तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 5 November 2019

पिक नुकसान सर्वे, पंचनामा याची मुदत वाढवावी-प्रविण पट्टेबहादूर
महसूल विभागाकडे मागणी 

फुलचंद भगत
वाशिम- सद्या महाराष्ट्र राज्यात मागील पंधरा दिवसांत मोठ्या प्रमाणात विविध जिल्ह्यात अक्षरशः परतीच्या पावसाने थैमान घातल्याने शेतकऱ्यांच्या तोंडी आलेला घास या अस्मानी संकटाने हिरावल्याने बळीराजावर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे.परंतु या संकटातून बळीराजाला बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकार,राज्य सरकार आपल्या स्तरावरून मदत करण्यासाठी कटीबद्द आहे.त्यांनी विविध विभागाला तसे आदेश देऊन विविध पिंकाचे झालेले नुकसान याबाबत प्रत्यक्ष शेतकरी यांच्या बांधावर जाऊन आपण नुकसानीचा सर्वे, पंचनामा करावा आणि झालेल्या नुकसानीचा अहवाल सादर करावा अश्या सूचना शासनाने दिल्या आहेत.मात्र हा पिक नुकसान झालेल्या पिंकाचा सर्वे, पंचनामा करण्यासाठी प्रत्यक्ष शेतात जावे लागत असल्याने त्या विभागात असलेल्या तलाठी,कृषी सहाय्यक यांना अनेक शेतात जाण्यासाठी चिखल अडथळा ठरत आहे.अनेक शेतात जाण्यासाठी विलंब होत आहे.यामुळे महसूल विभागाने ही सर्वे, पंचनामा करण्याची मुदत वाढवण्याची शेतकरी हिताची आग्रही मागणी केकतउमरा येथील कृषी विभागाचे कृषी मित्र प्रविण पट्टेबहादूर यांनी महसूल विभागाकडे प्रसिद्धीपत्रकातून केली आहे.

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206,9763007835

No comments:

Post a Comment