तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 30 November 2019

शेतकरी वा गरीब व्यक्ती यांच्यासोबत बँकांनी सलोख्याची वागणूक द्यावी


बीड (प्रतिनिधी) :- 
बँक ही नागरिकांसाठी आशेचा किरण असते, अशा व्यापक अर्थाने बँकेची भूमीका ही समाज व्यवस्थेमध्ये निर्माण झालेली आहे. शेतकरी, मध्यमवर्गीयासह गरीब हे अनेक संघर्ष करत, शेवटचा मदतीचा आशेचा किरण म्हणून ते बँकेच्या दिशेने वाटचाल करतात त्यांच्यासमवेत बँक कर्मचाऱ्यांनी सलोख्याची वागणूक द्यावी, त्यांना समस्या ऐकूण घेऊन सोडवणूकीचे मार्गदर्शन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी केले.
        शहरात स्टेट बँक ऑफ इंडियाच्या वतीने बँकांच्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी चावडी (बँक इन्फो) एक दिवसीय कार्यक्रमाचे उद्घाीटन जिल्हाधिकारी पाण्डेय यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास स्टेट बँकेचे उपमहाप्रबंधक रवीकुमार वर्मा, क्षेत्रीय प्रबंधक नदंकिशोर भोसले, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक विजय चव्हाण, व्यवस्थापक संम्राट उपस्थित होते.

       जिल्हाधिकारी पाण्डेय म्हणाले, स्टेट बँक ही देशामधील सर्वात मोठी बँक म्हणून कार्य करणारी आहे. बीड जिल्ह्याच्या संदर्भात बोलायचे झाल्यास मागील दोन-तीन वर्षापुर्वी या बँकेकडून शेतकरी कर्ज वाटपाचा टक्केवारी ही शंभर टक्के पूर्ण केलेली आहे. शेतकरी असो व इतर व्यवसायीकांनाही बँकेकडून चांगल्या प्रकारची सेवा दिली जात आहे. मात्र सध्य परिस्थितीमध्ये पहायचे झाल्यास निसर्गाचा असमतोल मुळे शेतकरी हा मोठ्या अडचणीत साडपत आहे. त्यामुळे शेतकरी असो कि कोणी गरीब हे अनेक संकटांना सामोरे जात आहे. त्यांना  या परिस्थितीमध्ये बँक हीच एक मदत व आशा घेऊन येतात यामुळे बँक कर्मचाऱ्यांनी बँकेमध्ये येणाऱ्या शेतकरी, गरीब, किवा अन्य ग्राहकांशी बँक कर्मचाऱ्यांनी सलोख्याची वागणूक द्यावी. त्यांच्यासमवेत चर्चा करुन प्रश्न सोडवणूकीविषयी त्यांना योग्य मार्गदर्शन करावे. त्यामुळे वादाचे प्रकार कमी होतील आणि बँकेची ख्याती वाढेल असेही त्यांनी आवाहन उपस्थितांना केले. यावेळी उपमहाप्रबंधक रवीकुमार वर्मा यांनी मार्गदर्शन केले तर क्षेत्रीय प्रबंधक नदंकिशो भोसले उपस्थितांचे आभार मानले.

जिल्हाधिकाऱ्यांनी विविध स्टॉलला दिल्या भेटी
स्टेट बँकेच्या चावडी कार्यक्रमातंर्गत वीस प्रकारचे विविध योजनांची माहिती देण्यासाठी स्टॉलची उभाणी करण्यात आलेली आहे. या स्टॉलला जिल्हाधिकारी पाण्डेय यांनी भेट देऊन विचारणा केली. दरम्यान महिला बचत गटाच्या वस्तूंची पाहणी केली तसेच महिला बचत गटाने तयार केलेल्या धपाटे – दहीचाही जिल्हाधिकारी पाण्डेय यांनी आस्वाद घेऊन गटाच्या महिलांना प्रोत्साहन दिले.

No comments:

Post a comment