तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 31 December 2019

परळी पंचायत समितीच्या सभापतीपदी उर्मिला गित्ते तर उपसभापतीपदी बालाजी मुंडे बिनविरोध


परळी वैजनाथ (प्रतिनीधी) :- 
परळी पंचायत समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उर्मिला गित्ते तर उपसभापतीपदी बालाजी मुंडे यांची निवड करण्यात आली.सभापती व उपसभापतीपदासाठी दोघांचेच अर्ज आल्याने या निवडी बिनविरोध पार पडल्या.
 परळी पंचायत समितीचे सभापतीपद ओबीसी प्रवर्गासाठी राखीव होते.एकुण 12 सदस्य असलेल्या परळी पंचायत समिती मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आठ सदस्यासह बहुमत असल्याने ना.धनंजय मुंडे हे कुणाला संधी देतात याकडे लक्ष लागले होते.आज दि.30 डिसेंबर रोजी दुपारी 12 वा.सभापती पदासाठी सुचक सटवाजी फड,अनुमोदक जानिमियॉ कुरेशी यांनी उर्मिला शशिकांत गित्ते यांचा तर उपसभापतीपदासाठी सुचक सुषमा मुंडे,अनुमोदक मिरा तिडके यांनी बालाजी मुंडे यांचा अर्ज दाखल केला.भाजपाचे संख्याबळ कमी असल्याने भाजपा सदस्यांकडून कुठलाही अर्ज दाखल न झाल्याने ही निवड बिनविरोध पार पडली.आजच्या या निवडप्रक्रियेसाठी पीठासन अधिकारी म्हणुन उपजिल्हाधिकारी गणेश महाडीक यांनी काम पाहिले त्यांना गटविकास अधिकारी संजय केंद्रे यांनी सहकार्य केले.

बोरखेडी येथे अखंड हरिनाम सप्ताह व श्रीमद भागवत कथा सोहळासाखरा प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे 


सेनगाव तालुक्यातील बोरखेडी बाळू मामाची येथे दरवर्षी प्रमाने याही वर्षी अखंड हरिनाम सप्ताह व श्रीमदभागवत कथा सोहळा आयोजित केला आहे तरी सर्व भाविक भक्तांनी या सोहळ्याचा लाभ घ्यावा सप्ताह चे दैनंदिन कार्यक्रम पहाटे सकाळी चार ते पाच काकडा भजन पहाटे सहा ते सात श्रीची महापूजा सकाळी सात ते दहा ज्ञानेश्वरी पारायन सकाळी अकरा ते दुपारी चार पर्यंत भागवत कथा सायंकाळी पाच ते सात हरिपाठ व रात्रि आठ ते दहा हरी कीर्तन व नंतर हरीजागर सात दिवस कीर्तन पुढील प्रमाने राहतील दि .1/1/2020/ला श्री ह .भ .प .नागेश महाराज गोडे आळंदी दि 2/1/2020/श्री ह .भ .प .पंढरीनाथ महाराज चाटे जालना दि .3/1/2020/श्री ह .भ .प .संजय महाराज मेहकर दि .4/1/2020/श्री ह .भ .प .शंकर महाराज गारडे गोभणी दि .5/1/2020/श्री .ह .भ .प .सोहम महाराज काकडे बुलढाणा बाल कीर्तनकार दि 6/1/2020/श्री .ह .भ .प .नारायण महाराज पडोळे अमरावती दि  7/1/2020/ह .भ .प .पांडुरंग महाराज समगेकर हिंगोली दि 8/1/2020/रोजी श्री ह .भ .प .विलास महाराज गेजगे गंगाखेड यांचे काल्याचे कीर्तन सकाळी 10/ते 12/वाजे पर्यंत राहील व नंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे दि 7/1/2020/ रोज मंगळवारी दुपारी 12/ वाजता श्री संत बाळू मामा याच्या पालखी सोहळा चे आयोजन केले आहे ज्ञानेश्वरी वाचक श्री ह .भ .प .सुरेश महाराज आळंदी श्रीमंदभागवत वाचक श्री ह .भ .प .भगवान बाबी परिसकर देवी संस्थान माजोड हि परंपरा गेल्या आठ वर्षा पासून सुरू आहे येथे आठही दिवस सकाळ व संध्याकाळ रोजच पंगतीचे आयोजन केले जाते तरी या पंच कोषितिल सर्व भाविक भक्तांनी याचा लाभ घ्यावा आयोजक श्री संत बाळू मामा सेवा भक्त बोरखेडि बाळू मामाची


