तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 7 November 2019

छात्र भारतीला एक Call, विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम Solve विद्यार्थ्यांच्या हितासाठी छात्र भारती विद्यार्थी संघटनेची 845 400 800 6 हेल्पलाईन सुरु

  बा

ळू राऊत प्रतिनिधी 
मुंबई,:छात्र भारती विद्यार्थी संघटनेच्या वतीने मुंबई विभागासाठी आज विद्यार्थी दिवसाचे औचित्य साधून Student Help Line (845 400 800 6)  ची सुविधा सुरु करण्यात आली. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. सुहास पेडणेकर यांच्या उपस्थितीत ही सुविधा सुरु होत असल्याचे छात्र भारतीचे मुंबई अध्यक्ष रोहीत ढाले यांनी सांगितले.
आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश दिन अर्थात विद्यार्थी दिवस.
छात्र भारती विद्यार्थी संघटना गेली ३७ वर्षे विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरती कार्यरत आहे. मुंबई विभागात काम करत असताना विद्यार्थ्यांना येणाऱ्या समस्या, अडचणी छात्र भारती वेळोवेळी सोडवत आली आहे. परंतु सध्याच्या धावपळीच्या युगात विद्यार्थ्यांना विद्यार्थी संघटनेशी जोडून घेण्यास व आपले प्रश्न सोडवण्यास सहजता यावी यासाठी छात्र भारतीतर्फे ही हेल्पलाईन सुरु केली आहे. महाविद्यालयीन प्रवेश, गुणपत्रिका गोंधळ, फ्री शीप-स्कॉलरशीप प्रश्न, वसतीगृहातील विद्यार्थ्यांच्या समस्या, कॉलेज प्रशासनाकडून होणारा त्रास, विद्यापीठातील अडचणी, करीअर मार्गदर्शन, कॉलेजवयीन मुलींचे प्रश्न, रॅगिंग, अभ्यासात येणारं नैराश्य अशा विद्यार्थ्यांना येणाऱ्या कुठल्याही प्रकारची समस्या असल्यास त्यांनी बिनधास्तपणे कधीही छात्र भारतीच्या 845 400 800 6  या हेल्पलाईनवर संपर्क साधावा. आपल्या सर्व प्रकारच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी छात्र भारती सदैव विद्यार्थ्यांसोबत आहे, असे ढाले यांनी सांगितले. 
या हेल्पलाईनच्या उद्घाटन प्रसंगी छात्र भारती मुंबईचे पदाधिकारी सचिन काकड, विकास पटेकर, दिपाली आंब्रे, मोहन गायकवाड, समीर कांबळे, योगिता साळुंखे हे उपस्थित होते.

No comments:

Post a comment