तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 28 November 2019

शिक्षकांनी आपापसात मैत्रीचं नातं ठेवावं : जयप्रकाश बिहाणीनूतन विद्यालयात अशोक गाजरे यांचा सेवागौरव

सेलू/ प्रतिनिधी : एकमेकांबद्दल मनात क्लेष, दुजा भाव न बाळगता, विद्यार्थी व शाळेचं हित समोर ठेवून शिक्षकांनी आपापसात मैत्रीभावाचं नातं ठेवावं, असे प्रतिपादन नूतन विद्यालयाचे सहसचिव, सेलू भूषण जयप्रकाश बिहाणी यांनी बुधवारी ( २७ नोव्हेंबर ) सेलू ( जि.परभणी ) येथे केले.

येथील नूतन विद्यालयाचे उपमुख्याध्यापक अशोक गाजरे यांचा सेवावृत्तीबद्दल संस्था व शाळेतर्फे सेवागौरव करण्यात आला. त्यावेळी श्री.बिहाणी बोलत होते.
अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव डी.के.देशपांडे, तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सहसचिव डॉ.विनायकराव कोठेकर, जयप्रकाश बिहाणी व मुख्याध्यापक अनिल कुलकर्णी, सुनिता गाजरे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
संस्थेतर्फे स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन संस्था पदाधिकार्‍यांनी, तर शाळेतर्फेही मुख्याध्यापक कुलकर्णी, उपमुख्याध्यापक मा.मा.सुर्वे , पर्यवेक्षक रामकिशन मखमले, रघुनाथ सोन्नेकर, उज्ज्वला लड्डा, तसेच जयप्रकाश बिहाणी यांनी गाजरे यांचा गौरव केला.
प्रास्ताविकातून मुख्याध्यापक अनिल कुलकर्णी यांनी श्री.गाजरे यांचा निरपेक्ष मैत्री भाव,
प्रामाणिकपणा, विद्यार्थीनिष्ठ
सेवेबद्दल गौरव केला. यावेळी डॉ.कोठेकर यांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले, तर राजेंद्र सोनवणे यांनी गुरूवर्याप्रती आदरभाव आपल्या मनोगतातून व्यक्त केला.
श्री.गाजरे यांनी सेवाकाळातील अनुभव सांगत संस्थेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली व संस्थेला एकतीस हजार रुपये देणगी दिली. अध्यक्षीय समारोप श्री.देशपांडे यांनी केला.
प्रारंभी सरस्वती पूजन करण्यात आले. सच्चिदानंद डाखोरे, गिरीश दीक्षित यांनी 'अवघा रंग एक झाला...' हे गीत सादर केले.
सूत्रसंचालन काशिनाथ पल्लेवाड यांनी, तर डॉ.संतोष मलसटवाड
यांनी आभार मानले.

फोटो :
सेलू : येथील नूतन विद्यालयाचे उपमुख्याध्यापक अशोक गाजरे यांचा बुधवारी सेवागौरव करण्यात आला. यावेळी संस्थेचे सचिव डी.के.देशपांडे, जयप्रकाश बिहाणी, डॉ.विनायकराव कोठेकर, अनिल कुलकर्णी, सुनिता गाजरे, उज्ज्वला लड्डा आदी उपस्थित होते. ( छायाचित्र : किरण फोटो )

वृत्तांकन : बाबासाहेब हेलसकर

No comments:

Post a comment