तेज न्यूज हेड लाईन्स ऑनलाईन वेब वाहिनी 

साखरा प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे

गरीब व गरजू उदयोजक महिलांना छत्री वाटप


बाळू राऊत प्रतिनिधी
घाटकोपर : लुपिन फाउंडेशन सिंधुदुर्ग यांच्या वतीने गरीब व गरजू उद्योजक महिलांना मोफत छत्री माविमच्या संचालिका रितू तावडे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले . नम्रता हॉल , हडपेवाडी स्टॅफ , मालवण येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले . यावेळी उपस्थित महिलांना सीएमआरसी शाश्वत आराखडा बाबत आढावा घेतला व मार्गदर्शन केले . भविष्यात नवतेजस्वीनी मध्ये टिकायचे असेल तर सर्व सीएमआरसी स्वयंसहायता बचत गटाची संख्या वाढवणे व त्यांचे संगोपन गुणवत्ता वाढवणे , बँकामधून वित्त पुरवठा करणे अशा सूचना त्यांनी दिल्या . यावेळी जिल्हा समनवंय अधिकारी नितीन काळे , लुपिन फौंडेशनचे सिंधुदुर्ग प्रकल्प अधिकारी चंद्रकांत म्हापंनकर , या कार्यक्रमाचे संचालन गीता चौकेकर यांनी केले .

राहुल पाठक यांना एल आय सी चा


एम डी आर टी ( अमेरिका) बहुमान

सुभाष मुळे..
----------------
गेवराई, दि. ३१ _ भारतीय जीवन बीमा निगम शाखा बीड मधील श्री. राहुल पाठक यांनी अवघ्या ३ महिन्याच्या कालावधी मध्ये शतकवीर बहुमान प्राप्त केल्यानंतर आता एम डी आर टी ( अमेरिका ) हा विमा क्षेत्रातील जागतिक दर्जाचा बहुमान प्राप्त केल्याबद्दल सर्वस्तरातुन अभिनंदन होत आहे. 
         सन. २०२० चा बहुमान प्राप्त केल्यामुळे राहुल पाठक यांचे विकास अधिकारी श्री. पांढरे सर, शाखाधिकारी श्री पी. यु. परदेशी सर, राऊत सर, केळकर सर यांनी अभिनंदन केले .

╭════════════╮
   ▌प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
 'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                   ╰════════════╯

संग्रामपुर पंचायत समिती सभापतीपदी नंदाताई हागे तर उपसभापति पदी अंबादास चव्हाण अविरोध संग्रामपुर पं स वर भाजपाचा झेंडा कायम


संग्रामपुर [ प्रतिनिधी] येथील पंचायत समिती सभापती व उपसभापती या पदासाठी निवडणूक घेण्यात आली त्या मध्ये सभापती नंदाताई पांडुरंग हागे तर उपसभापती पदी अंबादास केसरसिंग चव्हाण यांची अविरोध निवड करण्यात आली सदर प्रक्रिया शांततेत पार पडली पीठासिन अधिकारी तहसिलदार मुकुंदे हे होते पीठासिन अधिकारी यांच्याकडे सभापती नंदाताई हागे यांचा तर उपसभापती पदासाठी अंबादास केसरसिंग चव्हाण यांचा एकमेव अर्ज होता त्यामुळे सभापती पदी नंदाताई पांडूरंग हागे तर उपसभापतीपदी अंबादास चव्हाण यांची अविरोध निवड झाल्याचे पीठासीन अधिकारी तहसिलदार मुकुंदे यांनी जाहिर केले यावेळी गटविकास अधिकारी चव्हाण यांनी सहकार्य केले यावेळी नवनिर्वाचीत सभापती व उपसभापती यांचे भाजपा पदाधिकारी यांनी गुलपुष्प देऊन स्वागत केले यावेळी जानराव देशमुख, भारत वाघ, पाडुंरंग हागे, सुभाष हागे, ज्ञानदेव भारसाकळे,लोकेशराठी, राजु मुयांडे, राजेन्द्र ठाकरे, गणेश दातीर, श्‍याम आकोटकार, विशाल चांडक, अविनाश धर्माळ, रामदास म्हसाळ, गणेश गांधी, माजी सभापती तुळसाबाई वाघ, उपसभापती, सर्व पंचायत समिती सदस्य उपस्थीत होते

ओल्या दुष्काळी मदत द्या ला शेतकरीची मांगणीसंग्रामपुर [ प्रतिनिधी] तालुक्यातील लाडणापुर भाग२ च्या शेतकऱ्याच्या खात्यात दुष्काळी अनुदानाची अपुरी मदत मिळाल्याने लाडणापुर ,टूनकी येथील शेतकऱ्यांनी जिल्हाधीकारी यांच्याकडे तहसीलदार संग्रामपुर यांच्या मार्फत निवेदनाद्वारे मागणी केली. राज्यात आक्टोंबर -नोव्हेबर मध्ये झालेल्या 'क्यार ' व 'महा ' चक्रीवादळामुळे परतीचा पाऊस लांबणीवर गेल्यामुळे शेतकऱ्याच्या पिकाची नासाळी मोठया प्रमाणात झाली. सोयाबीन, उळीद, मुंग, कापुस, संत्रा, मका व इतर पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले. राज्यात पिक नुकसानीचा सर्वेकरुण ३४ जिल्हयात ओला दुष्काळ राज्यपालानी जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ८००० हजार रुपये तर फळबागाकरीता हेक्टरी १८,००० हजार रुपयाची मदत दोन हेक्टरपर्यत लाभ देण्याचे जाहीर केले .ओल्या दुष्काळात बुलढाना जिल्ह्याचा समावेश आहे. त्यामुळे मदतची पहिला टप्पा सग्रामपुर तालुक्याला २० नोव्हेंबर रोजी ७ कोटी ६२ लाख ४४४० रुपये तहसील कार्यालयावर जमा झाला. तालुक्यातील ३२ गावात ओला दुष्काळी निधी वितरीत करण्यात आला .त्यामधे लाडणापुर भाग २ चा सामवेश आहे.तब्बल महिना भरानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर हेक्टरी चार, पाच तर कोणाच्या खात्यात सहा हजार असे कमी जास्त पिकनिहाय रक्कम टाकण्यात आली. शाशनाकडुन सरसकट हेक्टरी ८,००० हजार रुपयाची मदत जाहिर केल्यानंतर फक्त लाडणापुर भाग २ च्या शेतकऱ्याच्या खात्यात अपुरी मदत टाकण्यात आलेली आहे.शाशणाकडुन आधिच अपुरी मदत शेतकऱ्यांना मिळते, त्यात लाडणापुर भाग२ चा सर्वे करणाऱ्याला कर्मचाऱ्याच्या चुकीमुळे शेतकरी मदतीपासुन वंचीत आहेत. तहसील कार्यालयात याबद्दल माहिती घेतली असता सर्वे करणाऱ्या कर्मचाऱ्याच्या यादी नुसार शेतकऱ्याच्या खात्यात रक्कम जमा केल्याचे सांगत आहेत. जिल्हाधिकारी साहेबांनी यांची दखल घेवून शेतकऱ्यांना शासणाने जाहिर केलेली सरसकट मदत मिळवून देण्याची मागणी शेतकरी करीत आहेत. सदर निवेदनावर विजय हागे, ज्ञानेश्वर बोरकर, रामचंद्र गि-हे, अण्णाराव गुजराथी, मोहन बोदळे, देवमन बोदळे, श्रीकृष्णा अस्वार, रामा कोष्ठी, संदीप गावंडे, चेतन चोरे, वसंता वसुले गणेश तळोकार यांच्यासह  शेतकऱ्याच्या सह्या आहेत. फोटो ,,,, तहसीलदार यांना निवेदन सादर करतांना सरकारी

शिवशाहीने धक्का दिल्याने अॅटो पलटला ; सहा जखमी
परळी वैजनाथ (प्रतिनीधी) :- 
परळीहून नांदेडकडे जात असलेल्या भरधाव वेगातील शिवशाहीने गंगाखेडकडे जात असलेल्या अॅपे अॅटोला पाठिमागुन जोराची धडक दिल्याने अॅटो दोनदा पलटी खावुन बाजुच्या खड्ड्यात पडल्याने सहा जण जखमी झाले असुन जखमींवर परळी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
 परळी ते गंगाखेड दरम्यान प्रवासी वाहतुक करणारा अॅपे अॅटो क्र.एम.एच.22 यु 1561 हा प्रवाशी घेवुन आज दि.31 डिसेंबर रोजी दुपारी 4 वा. गंगाखेडकडे निघाला असता दाऊतपुर फाट्याजवळ पाठिमागुन भरधाव वेगात येत असलेल्या शिवशशाही बस क्र.एम.एच.13 या बसने जोराची धडक दिली यात अॅटोने दोन पलट्या घेवुन बाजुच्या खड्ड्यात पडला.या अपघातात सागर राजाभाऊ मस्के, रा.वसंतनगर ता.परळी,भाग्यश्री गोविंद भोसले रा.आवलगाव,ता.सोनपेठ,कांता महादेव भोसले रा.आवलगाव,ता.सोनपेठ,सुर्यभान राजाभाऊ कदम रा.भिसेगाव,ता.सोनपेठ,केवळबाई कदम रा.भिसेगाव,ता.सोनपेठ,मालनबाई रखमाजी मुंडे रा.वडगाव,ता.परळी हे सहा जण जखमी झाले असुन जखमींवर परळी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.या अॅपे अॅटोला धक्का देवुन शिवशाही चालकाने बस न थांबवता ती तशीच भरधाव वेगात गंगाखेडकडे घेवुन गेला परंतु तेथे काही नागरीकांनी त्या चालकास बससह ताब्यात घेतले.याबाबत पोलिसात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता.

