तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 3 November 2019

मेहकर येथे ना. डॉ. संजय कुटे यांची भेट


मेहकर :-
अवकाळी पावसामुळे मेहकर तालुका मधे सर्वच ठिकाणी पिकांचे अतोनात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे.

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानी बाबत उपविभागीय अधिकारी कार्यालय  मेहकर येथे  महसूल,कृषी,व विविध विभागाचे अधिकारी वर्गा ची तातडीची बैठक कामगार मंत्री तथा पालकमंत्री बुलडाणा
ना. डॉ. संजयजी कुटे यांनी घेतली.
सतत सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे.अनावश्यक कागदी प्रक्रिया टाळून शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई मिळावी व जिल्ह्यात एकही शेतकरी शासकीय मदतीपासून वंचित राहू नये करीता प्रशासनास
ना. डॉ. संजय. कुटे. यांनी निर्देश दिले. या वेळी कृषी विभागाचे व महसूल विभागाचे तसेच भा. ज. पा. नेते आर्जुनराव वानखेडे. अॉड. शिव ठाकरे. अन्ना लष्कर. पुरी ताई. व कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment