. तसेच चार्टर वरील चर्चा सुरु करावी जेणे करून बोलणी योग्य वेळेत यशस्वीपणे होऊन अंमलबजावणी वेळेत होईल. अशी मागणी केली आहे. त्यावर मा.चेअरमन यांनी सदर विषयावर सरकारकडे आवश्यक तो पाठपुरावा व चर्चा करून अंतिमत: अंमलबजावणी करण्याकरीता सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले. डिसेंबरच्या प्रारंभी (पश्चिम क्षत्र आय ई ए ) आणि जानेवारी 2020 चे अखेरीस (ए आय आय ई ए)चे त्रैवार्षिक अधीवेशन होत आहेत.एकूणच विभागीय संघटना व पश्चिम क्षेत्र आय ई ए या आव्हानात्मक काळात(ए आय आय ई ए)चे परंपरेनुसार प्रयत्नाची पराकाष्ठा करेल.हा विश्वास आहे. पुढील कामात कामगार वर्गात एकजुटीचे वातवरण तयार होईल आशारीतीने आनंद (गुजरात) अधिवेशन भव्यदिव्य व्हावे अशी संयोजकांची तयारी आहे. हे अधिवेशन आनंद बंसीलाल अमृतलाल कॉलेज ऑफ कॄषि खेतीवाड़ी गुजरात येथे ठेवण्यात आले आहे. स्वागत समिती 22 वे त्रिवार्षिक अधिवेशना साठी कॉ प्रकाश एम मकवान(सचिव)डॉ हेमंतकुमार शाह(अध्यक्ष)विजय पी केवात(उपाध्यक्ष) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विमा कामगार संघटनेचे कर्मचार्‍यांनी या अधिवेशनाला उपस्थित राहवे, असे आवाहन कॉ राजेश भालेराव, कॉ शमशोद्दीन शेख, राजू कुलथे, पेशकार मैडम, रामा धोत्रे, ताटकोंडवार  मैडम, नागेशी, राजू बुंदिले आदींनी केले आहे.

वृत्तांकन : बाबासाहेब हेलसकर
....

No comments:

Post a comment