मुंबई (वृतसंस्था) :- दादर येथील शिवाजी पार्कवर १ डिसेंबरला मुख्यमंत्री पदाचा शपथविधी होणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे यावेळी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील. मुंबई महानगर पालिकेला यासंदर्भातील परवानगीसाठीचे पत्र देण्यात आले आहे.
ज्या शिवाजी पार्क बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या भाषणांनी गाजवलं. जिथे शिवसेनेचा दसरा मेळावा होतो. अशा ठिकाणी शपथविधी व्हावा अशी उद्धव ठाकरे यांची इच्छा होती. त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे ही इच्छा बोलून दाखवली होती. १ डिसेंबरपुर्वी पुढच्या चार दिवसात मंत्रिमंडळ ठरणार आहे.
No comments:
Post a Comment