तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 20 November 2019

विश्वी येथे वाघाने केली रोहिची शिकार!


बुलढाणा जिल्हात वाघ एक की दोन.

विश्वी येथील गावकरी भयभीत

 तर वन विभागाने सुद्धा मान्य केले की विश्वी येतबील रोहिची शिकार वाघाणेच केली.

डोणगांव २१
घाटबोरी वन परिक्षेत्रात असलेल्या वीटखेड शेत शिवारात २० नव्हेंबरच्या सकाळी ८ वाजता दरम्यान शेतात तुरीच्या वलीत रोहीचा फडशा पडलेला दिसला तर एका शेतात वाघा सारखे दिसणारे पग मार्क दिसल्याने गावकऱ्यात खळबळ माजली तर तो हिंस्र प्राणी कोणता याची पाहणी करण्या साठी रेस्क्यू टीम सोबत वन्यजीव विभागाच्या कर्मचाऱ्यांनी विषवि येथील घटना स्थळी भेट दिली मात्र ते पग मार्क कोणत्या प्राण्याचे हे बोलणे वन विभागाने टाळले.
       मेहकर तालुक्यातील घाटबोरी वन परिक्षेत्रात येणाऱ्या ग्राम विश्वी येथील वीटखेड शेत शिवारात १७ नव्हेंबर रोजी चारा आणण्या साठी गेलेल्या माय लेकास पळसाच्या झुडपात वाघ दिसल्याने त्यांनी तेथून पळ काढला व गावात सर्वाना महिती दिल्याने संपूर्ण परिसरात वाघाची दहशत पसरली होती तर दुसरीकडे विश्वी शेत शिवारात २० नव्हेंबरच्या सकाळी ७ वाजता दरम्यान राजू नंदू राठोड यांच्या गव्हाला पाणी दिलेल्या शेतात त्यांना वाघा सारख्या प्राण्याचे पायाचे ठसे उमटलेले दिसले तेव्हा त्यांनी गावात फोन करून गावकर्यांना बोलावले अशातच  तेथून जवळच असलेल्या कननु लखमा राठोड यांच्या शेतात एक रोहीचा फडशा पडलेला दिसला तेव्हा विश्वी येथील शेतकरी मधुकर वडानकर यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना या बद्दल माहिती दिली तेव्हा वन विभागाचे वन रक्षक देशमुख व यु एस भोदने यांनी स्पॉट पंचिनामा केला व बुलढाणा येथून रेस्क्यू टीम आणि वन्य जीव विभागाचे एक्सपर्ट तेथे बोलावले मात्र यांनी हे पग मार्क कशाचे हे बोलणे टाळले अश्यात जर असलेले पग मार्क बिबटचे असते तर रेस्क्यू टीम तेथे आलीच नसती अशी चर्चा विश्वी परिसरात आहे.
   मेहकर तालुक्यात घाटबोरी वनपरिक्षेत्रात आलेला वाघ समोर निघून गेला तेव्हा हा विषवि येथे दिसणारा व रोहिचा फडशा पडलेला वाघ कोणता तो वाघ आहे की बिबट्या यावर जर गहन संशोधन केले तर निश्चितच विश्वी येथील गावकऱ्यांचा जिवात जीव येईल तर दुसरीकडे जर विश्वी येथे सुद्धा वाघ असेल तर बुलढाणा जिल्हात दोन वाघ असू शकतात.

  (शेतकरी मधुकर वडानकर यांनी वन विभागाच्या कर्मचाऱ्यास आपल्या शंका आणि शेतात नेहमी काम करीत असताना वाघाच्या भीतीने शेतीकाम होत नाही याबद्दल बोलले असता त्यांनी अजब असा सल्ला दिला वाघ दिसणे नशिबाचा खेळ आहे आणि त्यासाठी लोक पैसे खर्च करतात तुम्हाला तो फुकटात दिसत आहे शेतात जातांना हातात घुंगराची काठी घेऊन जात जा त्याने हिंस्र प्राणी पळून जातात असा सल्ला दिला)


जमील पठाण
8805381333

No comments:

Post a Comment