तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 20 November 2019

याेगेश्वरी शुगर्सच्या अठराव्या गाळप हंगामाचा शुभारंभ


प्रतिनिधी
पाथरी:-तालुक्यातील लक्ष्मीनगर लिंबा येथिल याेगेश्वरी शुगर्सच्या अठराव्या बॉयलर अग्नी प्रदिपन आणि गाळप हंगामाचा शुभारंभ बुधवार २० नाेहेंबर राेजी यज्ञश्वर सेलूकर महाराज यांच्या हस्ते संपन्न झाला.

या वेळी या कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक राेहित आर देशमुख यांच्या सह एम टी देशमुख, राहूल सेठ सामत,लक्ष्मीकांतराव घाेडे, सुदामराव सपाटे,गंगाधरराव गायकवाड, आश्राेबा कडपे, पंडितराव पांगरकर, इंदरराव कदम,श्रीनिवासलालजी मुंदडा,नारायणराव सातपुते, सचिन देशमुख, मनाेज देशमुख, ज्ञानेश्वर देशमुख यांची उपस्थिती हाेती. या वेळी बाेलतांना राेहित देशमुख म्हणाले की, याेगेश्वरी शुगर्स ने नेहमी ऊस उत्पादक शेतकरी,कामगार यांचे हित जाेपासले आहे. प्रतिवर्षी या साखर कारखाण्याने ऊस उत्पादकांना सर्वाधिक दर देण्याची परंपरा कायम ठेवली असून या पुढेही शेतकरी हितालाच प्राधान्य देणार असून या वर्षीच्या हंगामा साठी या भागातील शेतक-यांनी आपला उस याेगेश्वरी शुगर्सलाच देण्याचे आवाहन केले.या कार्यक्रमा साठी उस उत्पादक शेतक-यां सह,उसताेड मुकादम,कामकार कारखाण्याचे अधिकारी कर्मचारी यांची माेठ्या संखेने उपस्थिती हाेती कार्यक्रमाचे आभार जनरल मॅनेजर पी एस देशमुख यांनी मानले.

No comments:

Post a comment