महिलांनी अन्याय दूर करण्यासाठी कायद्याचा आधार घ्यावा - साजिद आरिफ सय्यद
:- महिला सुरक्षा व कायदे या विषयावर जनजागृती कार्यक्रम


  बुलडाणा, दि. 31 :

महिला सुरक्षा सध्या ज्वलंत विषय आहे. आपल्या आजुबाजूला दररोज महिलांवरील अत्याचाराच्या बातम्या येत आहेत.  अन्यायग्रस्त महिलांनी समोर आले पाहिजे. अन्यायाला वाचा फोडण्यासाठी  महिलांच्या मदतीला कायदे आहेत. या कायद्यांचा आधार घेवून महिलांनी अन्याय दूर केला पाहिजे, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सदस्य सचिव तथा दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) साजिद आरिफ सय्यद यांनी आज केले.
   जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय सभागृहात महिला सुरक्षा व कायदे या विषयावर जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा माहिती कार्यालय, बुलडाणा व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, बुलडाणा यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.  याप्रसंगी व्यासपीठावर जिल्हा  वकील संघाचे अध्यक्ष ॲड राजकुमार देवकर, विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव ॲड राहुल दाभाडे, जिल्हा एड्स नियंत्रण समितीचे प्रमुख डॉ. टाले, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सतिष जाधव, जिल्हा माहिती अधिकारी एस. के बावस्कर, माहिती सहाय्यक निलेश तायडे आदी उपस्थित होते.
   ते पुढे म्हणाले, ॲसिड हल्ल्याने पिडीत असलेल्या महिलांसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून मनोधैर्य योजना राबविण्यात येते. अशा महिलांना आर्थिक मदत देण्यात येते. पिडीत महिलांना कायद्याचा आधार देवून त्यांना समाजात मानाने जगण्याची शक्ती देण्यासाठी विधी सेवा प्राधिकरण कार्यरत आहे. 
   जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष श्री. देवकर यावेळी म्हणाले, महिलांसाठी अनेक कायदे आहेत. मात्र महिलांना त्याची माहितीच नाही. या  कायद्यांची पुरेशी जाण तरी महिलांना असावी. अत्याचार होत असलेल्या महिलांनी बाहेर येवून व्यक्त झाले पाहिजे. केवळ आतल्या आत घुसमटून जावू नये. त्यामुळे त्यांच्यावर होत असलेल्या अत्याचार नियंत्रणात येत नाही. समाज सध्या विकृतीकडे जात आहे. बालकांच्या सोबतही समाजातील विकृत व्यक्ती अनैसर्गिक कृत्य करीत आहे. अशा बालकांच्या संरक्षणार्थ पॉस्को कायदा आहे. पॉस्को कायद्यातंर्गत आता फाशीची शिक्षा आहे. 
    जिल्हा वकील संघाचे सचिव ॲड दाभाडे यावेळी म्हणाले, कौटुंबिक हिंसाचार कायद्याचे संरक्षण घेवून महिलांनी अत्याचाराला वाचा फोडावी. हुंड्यासाठी त्रास देणे, पैसे माहेरावरून आणण्यासाठी त्रास देणे, महिलेच्या मनाविरूद्ध सतत कृत्य करीत राहणे आदी अत्याचार होत असल्यास महिलांनी न घाबरता बाहेर येत पोलीस स्टेशनला तक्रार दिली पाहिजे. पोलीस कौटुंबिक हिंसाचार कायद्याअन्वये कारवाई करतात. स्त्रीयांना त्यांच्या अधिकारांविषयी माहिती असावी. 
याप्रसंगी डॉ. टाले म्हणाले, पीसीपीएनडीटी कायदा हा स्त्री भ्रुण हत्या करणाऱ्या दोषींना कडक कारवाई करण्यासाठी उपयोगात आणल्या जातो. समाजाची वंशाला दिवा हवा या मानसिकतेपोटी स्त्री भ्रुणाला गर्भातच मारल्या जातो. त्यामुळे समाजात प्रती हजार पुरषामागे स्त्रीयांची संख्या कमी आहे. आपली संस्कृतीसुद्धा महिलांवरील अत्याचाराला कारणीभूत आहे. त्यामुळे संस्कृती, प्रथा यांना चिकटून बसलेल्या समाजाने आता मानसिकता बदलणे गरजेचे आहे.
  प्रास्ताविक जिल्हा माहिला अधिकारी एस. के बावस्कर यांनी केले. त्यांनी कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका विषद केली. कार्यक्रमाचे संचलन व आभार प्रदर्शन माहिती सहाय्यक निलेश तायडे यांनी केले. कार्यक्रमाला पत्रकार, विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा माहिती कार्यालयाचे सुनील काळे, प्रतिक फुलाडी, अनिल कुरकुटे, राम पाटील, प्रमोद राठोड व ग्रंथालय अधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. 
-----------


