तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 28 November 2019

महाविकास आघाडीकडून सेलूत जल्लोषसेलू ( जि.परभणी )/ प्रतिनिधी : राज्यात महाविकास आघाडीचे नेते उध्दव ठाकरे हे नवे मुख्यमंत्री होणार असल्याचे स्पष्ट होताच बुधवारी ( २७ नोव्हेंबर ) महाविकास आघाडीतर्फे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष साजरा करण्यात आला.
राज्यात सत्ता स्थापनेचा एक महिन्यापासून गोंधळ सुरू होता. अखेर महाआघाडीचे नेते उध्दव ठाकरे हे गुरुवारी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याने मिठाई वाटून शिवसेना, राष्ट्रवादी व कॉंग्रेस या तीनही पक्षातर्फे आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी शिवसेनेचे माजी आमदार हरिभाऊ लहाने, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष  हेमंतराव आडळकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम सभापती अशोक काकडे माजी नगराध्यक्ष पवन आडळकर,संदिप लहाने, संभाजी पवार,रहीम  पठाण,अविनाश शेरे,रघुनाथ बागल ,विनॊद तरटे चक्रधर पौळ,रणजित गजमल,मिलींद सावंत, इरफान जमीनदार,शेख दिलावर आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वृत्तांकन :बाबासाहेब हेलसकर

No comments:

Post a comment