तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 7 November 2019

हातातोंडाशी आलेला निसर्गाने घास हिरावला, आता जगायचं कसं?होते नव्हते ते सारे संपले 

वाशिम जिल्ह्यात शेतकरी निसर्गापुढे हतबल

शासनाने दिलासा देणे गरजेचे

फुलचंद भगत
वाशिम-यंदा परतीचा पाऊस चांगलाच आक्रमक झाल्याने या पावसाच्या पान्यात शेतकर्‍यांनी रंगवलेली स्वप्नेही वाहुन गेल्याने आता जगावं कसं असा सवाल शेतकरी प्रशासनाला विचारत असुन या समयी शासनाने ठोस ऊपाययोजना करुन शेतकःर्‍यांना मदत करुन दिलासा देणे गरजेचे असल्याचे सामाजीक कार्यकर्ते फुलचंद भगत यांनी मत व्यक्त केले आहे.
          शेतीत यंदा पीक घ्यायचे होते. पण पावसानं सर्व पाणी फेरलंय. कारण परतीच्या पावसामुळे हातातोंडाशी आलेला घासही निसर्गाने हिरावून नेला, शेतात पाणी असल्याने खूप गवत वाढलंय. त्याला दुरूस्त करायला पैसेही नाहीत. काहींचे घरात असलेलं  धान्यही भिजल्यानं ते टाकून द्यावं लागलं. आता जगायचं तरी कसं ? हातात दमडी नाय आण शेतात पीक नाय ?,’’ हे हृदयाला पिळवटून टाकणारे बोल संध्या मंगरुळपीर तालुक्यातील शेतकर्‍यांचे ऐकावयास मिळत असल्याने शासनाला याविषयी पाझर फुटायला हवा असे फुलचंद भगत यांनी सांगीतले. 
 यंदा बहुतांश शेतकर्‍यांना पावसामुळे शेतात पीक घेता आले नाही. काहीजन शेळ्याही पाळून त्यावर गुजराण करीत आहेत. पावसाने यंदा त्यांचे आर्थिक गणितच कोलमडून गेले आहे. घरात असलेले धान्य पाण्याने भिजून गेले.शेतातले सोयाबिन कापुस तर पावसाने भिजुन खराब झाले,मार्केटमध्ये त्या धान्याला विचारायलाही व्यापारी तयार नाहीत.अशातच शासन पंचनामे करत आहेत पण काही ठिकाणी पावसानंतर दहा पंधरा दिवसानंतर अधिकारी पिकनुकसानीचा पंचनामा करन्यासाठी अधिकारी गेले असता शेतकर्‍यांनी याविषयी रोष व्यक्त केला.होते नव्हते पावसाने नेल्याने शेतकरी हतबल झाला असल्याने शासनाने तात्काळ मदत देणे गरजेचे असल्याची मागणी सामाजीक कार्यकर्ते फुलचंद भगत यांनी प्रशासनाकडे केली आहे.

फुलचंद भगत
मंगरूळपीर/वाशिम
मो.8459273206,9763007835

No comments:

Post a Comment