तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 27 November 2019

साखरा येथे शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम पार पडलाकेंद्र शासनाची प्रधानमंत्री कौशल विकास योजना
छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता व कौशल्य विकास अभियान अंतर्गत महाराष्ट्र कृषी कौशल्य विकास कार्यक्रम


सेनगाव तालुक्यातील साखरा येथे दिनांक 24 25 आणि 26 नोव्हेंबर या तीन दिवसीय प्रशिक्षण छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता व कौशल्य विकास अभियान अंतर्गत महाराष्ट्र कृषी कौशल्य विकास कार्यक्रम पार पडला. यावेळी प्रमुख उपस्थिती, जिल्हा परिषद सदस्य देवराव जाधव, पंचायत समिती सदस्य खुशालराव हराळ , डॉक्टर कदम, यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून वैभव फुलारे सर व त्यांची टीम उपस्थित होती. या कार्यक्रमाचे नियोजन बी. एम. कोडे यांनी व्यवस्थितरित्या पार पाडले, यामध्ये जवळपास दोनशे शेतकऱ्यांनी या मार्गदर्शनाचा लाभ घेतला, यामध्ये साखरा, केलसुला, घोरदरी, बोरखेडी, खडकी आणि हिवरखेडा येथील शेतकरी उपस्थित होते.
यावेळी प्रशिक्षणार्थी साठी सोयाबीन पीक व्यवस्थापन हस्तपुस्तिका व शेतकरी गट स्थापने संदर्भात माहिती देणारी कार्यपुस्तिका देण्यात आला

No comments:

Post a comment