तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 28 November 2019

रोठा गावाचा पाण्याचा ताळेबंद केला सादरजलदुत प्रविण पट्टेबहादूर यांचा पुढाकार

फुलचंद भगत
वाशिम -पाठबंधारे विभाग वाशिम च्या वतीने तीन दिवशीय पाण्याचा ताळेबंद प्रशिक्षणासाठी जिल्ह्यातील जलदुत, जलप्रेमी हे वर्धा, सेवाग्राम येथे प्रशिक्षणासाठी पाठवले होते.हे प्रशिक्षण गांवचा पाण्याचा ताळेबंद व ग्राम पातळीवर जनतेला पाण्याचे नियोजन व भविष्यात पाणी टंचाईला कसे सामोरे जावे लागेल याबरोबरच पाण्याचा योग्य वापर झाला पाहिजे.कमी पाण्यात येणारे पिकं घेऊन पाणी हे गावाला देखील पिण्यासाठी शिल्लक राहिले पाहिजे.याचा अंदाज घेण्यासाठी व भविष्यात निर्माण होणाऱ्या पाणी टंचाईचा कसा सामना करून पाणी वाचवता येईल यासाठी हे तिन दिवशीय प्रशिक्षण वर्धा येथे नुकतेच पार पडले.या प्रशिक्षणा दरम्यान अभ्यास दौरा केला असता,जलदुत प्रविण पट्टेबहादूर यांनी रोठा गांवचा पाण्याचा ताळेबंद सादर केला आहे. हा पाण्याचा ताळेबंद सादर करत असतांना त्या गावांत एकूण झालेले पर्जन्यमान,उपलब्ध पाण्याचे स्रोत,पाणी साठवणूकीसाठीविविध उपाययोजना कोणत्या,गावची लोकसंख्या,गांवचे क्षेत्रफळ,तेथे असणारे जनावरं एकूण संख्या, शेतकरी कोणकोणते पिकं घेतात,गावांत काही सामाजिक,धार्मिक,महोत्सव साजरा केला जातो का, इत्यादीच्या आधारावर तंतोतंत माहिती घेऊन या रोठा गावचा पाण्याचा ताळेबंद जलदुत प्रविण पट्टेबहादूर यांनी यशदाचे संचालक डॉ आनंद पुसावळे,कार्यकारी संचालक डॉ सुमंत पांडे, प्रशिक्षक रमाकांत कुलकर्णी,सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सादर केला आहे.

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206,9763007835

No comments:

Post a comment