तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 25 November 2019

शिक्षकांची नियुक्ती केवळ शाळेसाठीच आता इतर कार्यालयातून शिक्षकांची होणार सुटका


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) ः- शिक्षकांना केवळ त्यांच्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी शिकविण्याचे काम करावे इतर ठिकाणी किंवा कार्यालयात त्यांना नेमणुक देऊ नये असा आदेश महाराष्ट्र शासनाने काढला आहे. इतर कार्यालयात नियुक्ती दिल्यास जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी व गटविकास अधिकार्‍यांवर शिस्तभंगाची कारवाइ करण्यात येणार आहे.
जिल्हा परिषद शाळामधील अनेक शिक्षक हे तहसिल कार्यालय, गटविकास अधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद  कार्यालयात काम करीत आहेत. याचा परिणाम शाळेतील विद्यार्थ्यांवर होत आहे. आगोदरच शिक्षकांची संख्या कमी आणि असे शिक्षक इतर कार्यालयात गेल्यावर संबंधीत शाळेवर परिणाम होत आहे. ही समस्या लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने 20/09/2019 रोजी एक परिपत्रक काढुन राज्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना पाठविले आहे.
या आदेशानुसार जिल्हा परिषद व गटविकास अधिकार्‍यांच्या स्थळाव शिक्षकांकउे विद्यार्थ्यांच्या शिकविण्याच्या कामा व्यतिरिक्त अन्य कामे सुपुर्द करणे गंभीर बाब आहे. संबंधित अधिकार्‍यांच्या अशा कृतीमुळे ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. यापुढे अशा कृतीस मुख्यकार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी जवाबदार राहतील असेही पत्रकात म्हटले आहे.

No comments:

Post a comment