तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 2 November 2019

पदवीधर मतदार संघ निवडणुकीसाठी जिल्ह्यातील पदवीधर मतदारांची नोंदणी करावी
बीड (प्रतिनिधी) :- विधान परिषद पदवीधर मतदार संघ निवडणुकीसाठी जिल्ह्यातील पदवीधर मतदारांची नोंदणी व्हावी यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्यात येत आहेत .  जिल्ह्यातील पदवीधर मतदारांची नोंदणी प्रमाण वाढावे यासाठी शासकीय कार्यालयांमधील  मोठ्या संख्येने असलेल्या पदवीधर अधिकारी कर्मचारी मतदारांची नोंदणी वेगात व्हावी  शासकीय कार्यालयांच्या प्रमुखांनी त्यांच्या आस्थापनेवर असलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची परिपूर्ण नोंदणी अर्ज सादर करावेत असे निर्देश जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी दिले.
     महाराष्ट्र विधान परिषद , 05- औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघ मधील मतदार नोंदणी कार्यवाहीचा आढावा जिल्हाधिकारी तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी आस्तिक कुमार पांडेय यांनी घेतला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार , अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत सुकटे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रवीण धरमकर, उपविभागीय अधिकारी नामदेव टिळेकर, शोभा ठाकूर यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी म्हणाले, पदवीधर मतदार संघ निवडणुकीच्या वेळी जिल्ह्यात  71 हजार मतदार नोंदणी झाली होती .यावेळी सार्वत्रिक विधानसभा निवडणूक आणि विविध कारणांमुळे मतदार नोंदणीची प्रक्रिया पूर्ण होण्यास सहा दिवस बाकी असताना देखील आत्तापर्यंत जिल्ह्यात 21 हजार मतदारांनी नोंदणी केली आहे. हे प्रमाण मागच्या तुलनेत कमी असल्यामुळे मोठ्या प्रमाणात पदवीधर मतदारांची नोंदणी होण्याची आवश्यकता आहे .या नोंदणीसाठी शासकीय विभागांच्या कार्यालय प्रमुखांवर जबाबदारी देण्यात येत असून त्यांच्या अधिनस्त असलेले अधिकारी-कर्मचारी तसेच शिक्षण संस्था , मंडळे, बॅका  आदींच्या मधील पदवीधर मतदारांची नोंदणी तातडीने केली जावी असे जिल्हाधिकारी श्री. पाण्डेय यांनी सांगितले. 
याप्रसंगी श्री धरमकर यांनी मतदार नोंदणी  प्रक्रिये बाबत सादरीकरण  केले. तसेच जिल्ह्यातील बीड तहसील अंतर्गत मंडळ अधिकारी श्री राख यांनी आतापर्यंत उत्कृष्ट काम करीत 7 हजार 628 पदवीधर मतदारांची अर्ज नोंदणी पूर्ण केल्याने जिल्हाधिकारी श्री पांडेय यांनी त्यांचे अभिनंदन केले. यावेळी विविध शासकीय विभागांना पदवीधर मतदार नोंदणीसाठी उद्दिष्ट निश्चित करून देण्यात आले . यामध्ये राज्य परिवहन महामंडळ ,पोलीस विभाग,  जिल्हा समाज कल्याण कार्यालय, जिल्हा परिषद अंतर्गत शिक्षण विभाग  यासह विविध कार्यालय प्रमुखांना सूचना देण्यात आली
यावेळी मतदार नोंदणी साठी उपविभागीय अधिकारी व तहसीलदार हे देखील सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा पदनिर्देशित अधिकारी असून त्यांनी मतदार नोंदणीचे अर्ज स्वीकारावेत तसेच मंडळ अधिकारी हे यासाठी पदनिर्देशित अधिकारी आहेत.  याच बरोबर पदवीधर मतदार नोंदणीसाठी शासकीय कार्यालयाच्या आस्थापनांवर असणाऱ्या मतदारांचे अर्ज भरून घेण्यात घेताना त्यांच्या पदवी प्रमाणपत्राची प्रत आवश्यक नसून त्यांच्या सेवापुस्तकातील पदवीच्या नोंदणी द्वारे शेडूल 3 मध्ये प्रमाणपत्र कार्यालय प्रमुख यांनी द्यावे . त्याबरोबर मतदारांनी पासपोर्ट आकाराचा फोटो, पूर्ण भरलेला अर्ज फॉर्म नमुन्यात द्यावा असे सांगण्यात आले . अधिक माहितीसाठी निवडणूक आयोगाचे मोबाईल ॲप( eci app ) चा वापर करुन व्होटर हेल्पलाईन(voter helpline) डाऊनलोड करावे असे श्री धरमकर यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment