तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 30 November 2019

हेळंब येथे श्री. खंडोबा यात्रेची जय्यत तयारी सुरू!हेळंब येथील खंडोबाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

2 ते 4 डिसेंबर दरम्यान यात्रोत्सव विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- तालुक्यातील हेळंब येथील प्रसिध्द खंडोबाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी होत असुन चार्तुमासातील रविवारी भाविकांची ही गर्दी हजारोंच्या संख्येने होत आहे. दि.०२ डिसेंबर रोजी मोठी यात्रा भरणार असुन यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
हेळंब येथील खंडोबाचे देवस्थान प्रसिध्द असुन मुंबई, पुणे, औरंगाबाद, हैद्राबाद आदी भागातुन भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येत असतात. मागील चार महिन्यापासुन प्रत्येक रविवारी भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येत आहेत. दरवर्षी चंपाषष्ठीला तीन दिवशीय यात्रा भरत असते. यावर्षीही यात्रा २ डिसेंबर रोजी येत आहे.  

          तालुक्यातील हेळंबच्या श्री खंडोबाची यात्रा दि. 02 ते 04 डिसेंबर 2019  दरम्यान होणार आहे.  यात्रेची जोरदार तयारी सध्या  सुरु आहे. या ठिकाणी दरवर्षी यात्रेला  मोठ्या प्रमाणावर भाविक येतात. यात्रेच्या पार्श्‍वभुमीवर हेळंब येथे  घरोघरी भाविक व नातेवाईकांच्या स्वागताची तयारी सुरु असल्याचे दिसत आहे. दररविवारी ही या ठिकाणी दर्शनासाठी मोठी गर्दी असते.   हेळंब येथे श्री. खंडोबारायाचे जागृत देवस्थान आहे. दरवर्षी चंपाषष्ठीला इथे  मोठी यात्रा भरते. याहीवर्षी ही यात्रा जोरदार होणार आहे. यात्रा जवळ आली असुन यात्रेची जोरदार तयारी सुरु आहे. नवसाला पावणारा खंडेराया अशी या देवसस्थानची पंचक्रोशीत ओळख आहे. परिसरातील गावोगावचे नागरिक दर्शनासाठी, नवस करण्यासाठी व नवसाच्या पुर्तेतेसाठी येथे गर्दी करीत असतात. या पार्श्‍वभुमीवर ग्रामस्थांच्या वतीने स्वच्छतेसह इतर तयारीला वेग आला आहे. यात्रे निमित्त गावामध्ये दि. 02 ते 04 डिसेंबर या कालावधीत श्रींची पालखी मिरवणुक, शोभेची दारु आदींसह कबड्डी स्पर्धा, कुस्त्या व इतर धार्मिक कार्यक्रम मोठ्या प्रमाणात होणार आहेत.
        श्री खंडोबाचे मंदिर हे हेळंब गावापासून  पासुन १ किलोमिटर अंतरावर असुन रस्त्याची डागडुजी व सुशोभिकरण करण्यासाठी नागरिक सरसावले आहेत.  श्रींच्या मंदिराची रंगरंगोटी करण्यात येत  असुन विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे. गावातील युवक व खंडोबा भक्त यात्रेच्या तयारीला लागले आहेत. घरोघरी मोहरवासिनी मोठ्या प्रमाणावर येतात. त्यांच्या स्वागताचीही तयारी सुरु आहे. कामा निमित्त बाहेर गावी गेलेले नागरिकही यात्रेनिमित्त आवर्जुन गावाकडे येतात. दरम्यान पंचक्रोशीतुन मोठ्या प्रमाणावर भाविक येतात. यात्रेची तयारी सुरू असुन यात्रोत्सव काळात लागणार्‍या सुविधा व येणाऱ्या भाविकभक्तांची सोय करण्याच्या दृष्टीने ग्रामपंचायत व गावकरी तयारी करत असल्याचे सरपंच लक्ष्मीबाई होळंबे व उपसरपंच सौ.लक्ष्मी राम पाळवदे यांनी सांगितले आहे.

No comments:

Post a comment