बँकांनी कर्जमुक्ती योजनेचा पात्र शेतकऱ्यांना लाभ द्यावा
- जिल्हाधिकारी
• 4 जानेवारीपर्यंत पात्र शेतकऱ्यांच्या याद्या तयार कराव्यात
• शेतकऱ्यांनी बँक खात्याचे आधार क्रमांकाशी संलग्नीकरण करून घ्यावे
  बुलडाणा, दि. 31 : शासन निर्णय 27 डिसेंबर 2019 रोजी जारी होवून महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 जाहीर करण्यात आली आहे. या शासन निर्णयानुसार जिल्ह्यातील बँकांनी पात्र शेतकऱ्यांना महात्मा ज्योतिबा फुले योजनेचा लाभ द्यावा, असे आदेश जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी आज दिले. 
   जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली बँक प्रतिनिधींची बैठक घेण्यात आली. त्यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी  प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे, अप्पर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, जिल्हा अग्रणी बँक व्यवसथापक श्री. मेहेर, जिल्हा उपनिबंधक महेंद्र चव्हाण आदींसह बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.  
   पात्र शेतकऱ्यांच्या याद्या बँक

सन २०१९ हॅट्रीक्समुळे अविस्मरणीय ठरले.


           सर्वप्रथम सर्व वाचकांना नववर्षाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !  सन २०२० हे नवीन वर्ष क्रिकेटच्या मैदानावर नवनवीन चमत्कार दाखवील ही प्रत्येकालाच अपेक्षा असेल. याच सुवर्णमय आशेने आपण क्रिकेट बघणार आहोत. परंतु सन २०१९ या सरत्या वर्षातही अनेक ऐतिहासीक किस्से, घटना व चमत्कार आपण अनुभवले आहेत. परंतु सर्वात चमत्कारीक व सनसनाटी बाब म्हणजे फलंदाज धार्जिण्या या खेळात गोलंदाजांनी हॅट्रीक घेऊन आपला ठसा उमटविला आहे. या सरत्या वर्षात क्रिकेटच्या तिनही प्रारूपात घडलेल्या हॅट्रीक्सवर आपण नजर टाकूया.
            सन २०१९ या वर्षात वनडे, टि -२० व कसोटी या तिनही प्रारूपात मिळून दहा हॅट्रीक झाल्या. त्यात भारताच्या चार गोलंदाजांनी आपला ठसा उमटविला. सन २०१९ या वर्षात कसोटी क्रिकेटमध्ये एकमात्र हॅट्रीक नोंदली गेली, आणि ती नोंदविण्याचा मान मिळविला सनसनाटी भारतीय जलदगती गोलंदाज जसप्रित बुमराह याने. ३१ ऑगष्ट २०१९ रोजी किंग्सस्टन येथे वेस्ट इंडिज विरूध्द डॅरेन ब्राव्हो, सॅमराह ब्रुक्स व रोस्टन चेस यांना सलग तिन चेंडूवर तंबूचा रस्ता दाखवत ऐतिहासीक कामगिरी आपल्या नावे उमटवली.
            एकदिवशीय सामन्यात झालेल्या हॅट्रीक्सवर एक नजर टाकली तर सन २०१९ या वर्षात केवळ तीनच हॅट्रीक्स नोंदल्या गेल्या, आणि विशेष म्हणजे त्यातील दोन हॅट्रीक्स भारतीय गोलंदाजांनी नोंदविल्या आहेत. सन २०१९ च्या विश्वचषक स्पर्धेत भारताच्या मोहम्मद शमीने अफगाणिस्तान विरुद्ध निर्णायक क्षणी हॅट्रीक साधत भारताला विजयी केले. मोहम्मद नबी, अफताब आलम व मुजीब उर रेहमान हे शमीचे बळी ठरले.
