तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 4 November 2019

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज गोपीनाथगडावरपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- राज्यात मुख्यमंत्री पदावरुन मोठा राजकीय पेच निर्माण झाला आहे.आणि हा पेच सुटण्यास तयार नाहीये.शिवसेना आणि भाजप दोन्ही पक्ष मुख्यमंत्री पदावर अडून बसले आहेत.याच दरम्यान शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे हे उद्या थेट परळी मार्गे बीड जिल्हात अवकाळी पावसाने झालेल्या पीक नुकसानीची पाहणी करण्यासाठी येत आहेत.

याच दरम्यान,परळी येथील भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे समाधीस्थळ असलेल्या गोपीनाथगड येथे दर्शनासाठी येत आहेत.त्यामुळे,राजकीय वर्तुळात विविध तर्क वितर्कांना उधाण आले आहे.गोपीनाथ मुंडे यांच्या अकाली मृत्यूनंतर पंकजा मुंडे आणि उध्दव ठाकरे यांचे भावाबहिणीचे असलेले संबंध राज्याला सर्वक्षृत आहेत. त्यामुळे,सत्तास्थापनेचा घडामोडीच्या दरम्यान उध्दव ठाकरे हे गोपीनाथगडावर येत असल्यामुळे याला चांगलेच महत्व प्राप्त झाले आहे.

No comments:

Post a comment