तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 26 November 2019

श्री.सरस्वती विद्यालय संविधान दिन साजरा


ळे सर्व नागरिकांचे जीवन उजळून निघाले - प्रा . माधव रोडे

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- श्री .  सरस्वती विद्यालयात भारतीय संविधान दिना निमित्ताने संविधान दिन मोठया उत्साहत साजरा करण्यात आला.  संविधान दिनानिमित्ताने निबंध, वक्तृत्व सह विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले . संविधान उद्देशीकेचे सामुहिक वाचन करण्यात आले . यावेळी कार्यक्रमचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा . डॉ . माधव रोडे होते. तर कार्यक्रमाचे अध्यकस्थानी मुख्याध्यापक  सुधिर मिसाळ, तर व्यासपीठावर पर्यवेक्षक श्रीहरी तांबडे, राहुल मुंडे, रवी गुळभिले , अविनाश तांदळे, गजकोश सर उपस्थितीत होते . त्यावेळी  प्रमुख पाहुणे म्हणुन बोलताना प्रा . डॉ . माधव रोडे म्हणाले, " भारतीय संविधान तत्व जीवन आचरणात आणणे हिच राष्ट्र निष्ठा असून , त्याचे पालन करणे म्हणजे खरी संविधान निष्ठा होय. स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय तत्व हेच संविधाना तत्व राष्ट्रीय एकात्मतेचा प्राण आहे . भारतीय राज्यघटनेमुळे भारतातील सर्व नागरिकांचे जीवन उजळून निघाले आहे, निघत आहे. घटनात्मक सर्व अधिकार संविधानामुळे आज सर्वांना मिळाले आहेत. भारतीय संविधान हे सर्व खाजगी, सार्वजनिक व मित्र क्षेत्राला मार्गदर्शन व प्रोत्साहन देणारे आहे. मुलभूत अधिकार, समानता, मतदान अधिकार हे मोलाची देण संविधानाने दिली . संविधानामुळे भारतीय राज्यव्यवस्थेला सुदृढ, सक्षम, समर्थ बनवून प्रचंड ऊर्जा व शक्ती लाभली आहेया कार्यक्रमाचे प्रस्ताविक पर्यवेक्षक श्रीहरी तांबडे, यांनी केले . सुत्रसंचलन बाळासाहेब, राठोड सर , आयोजनास सहकार्य आविनाश तांदळे,तर आभार  रवी गुळभिळे यांनी मांडले . विशेष सहकार्य श्री . गजाकोश सर - मुख्याध्यापक प्राथमिक विभाग ,  गर्जे डि .आर. , देशमाने ए.एस. , सुरवसे राम . एस. ,  , काळे ए . एस. , पुंडकरे व्ही.टी.  , केंद्रे एन.एम. , सिरसाट डि .बी.  , वडुळकर जे.डी. , जाधव डि.व्ही. ,  दहिफळे , ताटे, बक्षी मॕडम , बनसोडे मॕडम , महाजन मॕडम , तौर मॕडम , भुतडा मॕडम व सर्व  शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी नी सहभाग घेतला .

No comments:

Post a comment