          दुसरी हॅट्रीक न्यूझीलंडच्या ट्रेंट बोल्ट याने ऑस्ट्रेलियाविरूध्द साधली. उस्मान ख्वाजा, मिचेल स्टार्क हे त्याचे शिकार ठरले. तर तिसरी हॅट्रीक नुकत्याच संपलेल्या विंडीजच्या भारत दौऱ्यात भारताच्या कुलदिप यादवने केली. शाय होप, जेसन होल्डर व अलझारी जोसेफ त्याच्या जाळ्यात अडकले.
           टि - २० मध्ये एकूण सहा हॅट्रीक सन २०१९ या वर्षात झाल्या. त्यातील पहिली हॅट्रीक अफगाणिस्तानच्या
राशिदखानने आयर्लंडविरूद्ध डेहराडून येथे घेतली. केविन ओ ब्रायन, जॉर्ज डॉकरेल, शेन गेत्केट, सिमी सिंग यांना त्याने बाद केले. त्याची ही हॅट्रीक चार बळींची ठरली.
          लसिथ मलिंगाने न्यूझिलंडविरुद्ध ६ सप्टेंबर १९ रोजी कँडी येथे कॉलीन मनरो, हामिश रूदर फोर्ड, कॉलीन डी ग्रँड होम व रॉस टेलर या चौघांना सलग चेंडूवर माघारी पिटाळत अनोखी हॅट्रीक साधली.
         
       पाकिस्तानच्या मोहम्मद हसनेन लाहोर येथे ५ ऑक्टोबर २०१९ रोजी श्रीलंकेच्या भानुका राजपक्षे, दसून शनाका व शेहान जयसुर्या यांना बाद करत हॅट्रीक साधली.
      ९ ऑक्टोबर २०१९ रोजी खवर अलीने नेदरलँडविरूध्द मस्कट येथे एन्तोनिउस स्ताल,  कोलिन एकर्मन, रोलेफ वन डर मर्व यांना शिकार करत हॅट्रीक कोरली.
       नॉर्मन वनुआ १९ ऑक्टोबर १९ रोजी दुबई येथे बरमुडाविरूध्द दुबई येथे डिऑन स्टॉवेल, कामाऊ लेव्हेरॉकव डिऑन्ट डॅरेल यांना सलग तीन चेंडूवर माघारी पाठविले.
           तर १० नोव्हेंबर १९ रोजी नागपूर येथे भारताच्या दिपक चहरने बांगलादेशच्या शफीऊल इस्लाम, मुस्तफिजूर रेहमान व अमीनूल इस्लाम यांना तांत्रीक रित्या सलग तीन चेंडूवर बाद करत हॅट्रीक घेणाऱ्या गोलंदाजांच्या पंक्तीत स्थान मिळविले.
लेखक : -
दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटरनॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल
 प्रतिनिधी भारत.
Email:  dattavighave@gmail.com
मोबाईल. ९०९६३७२०८२.

वाढोना येथील एक 22वर्षीय तरून मजुराचा विहिरीच्या पाण्यात बुडून मूत्यूसाखरा प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे 


सेनगाव तालुक्यातील वाढोणा येथील एका २२ वर्षी तरुण मजुराचा विहिरीच्या पाण्यात बुडुन मृत्यू झाल्याची घटना रविवारी ता २९ रोजी उघडकीस आली आहे. सेनगाव पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे
 पोलिस सूत्रांनी दिलेली माहितीनुसार तालुक्यातील वाढोणा येथील शिवाजी परसराम तडस वय २२ वर्ष हा मजुरी करून उदरनिर्वाह चालवतो गुरुवारी या २६ रोजी रोडच्या कामांवर तो गेला होता. मात्र घरी परत आला नाही. त्यांच्या कुटुंबीयांनी या बाबत माहिती घेतली असता शिवाजी हा दुपारीच कामावरून गेला. शोधाशोध केली मात्र शोध लागला नाही. रविवारी ता २९ रोजी गावातील कैलास नेव्हल, कैशव नेव्हल हे अफजल देशमुख यांच्या शेतातील विहिरी वरील मोटर काढण्यासाठी गेले होते त्यांना विहिरीतील पाण्यात शिवाजी तरंगत असल्याचे आढळले.मयत मजुराचा भाऊ आत्माराम परसराम तडस यांनी सेनगाव पोलीसात दिलेल्या माहितीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक बाबुराव जाधव व  पोलीस कर्मचार्यानी भेट देऊन तपास सुरू केला आहे


