तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 26 November 2019

तालुक्यातील शेतकर्‍यांना नुकसार भरपाई देण्याची छावा संघटनेची मागणीपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) ः- परळी तालुक्यात परतीच्या पावासाने नुकसान झालेल्या शेतकर्‍यांच्या पिकांची शासनाने तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी छावा संघटनेचे परळी तालुकाध्यक्ष साईराजे देशमुख यांनी केली आहे.
परतीच्या पावसामुळे परळी तालुक्यातील सोयाबीन, कापुस, ज्वारी या पिकांचे मोठे नुकसान झाले असुन या पावसामुळे तालुक्यात ओला दुष्काळ जाहिर करुन शेतकर्‍यांना भरीव मदत द्यावी अशी मागणी छावा संघटनेच्या वतीने तहसिलदार परळी यांना जिल्हाध्यक्ष विशाल श्रीरंग यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकाध्यक्ष साईराजे देशमुख, सागर बुंदिले, भागवत गावडे, ओमकार देशमुख, बंडु बुनबुणे यांनी केली आहे.

No comments:

Post a comment