तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 3 November 2019

एकबुर्जी प्रकल्पातील सांडव्यावर पर्यटकांनी सावधगिरी बाळगावी जलदुत प्रविण पट्टेबहादूर यांचे आवाहनफुलचंद भगत
वाशिम- महाराष्ट्रात राज्यातील अनेक जिल्ह्यात सद्या परतीच्या पावसाने मागील काही दिवसापासून थैमान घातले आहे.यामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. शेतात सोयाबीन गंजी लावून असलेल्या त्या सुध्दा वाहून गेल्याच्या अनेक ठिकाणी घटना घडल्या.त्याचबरोबर शेतातील सोंगणी करून टाकलेले पीक देखील हातातून गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.या परतीच्या पावसाने जिल्ह्यातील तीन मध्यम प्रकल्पातील एक असलेला एकबुर्जी प्रकल्प या दोन तीन दिवसांत तुडूंब भरल्याने पाण्याचा विसर्ग होत आहे.या पाण्याचा विसर्ग हा सांडव्यामधून होत असल्याने याठिकाणी वाशिम तालुक्यातील अनेक पर्यटक त्या सांडव्याच्या मध्ये जाऊन मौज,मजा,आनंद फोटो सेशन,सेल्फी करत आहेत हे सर्व करत असताना सर्वांनी स्वतःची खबरदारी घेऊन सावधगिरी बाळगण्याचे जनहिताचे आवाहन वाशिम पाटबंधारे विभागाचे तालुका जलदुत प्रविण पट्टेबहादूर यांनी केले आहे.

फुलचंद भगत
मंगरूळपीर/वाशिम
मो.8459273206,9763007835

No comments:

Post a Comment