तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 7 November 2019

कोहलीच्या प्रेमाची विराट गाथा " प्रेम म्हणजे काय

 असतं, जसं तुमचं आमचं सेम असतं " हे मंगेश पांडगांवकरांच्या गीताची आठवण करून देणारी कहाणी आज आपल्या वाचनात येत आहे. प्रेम कोणीही, कोणावरही करू शकते, त्याला वयाची, जातीची, सिमांची कसलीही मर्यादा मान्य नसते. अशीच एक प्रेम कहाणी भारतीय क्रिकेटचा कोहिनूर हिरा, सचिन तेंडुलकरचे विक्रम नजरेच्या टप्प्यात असलेल्या विराट कोहलीची आहे.
              विराट कोहलीने आपल्या सहजसुंदर खेळाने जसे अनेक विक्रम पादाक्रांत केले अगदी त्याच्या कित्येक पट वेगाने जगभरात स्वतःचे अनेक चाहते निर्माण केले आहेत. त्यामध्ये पुरुषांबरोबरच सुंदर तरुणींचा भरणाही फार मोठा आहे. आपल्याला माहिती आहेच विराट कोहलीने बॉलीवूड चित्रपट अभिनेत्री अनुष्का शर्माशी विवाह केला. त्यापूर्वी ३ ते ४ वर्ष त्यांचे प्रेम प्रकरण सर्वत्र चर्चेचा विषय ठरले होते. " कधी ब्रेकअप तर कधी पॅचअप करत " या दोघांनी दोन वर्षापूर्वी प्रत्यक्ष लग्न करून एकदाचा या बहुचर्चीत प्रेम प्रकरणावर पडदा टाकला. तेही भारतात नव्हे तर थेट माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधीची सासुरवाडी असलेल्या इटलीत जाऊन.
                          इंग्लंड महिला क्रिकेट संघातील यष्टीरक्षक फलंदाज असलेली सारा टेलर अतिशय देखणी मुलगी होती. ती विराटवर एकतर्फी प्रेम करायची.  सन २०१६ मध्ये स्वतः सारा टेलरने आपल्या ट्विटर अकौंटवर ट्वीट करून विराट कोहलीला लग्नाचा प्रस्ताव मांडला होता.  "ती विराटच्या खेळाची मोठी प्रशंसक असून तिला तो खूप आवडतो. " असं तिने म्हटलं होतं. परंतु त्यावेळी विराट कोहलीची आई सरोज कोहली यांनी या गोष्टीला विरोध केला होता. त्यावेळी त्यांनी स्पष्ट केले होते की, विराट खेळावर लक्ष केंद्रित करू इच्छितो. खरं तर त्यावेळी विराट अनुष्काच्या प्रेमात पुरता गुरफटला होता. वास्तविक पाहता सारा अनुष्का पेक्षा दिसण्यात कितीतरी पट उजवी आहे.
              सारा विराटवर अतोनात प्रेम करायची. त्याच्या संगती लग्नाचे स्वप्नही रंगवत होती. तिला या गोष्टीचा मोठा त्रास झाला. विराटचे लग्न झाल्यानंतर त्याने अनुष्का सोबतचा लग्नाचा फोटो ट्वीटरवर टाकला तेंव्हा त्यांना शुभेच्छा देणाऱ्यात साराचाही समावेश होता. यावरुन लक्षात येते की, ती विराटला मनोमन पसंत करत होती. सरोज कोहलींनी नकार दिला नसता तर सारा टेलर मिसेस कोहली बनली असती.
              या दोन प्रेम घटनांपूर्वी विराट एका परदेशी अभिनेत्रीच्या प्रेमात पडला होता. ती सुंदर ललना होती ब्राझिलियन मॉडेल इजाबेल लिटे. बॉलीवूडमध्येही चित्रपटात तिने भूमिका साकारल्या होत्या. इजाबेल लिटेने सन २०१२ मध्ये अमिरखानच्या "तलाश " या चित्रपटापासून आपल्या करिअरला सुरूवात केली होती. त्यानंतर २०१६ ला तिने " सिक्सटीन" हा चित्रपटही केला.
           या ब्राझिलीयन परीने सन २०१४ मध्ये एक इंटरव्यूव्हमध्ये दावा केला होता की ती व विराट "लिव्ह इन रिलेशनशीप " मध्ये दोन वर्ष राहीले. पुढे जात उभयांतानी स्वखुषीने दूर होण्याचा निर्णय घेतला.
सन २०१२ मध्ये प्रकाशात आलेली गोष्ट अशी विराट व इजाबेल सिंगापूरमध्ये शॉपिंग करत होते. त्यावेळी इजाबेलला कोणीही ओळखत नव्हते. त्या नंतरच तिचा पहिला चित्रपट " तलाश " रिलीज झाला.
            इजाबेलच्या एका जवळच्या व्यक्तीने दिलेल्या माहिती नुसार हे दोघे जण सिंगापूरमध्ये एका जाहीरातीच्या चित्रीकरणावेळी प्रथम भेटले. विराट आपले खाजगी जीवन प्रकाशात येणार नाही याची खूप दक्षता घ्यायचा त्यामुळेच इजाबेलसमवेत सार्वजनिक ठिकाणी फिरत नव्हता.
 लेखक : -दत्ता विघावे 
क्रिकेट समिक्षक.
इंटरनॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट, मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल प्रतिनिधी भारत.Email:  dattavighave@gmail.comमोबाईल. ९०९६३७२०८२.

No comments:

Post a comment