तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 25 November 2019

नेकनूर येथे महाराष्ट्र केसरी जिल्हा निवड चाचणी कुस्ती स्पर्धस कुस्ती मल्लांनी मोठ्या संख्येने सहभागी घ्यावा-पै.मुरलीधर मुंडे

 पर
ळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  बीड जिल्ह्यातील नेकनूर येथे महाराष्ट्र केसरी जिल्हा निवड चाचणी कुस्ती स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धमध्ये कुस्ती मल्लांनी मोठ्या संख्येने सहभागी घ्यावा असे आवाहन महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे परळी तालुकाध्यक्ष पैहलवान मुरलीधर मुंडे यांनी केले आहे. दरम्यान बीड जिल्ह्यातील केसरी या र्स्प्धेत गोल्ड मॅडल मिळणार्‍या पहेलवानांना मानधन म्हणून एक वर्षासाठीदोन हजार रुपये महिना कुस्तीगिर परिषद परळीच्या वतीने करणार असल्याची माहिती श्री. मुंंडे  यांनी दिली. 


    याबाबत सविस्तर माहिती अशी की, पुणे येथे महाराष्ट्र केसरी व राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेचे आयोजन कुस्तीगिर परिषदेने केले आहे. या स्पर्धेच्या महाराष्ट्र केसरी जिल्हा निवड चाचणी कुस्ती स्पर्धाचे नेकनूर येथे 07 डिसेंबर रोजी या कुस्ती स्पर्धा होणार आहेत.  
     महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी निवड चाचणी कुस्ती स्पर्धा  होणार आहेत. माती व गादी विभागात होणाऱ्या या स्पर्धेत  57, 61, 65, 70, 74, 79, 86, 92, 97, व महाराष्ट्र केसरी गट 86 ते 125  असे वजन गट असतील. पुणे येथे होणाऱ्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी बीड जिल्हाचा संघ या स्पर्धेमधुनच निवडला जाणार आहे. 
 या स्पर्धेची जय्यत तयारी करण्यात आली असून स्पर्धकांसोबत आधारकार्ड असणे बंधनकारक आहे. तसेच फड सुरू होण्यापूर्वी सकाळी 8 ते 12 पर्यंतच पहेलवानांची नोंदणी व वजन घेतले जाणार आहे. स्पर्धेत पंचांचा निर्णय हा अंतिम असेल. तसेच गैरवर्तन करणाऱ्या खेळाडूंवर कुस्तीगीर परिषद कार्यवाही करेल आशा कडक सूचना देण्यात आल्या आहेत.  अतिशय शिस्तबद्ध वातावरणात होणारा हा कुस्त्यांचा थरार पाहण्यासाठी कुस्ती शौकीन मंडळींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. या होणाऱ्या कुस्ती स्पर्धेस बीड जिल्ह्यातील व तालुक्यातील मल्लांनी व कुस्ती शौकीन मंडळींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे व बीड जिल्ह्यातील जिल्हा कमेटी व  तालुकाध्यक्षकुस्तीगीर परिषदचे सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. तरी आर्वजुन सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे परळी तालुकाध्यक्ष पैहलवान मुरलीधर मुंडे यांनी केले आहे.

*******************

जिल्ह्यातील केसरी या स्पर्धेत गोल्ड मॅडल मिळणार्‍या पहेलवानांना दोन हजार रुपये मानधन एक वर्षासाठी सुरू करणार- मुरलीधर मुंडे 

बीड जिल्ह्यातील व सर्व तालुक्यातील कुस्ती खेळांडुंनी २०१९-२० मध्ये होणार्‍या महाराष्ट्र केसरी या स्पर्धेत गोल्ड मेडल मिळणार्‍या कुस्ती खेळांडुंनाचा एक वर्षाचा खर्च म्हणून महाराष्ट्र राज्य तालुका कुस्तीगीरच्या वतीने दोन हजार रुपये मानधन सुरु करण्यात येणार असल्याची माहिती कुस्तीगिर परिषदेचे तालुकाध्यक्ष मुरलीधर मुंडे यांनी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे. बीड जिल्ह्यातील  कुस्ती पैलवानासाठी प्रोत्साहन मिळावे म्हणुन महाराष्ट्र राज्य कुस्तीगिर परिषदेच्या वतीने दरवर्षी होणार्‍या २०१९-२० या वर्षातील महाराष्ट्र केसरी या स्पर्धेमध्ये कुस्ती पैहलवान यांना तो त्या वजन गट मध्ये असेल त्या गट मध्ये गोल्ड मॅडल मिळवेल अशा पैहलवानांचा पुढील एक वर्षाचा खर्च परळी शाखा महाराष्ट्र राज्य तालुका कुस्तीगिर परिषदेच्या वतीने दोन हजार रुपये मानधन म्हणून करण्यात येणार आहे  महाराष्ट्र राज्य तालुका कुस्तीगिर परिषद शाखा परळीकडे संपर्क साधावा अशी माहिती  परिषदेचे तालुकाध्यक्ष मुरलीधर मुंडे यांनी दिली आहे. 

No comments:

Post a comment