तेज न्यूज हेड लाइन्स ऑनलाईन वेब वाहिनी 

साखरा प्रतिनिधी शिवशंकर निरगुदे

Monday, 30 December 2019

जिल्हा परिषद केंद्रिय कन्या शाळेच्या सहलीचे प्रस्थान
प्रतिनिधी
सोनपेठ:-जिल्हा परिषद केंद्रीय कन्या शाळेच्या चार दिवसीय प्रेक्षणीय स्थळे पाहण्यासाठी सहलीचे दिनांक 30 डिसेंबर 2019 सोमवार रोजी पहाटे 5 वाजता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ एम एच 20 बी एल 4074 व एम एच 20 बी एल 39 60 तसेच क्लुजर रेवन मामा बडे यांच्या वाहनातून 46 मुली 41 मुलं, आचारी ताई, मुख्याध्यापक प्रदीप गायकवाड , शिक्षक राठोड , राऊत तर शिक्षिका जोशी मॅडम, बारगजे मॅडम, डोंगरे मॅडम, माळी मॅडम व म्हात्रे मॅडम आदींना निरोप सर्व पालकांनी दिला याप्रसंगी आरोग्यसेवा साठी दोन किट शालेय व्यवस्थापन समिती केंद्रीय कन्या शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अध्यक्ष तथा संपादक किरण स्वामी व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अध्यक्ष  परमेश्वर पैंजणे यांच्यासह सर्व सदस्य, सदस्यांनी मिळून यादोन्ही कीट मध्ये ओकारी न होण्याच्या, सर्दी, ताप, संडास, पोटदुखी, खोकला, बँन्डेडपट्टी, आयोडिन असे साहित्य गोळ्या औषधी दिलेली आहे. सदरील दोन्ही किट मुख्याध्यापक प्रदीप गायकवाड  व राठोड  यांना ज्येष्ठ पालक वसंतराव लाखे पाटील व मारोतराव यादव यांच्या शुभहस्ते सुपूर्त करण्यात आले या प्रसंगी शाळेचा पदभार पांचाळ  यांना सुपूर्त करून सर्वांना शुभेच्छा ही व्यक्त करण्यात आल्या ही सहल रांजणगाव, वाबळेवाडी, भीमा कोरेगाव, तुळापूर व नारायणपूर पहिला मुक्काम दिनांक 30 डिसेंबर 2019, खंडाळा, महाबळेश्वर, प्रतापगड, महाड व रायगड दुसरा मुक्काम दिनांक 31 डिसेंबर 2019, नवीन वर्ष दिनांक 1 जानेवारी 2020 रायगड ते हरिहरेश्वर तिसरा मुक्काम, हरिहरेश्वर दिवेआगार, मुरुड, जंजिरा, मुळशी व देहू मुक्काम दिनांक 2 जानेवारी 2020, पुरंदर, जेजुरी, राळेगणसिद्धी, नगर-बीड येथुन सोनपेठला परतीचा प्रवास पुढील वर्षी दिनांक 3 जानेवारी 2013 रोजी होणार आहे यावेळी शालेय व्यवस्थापन समिती सर्व सदस्य, सदस्या पालक महिला, पुरुष व नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.या सहलीस माजी जि.प.अध्यक्ष राजेश विटेकर, नुतण सभापती पं.स.सौ.मिराताई जाधव, गट शिक्षणाधिकारी शौकत पठाण , केंद्रप्रमुख गनपत कोटलवार , मुख्याध्यापक किशन रत्नपारखे , शा.व्य.स.अध्यक्ष तथा संपादक किरण स्वामी व परमेश्वर पैंजणे, उपाध्यक्षा, सर्व सदस्य, सदस्या व पालकांनी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.

