तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 6 November 2019

प्राचार्य डॉ. प्रमोद दगडूराव काळे हे सेट परीक्षा उत्तीर्णअंबाजोगाई (प्रतिनिधी) :- 
 येथील रहिवाशी आसलेले व सध्या यमुनाबाई कुऱ्हे बी. एड. कॉलेज वडाळा बहिरोबा ता. नेवासा येथे प्राचार्य असलेले डॉ. प्रमोद दगडूराव काळे यांनी 23जून 2019रोजी  झालेल्या सेट परीक्षेत इतिहास या विषयात उत्तीर्ण होऊन घवघवीत यश संपादन केले आहे या बद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे या अगोदर डॉ. प्रमोद काळे यांनी एम. ए. मराठी एम ए इतिहास एम ए हिंदी एम एड एम फिल शिक्षणशास्त्र नेट मराठी नेट शिक्षणशास्त्र डीएसएम पीएच. डी. शिक्षणशास्त्र या पदव्या विशेष प्रावीण्याने मिळवलेल्या आहेत व आता इतिहास विषयात सेट उत्तीर्ण होऊन आणखी एक यश संपादन केले आहे 
या यशस्वीते  बद्दल ज्ञानेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. नवनाथ कुऱ्हे तर सचिव श्री गोरक्षनाथ कुऱ्हे साहेब यांनी डॉ. प्रमोद काळे यांचे अभिनंदन केले आहे. 
डॉ. प्रमोद काळे हे अंबाजोगाई चे भूमीपुत्र असल्या कारणाने श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक सचिव राजकिशोर (पापा )मोदी, तसेच भूषण मोदी यांनी यांनीही डॉ. प्रमोद काळे यांचे अभिनंदन केले आहे. या बरोबर प्रा. आशालता होळकर, प्रा. कुलकर्णी, प्रा. सरवदे, प्रा. भारत घावटे  प्रा. सय्यद यांनीही डॉ. काळे यांचे अभिनंदन केले तसेच अनेक मित्र परिवार व नातेवाईकाने ही यांचे अभिनंदन केले

No comments:

Post a comment