तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 8 November 2019

पुनर्रचित हवामान आधारीत फळपीक विमा योजनेमध्ये शेतक-यांनी फळपीक विमा भरण्याचे आवाहनबीड,  (जि. मा. का.) :- पुनर्रचित हवामान आधारित पीक विमा आंबिया बहारमध्ये द्राक्ष, डाळिंब, केळी, संत्रा, मोसंबी, आंबा आणि काजू या सात फळपिकासाठी 30 जिल्हयामध्ये महसूल मंडळ हा घटक धरुन राबविण्यात येत आहे. सन 2016- 17 पासून सदर योजनेची पुनर्रचना करण्यात आली आहे.  पाऊस, तापमान, सापेक्ष आर्दता, गारपीट व वेगाचे वारे या हवामन धोक्यापासून निर्धारित केलेल्या कालावधीत शेतक-यांचे विमा संरक्षणाव्दारे आर्थिक स्थैर्य आबाधीत राखण्यासाठी ही योजना आहे.

       ही योजना सन 2019-20 आंबिया बहारमध्ये चारही जिल्हा समुहांसाठी भारतीय कृषी विमा कंपनीमार्फत राज्यात राबविण्यात येत आहे. अधिसूचित फळपिकांसाठी पीक कर्ज मर्यादा मंजूर आहे अशा सर्व शेतक-यांना ही योजना सक्तीची आहे व बिगर कर्जदार शेतक-यांना एच्छिक राहील.

           संत्रा व काजूसाठी अंतिम मुदत 30 नोव्हेबर आंबासाठी 31 डिसेंबर 2019 व डाळींबसाठी 14 अधिसूचित फळपिकांसाठी पीक कर्ज मर्यादा मंजूर असलेले शेतकरी यांचा फळपीक विमा करण्याची मुदत द्राक्ष केळी व मोसंबी फळपिकासाठी विमा भरण्याचा अंतिम दि. 7 नोव्हेबर 2019, जानेवारी 2020 आहे. ज्या कर्जदार शेतक-यांची अधिसूचित पिकाकरिता सदर हंगामासाठी अंतिम तारखेपर्यंत कर्जमर्यादा मंजूर असेल त्या सर्व शेतक-यांच्या क्षेत्राचा विमा विहीत मुदतीत करुन घेणे बँकाना अनिवार्य आहे.

          बिगर कर्जदार शेतक-यांची घोषणपत्रे (डिक्लेरेशन ) (बँकानी संबधित विमा कंपनीस सादर करण्याची मुदत)  दि. 15 नोव्हेबर 2019 असून या योजनेमध्ये सहभागी होण्याचा अंतिम दिनांकास शासकीय सुट्टी आल्यास सहभागाचा दिनांक पुढील कार्यालयीन कामकाजाच्या दिवसापर्यंत लागू राहील.

           कर्जदार व बिगर कर्जदार शेतक-यांसाठी पीकाचे नाव व विमा हप्ता पुढीलप्रमाणे आहे. द्राक्ष पिकासाठी  नियमित 15400 रुपये, केळी 6600 रुपये, आंबा 6050 रुपये, डाळिंब 6050 रुपये, काजू 4250 रुपये, संत्रा 3850 रुपये, मोसंबी 3850 रुपये. गारपीट द्राक्ष 5133 रुपये, केळी 2200 रुपये, आंबा 2017 रुपये, डाळींब 2017 रुपये, काजू 1417 रुपये, संत्रा 1283 रुपये,मोसंबी 1283 रुपये. एकूण विमा हाप्ता द्राक्ष 20533 रु., केळी 8800 रु., आंबा 8067 रु., डाळींब 8067 रु., काजू 5667 रु., संत्रा 5133 रु., आणि मोसंबी 5133 रुपये. या योजनेत फळ उत्पादक शेतक-यांनी मोठया प्रमाणात सहभागी व्हावे,  असे आवाहन कृषी अधिकारी यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.

No comments:

Post a comment