तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 6 November 2019

परळी तालुक्यातील तलावांची गळती थांबवा अन्यथा आंदोलन-प्रा.डॉ.मधुकर आघाव

 वैजनाथ (प्रतिनिधी) ः-
परतीच्या पावसामुळे परळी तालुक्यातील छोटे मोठे तलाव पाण्याने भरले असुन तलावातील हे पाणी शेतकर्‍यांच्या किंवा पिण्याच्या पाण्यासाठी उपयोगी ठरण्याची शक्यता कमी आहे. या तलावातुन मोठ्या प्रमाणात गळती सुरु असल्याने पाण्याची नासाडी होत असुन ही गळती त्वरीत थांबवावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा जि.प.सदस्य प्रा.डॉ.मुधकर आघाव यांनी दिला आहे.
तालुक्यातील बोरणा मध्यम प्रक्लप, चांदापुर व गुट्टेवाडी या प्रकल्पातुन सध्या मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत आहे. गतवर्षीच्या कमी पावसामुळे उन्हाळ्यात या तलावात अत्यल्प पाणीसाठा होता. त्यावेळी पाटबंधारे विभागास गळती होणारे पाणी रोखण्यासाठी आवश्यकत्या उपाययोजना कराव्यात या बाबत वेळावेळी तोंडी सुचना केल्या होत्या. परंतु पाटबंधारे विभागाने या बाबत कुठलीच कारवाई केली नसल्याने सध्या परतीच्या पावसामुळे भरलेल्या या तलावातुन मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होत आहे. या पावसामुळे शेतकर्‍यांचे काढणीस आलेले पिक वाया गेले असले तरी तलावातील पाण्यामुळे पुढील हंगामातील पिक घेता येईल अशी आशा निर्माण झाली आहे. या बरोबरच संकटकाळी पाणी पुरवठ्यासाठी या तलावातील पाणीसाठा उपयुक्त आहे. परंतु तलावातुन होत असलेल्या गळतीमुळे पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे. जि.प.सदस्य प्रा.डॉ.मधुकर आघाव व जि.प.वडगाव गटातील अनेक गावामधील शेतकर्‍यांनी उपकार्यकारी अभियंता पाटबंधारे उपविभाग अंबाजोगाई यांना निवेदन दिले असुन या निवेदनावर पुढील आठ दिवसात गळती थांबविण्याचे आवश्‍वासन पाटबंधारे विभागाकडुन देण्यात आले आहे. येत्या आठ दिवसात ही गळती थांबविली नाही तर पाटबंधारे विभागाच्या कार्यालयापुढे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा प्रा.डॉ.मधुकर आघाव यांनी दिला आहे.

No comments:

Post a comment