तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 26 November 2019

जिल्हाधिकारी कार्यालयात संविधान उद्देशिकेचे सामुहिक वाचन
बीड (प्रतिनिधी) :- 
जिल्हाधिकारी कार्यालयात आज संविधान दिवस साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित सर्व अधिकारी- कर्मचारी यांनी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामुहिक वाचन केले. भारत हा सार्वभौम लोकशाही असणारे गणराज्य असून येथील शांतता आणि बंधुतेच्या वातावरणात सर्व धर्म शांततेने नांदत आहेत, असे प्रतिपादन निवासी उपजिल्हाधिकारी प्रकाश आघाव पाटील यांनी याप्रसंगी केले.
यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी बालाजी आगवणे, उपजिल्हाधिकारी अतुल वाघमारे, तहसिलदार श्रीराम मेंडके यासह अधिकारी- कर्मचारी  मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी नायब तहसिलदार चंद्रकांत जोगदंड यांनी संविधानाच्या उद्देशिकेचे प्रमुख वाचन केले. श्रीमती आचार्य यांनी गायलेल्या गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
 समाज कल्याण विभागामार्फत संविधान दिवस साजरा
        समाज कल्याण सहाय्यक आयुक्त डॉ. सचिन मडावी यांच्या उपस्थितीत विभागाअंतर्गत येणाऱ्या सर्व कार्यालये, महामंडळे येथील सर्व कर्मचारी, अधिकारी यांनी संविधान दिवस साजरा केला.  यावेळी  जिल्हा समाज कल्याण अधिकारी श्री. राज एडके यांनी सर्व कर्मचाऱ्यांना संविधान उद्देशिकेचे वाचन करुन शपथ दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या  प्रतिमेचे पुजन करुन सर्व कर्मचाऱ्यांनी संविधान उद्देशिकेचे वाचन केले. यावेळी  अमोल घुगे , श्रीकांत घुले, लक्ष्मण बाजगजे, प्रमोद सानप यासह अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.

No comments:

Post a comment