तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 3 November 2019

आगामी निवडणुकीवर डोळा ठेवुन काॅग्रेस पदाधिकारी मंगरुळपीर येथील नुकसानग्रस्त शेतकर्‍यांच्या भेटीला शेतात...
काॅग्रेस पदाधिकार्‍यांचा नौटंकी दौरा?

फुलचंद भगत
मंगरुळपीर-वाशिम जिल्ह्यात पुर्णतः खिळखिळी झालेली काॅग्रेसची टिम आता राजकारणात नवनविन फंडे राबवत असल्याचे सध्या चिञ पाहावयास मिळत आहे.परतिच्या पावसात शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान झाले असुन सरकारी यंञणाही मोठ्या जोमाने शेतकर्‍यांच्या मदतीसाठी धावत आहेत.शासकीय स्तरावरुन मदतही जाहीर झाली,या परिस्थीतीत शेतकर्‍यांना सर्वतोपरी शासन मदत करन्यात कटिबध्द असल्याचे सांगुन नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामेही सुरु झालेत.परंतु लोकसभा नंतर विधानसभेतही हाताशी काही न लागलेल्या काॅग्रेस पक्षाला आगामी जि.प.आणी पं.स.निवडणुकीत काहीतरी मुद्दा आवश्यक असल्यानेच मंगरुळपीर तालुक्यातील हिरंगी येथे शेतकर्‍यांच्या शेतात भेटीचा कार्यक्रम आखुन काॅग्रेसने फक्त नौटंकी केली अशी शेतकर्‍यामध्ये कुजबुज असल्याने काॅग्रेस खरच शेतकर्‍यांच्या पाठीशी आहे की शेतकर्‍यांच्या पावसाने झालेल्या नुकसानीचे राजकारण करत आहे?असे प्रश्नही मंगरुळपीर तालुक्यातील शेतकरी विचारत आहेत.वाशिम जिल्ह्यात काॅग्रेसमधे  तेच ते चेहरे दिसतात,कामही पाहिजे तसे नाही,निवडणुक आली की वेळेवर ऊगवलेल्या पिकासारखे पदाधिकारी दिसतात त्यामुळे लोकांच्या नजरेतुन काॅग्रेस पुर्णतः ऊतरल्याचीही दबक्या आवाजात चर्चा रंगली होती.शेतकर्‍यांच्या आसवांचेही राजकारण करणार्‍या काॅग्रेसला लोक कीती लाईक करतात हे झालेल्या निवडणुकीच्या निकालावरुन तर स्पष्टच झाले आणी पुढेही असेच होईल का हे पाहणे ऊचित ठरणार असल्याचे लोक बोलत आहेत.

फुलचंद भगत
मंगरूळपीर/वाशिम
मो.8459273206,9763007835

No comments:

Post a Comment