तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 3 November 2019

संकटाच्या परिस्थितीत शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी


पालकमंत्री डॉ संजय कुटे
. कृषी मित्रांनी गावातच पीक नुकसानीचे शेतकऱ्यांचे पीक विमा अर्ज भरून घ्यावे
. पंचनामे पुढील तीन दिवसात पूर्ण करावे
. तालुकानिहाय पालकमंत्र्यांनी घेतला नुकसान परिस्थितीचा आढावा
. सिंदखेड राजा तालुक्यातील पुरात वाहून गेलेल्या व्यक्तींना तातडीने मदत द्यावी
. खामगांव तालुक्यात मृत पडलेल्या मेंढ्यांची मदत देण्यात यावी
बुलडाणा. : जिल्ह्यात संततधार पडलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान केले आहे. शेतकरी सध्या हवाल दिल झाला आहे. अशा संकटसमयी शेतकऱ्यांनी घाबरून जावू नये, शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. तरी नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे यंत्रणांनी पुढील तीन दिवसात पूर्ण करून शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी, असे निर्देश पालकमंत्री डॉ. संजय कुटे यांनी आज दिले.
   जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पीक नुकसानीसंदर्भात आढावा बैठकीचे आयोजन आज 3 नोव्हेंबर रोजी करण्यात आले. त्यावेळी आढावा घेताना ते बोलत होते. याप्रसंगी बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड, जिल्हाधिकारी डॉ निरूपमा डांगे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नरेंद्र नाईक, उपविभागीय कृषि अधिकारी संतोष डाबरे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे आदी उपस्थित होते.
   विमा काढलेल्या शेतकऱ्यांचे नुकसानीचे अर्ज कृषी मित्रांमार्फत गावातच भरून घेण्याचे सूचित करीत पालकमंत्री श्री. कुटे म्हणाले, शेतकऱ्यांनी पिक विम्याचे नुकसानीचे अर्ज भरण्यासाठी कुठेही जाण्याची गरज नाही. विमा कंपनीने अत्यंत जबाबदारीने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी.  जिल्ह्यात सोयाबीन, ज्वारी व मका पिकाची १०० टक्के हानी झाली आहे.  त्यामुळे या पिकांचे पंचनामे तत्काळ पूर्ण करावे.  पंचनामे करताना अतीतपशीलवार न जाता सरसकट  पूर्ण करावे.  नुकसान झालेल्या तूर पिकाचा विमा काढला असल्यास कंपन्यांनी नुकसान ग्राह्य धरून तूर उत्पादक शेतकऱ्यांनाही मदत द्यावी. सर्वे करताना अतिवृष्टी हा निकष नाही. त्यामुळे महसूल मंडळ अतिवृष्टीग्रस्त आहे काय या निकषाचा विचार करू नये. हा अवकाळी पाऊस असल्यामुळे या नुकसानीसाठी सदर निकष लागूच होत नाही.
  ते पुढे म्हणाले, ज्या शेतकऱ्यांनी संबंधित पिकाचा विमा काढला आहे, त्यांना पिक विम्याची व एनडीआरएफची मदत अशी दोन्ही मिळणार आहे. तसेच ज्यांनी विमा काढला नाही, त्यांना राष्ट्रीय आपत्ती निवारण प्रबंधनाकडून मिळणारी मदत मिळेल. त्यामुळे कुणीही मदतीपासून वंचित राहणार नाही. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना परिपूर्ण आर्थिक मदत देण्यात येईल. विमा कंपनी व प्रशासनाने सहकार्याने पंचनामे पूर्ण करून शेतकऱ्यांना मदत मिळण्याची कार्यवाही पूर्ण करावी. विमा न काढलेल्या पिकांचेही पंचनामे पूर्ण करावे.  सर्व चारा उत्पादक पिकांचे पावसामुळे नुकसान झाल्यामुळे भविष्यात चारा टंचाईला सामोरे जावे लागणार आहे. मका, ज्वारी व सोयाबीन पिकांपासून मिळणारा चारा मिळणार नसल्यामुळे याबाबत आतापासून नियोजन करून उपाययोजना कराव्यात. शेतकऱ्यांना चारा उत्पादक पिकांचे बियाणे वितरित करावे. यासाठी जिल्हा नियोजन समितीचा निधी लागल्यास तोसुद्धा देण्यात यावा. शेतकऱ्यांनी शेतातच चारा पिकांचे ‘प्लॉट’ घेवून चारा घ्यावा.  असे  आवाहनही त्यांनी यावेळी केले.
  प्रकल्पातून पाणी सोडतांना पूर बाधित होवू शकणाऱ्या गावांची काळजी घेण्याच्या सूचना करीत पालकमंत्री म्हणाले, प्रकल्पातून पाणी सोडताना बाधित गावात जावून तेथील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवावे. तसेच कुठल्याही प्रकारची हानी होणार नाही याची काळजी घ्यावी. सिंदखेड राजा तालुक्यातील कोहळ येथील रवी बाबुराव गायकवाड वय 33 व नारायण संतोष गायकवाड वय 31 वर्ष ही दोन व्यक्ती पुराच्या पाण्यात वाहून गेली आहेत. त्यांचे शोधकार्य सुरू आहे. त्यांच्या कुटंबीयांना तातडीने मदत देण्यात यावी. तसेच अवकाळी पावसाने पडझड झालेल्या घरांचा सर्वे पूर्ण करून तातडीने आर्थिक मदत द्यावी. यावर्षी रब्बीचे क्षेत्र वाढणार आहे. त्यामुळे महावितरणने प्रत्येक तालुक्यात पाच रोहीत्र स्टँण्ड बाय ठेवावी. जेणेकरून रोहीत्र नादुरूस्त झाल्यास तातडीने ते उपलब्ध करून देता येईल. ते पुढे म्हणाले, खामगांव तालुक्यात मेंढ्यांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या मृत मेंढ्यांचा तातडीने पंचनामे अथवा शव विच्छेदन करून संबंधितांना आर्थिक मदत मिळवून द्यावी.
 पालकमंत्री यांनी संग्रामपूर तहसील कार्यालय येथे संग्रामपूर व जळगाव जामोद,  शेगाव येथे  खामगाव व शेगाव, नांदुरा येथे मलकापूर व नांदुरा,  मोताळा येथे  तालुक्याची,   बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयात बुलडाणा तालुका व संपूर्ण जिल्ह्याची, चिखली येथे चिखली तालुका,  मेहकर येथे मेहकर व लोणार, 

No comments:

Post a comment