आंदोलन करा आहिंसेच्या मार्गाने : कासमी


४ देशात अहिंसेच्या मार्गाने आंदोलन ४ कायदा रद्द करण्याची मागणी
परभणी : प्रतिनिधी 
शहरात जमीयत ़उलैमा ए हिंदच्या वतीने २९ डिसेंबर रविवार रोजी सायं. ६.३० वा. सीएए व एनआरसी विरोधात मार्गदर्शनाचा कार्यक्रम शालीमार फंक्शन हॉल,रहेमत नगर परभणी येथे आयोजीत करण्यात आला आहे त्या अनुषंगाने पत्र परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जमियत उलेमाए-हिंदचे जनरल सेक्रेटरी हजरत मौलाना हलीमउल्ला कासमी, अ‍ॅड.फारुखी, अ‍ॅड. जकी एकबाल, जिल्हाध्यक्ष कारी अ.रशीद,मौ.इरफान खान आदी उपस्थित होते. 
सध्या देशात सीएए व एन आरसी च्या माध्यमातून मुस्लीम समाजाला टार्गेट करण्यात येत आहे. या वर नागरीकांना मोलाचे मार्गदर्शन करण्यासाठी जनरल सेक्रेटरी हजरत मौलाना हलीमउल्ला कासमी यांची सभा होणार आहे. यावेळी मौलाना नसरुल्ला हुसैनी नदवी, मौलाना इसा खान काशफी,  आदी उपस्थित राहणार आहेत.  जमीयत उलेमा ए हिंद या संघटनेची स्थापना १९१९ मध्ये करण्यात आली होती. देशाला स्वातंत्र मिळविण्यात या संघटनेचे योगदान आहे. जशा प्रकारे इंग्रजाविरुध्द लढा दिला होता तसाच लढा दे़ण्याची गरज आहे.  बॅरीस्टर जिना यांनी त्यावेळी देशाचे विभाजन केले. एका देशाचे दोन तुकडे केले ज्यांना पाकीस्तानात जायचे होते ते गेले व ज्यांना ़भारतात राहायचे ते इथेच राहीले ज्यांच्या देशाला स्वातंत्र मिळवण्साठी आपल्या प्राणांची आहुती देणाºया समाजाला ़आज आपले नागरीकत्व सि़ध्द करण्यासाठी कागदपत्र मागीतल्या जातआहे. 
म.गांधीजींनी आहिंसेच्या मार्गाने इंग्रजाला देशातून हाकलले आम्हीही गांधीजींच्या मार्गावरच चालून आंदोलनाद्वारे सरकारला जागे करण्याचे काम कले जात ़आहे.सीएए रद्द करण्याची मागणी यावेळी मौ. कासमी यांनी केली. 
पुढे बोलतांना कासमी म्हणाले धर्माच्या नावावर कोणाताही कायदा करता येत नाही भाजप सरकार हिंदु राष्टÑ करण्याच्या तयारीत आहेत.हा मुद्दा केवळ मुस्लीम समजाचा नसून संपुर्ण देशातील नागरीकांचा आहे.सर्वांनाच नागरीकता सिध्द करण्यासाठी आपली कागदपत्रे सादर करावीचलागणार त्यांनाही रांगेत उभेच रहावे लागणार याचा सर्व समाजातील नागरीकांनी विचार करायला हवा. देशाचे गृहमंत्री संसदेत म्हणात एन.आर.सी. आणणारच असे सांगीतले तर पंतप्रधान मोदी म्हणात एनआरसी येणार असे कुणी म्हणले या दोघात तालमेल नस्लयाचे दिसते. हा अन्यायकारक कायदा रद्द करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे.

सात्रळ महाविद्यालयात व्यक्तिमत्व विकासावर तीन दिवसीय कार्यशाळा संपन्न
     सात्रळ / प्रतिनिधी
बाबासाहेब वाघचौरे
      - लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधिने सन्मानीत ) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, सात्रळ, येथे प्लेसमेंट व करियर गाईडन्स सेल यांच्या अंतर्गत तृतीय वर्ष कला वाणिज्य व विज्ञान तसेच द्वीतीय वर्ष एम.कॉम ,व एमएस्सी विद्यार्थांसाठी बारक्ले संस्थेच्या अंतर्गत व रुबीकॉन प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसीय कार्यशाळेचे उद्घाटन मा.श्री धनंजय आहेर ,संचालक स्कील डेव्हलपमेंट व ट्रेनिग अॅण्ड प्लेसमेंट प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था लोणी , मा.प्राचार्या श्रीमती जयश्री सिनगर प्रा.राजेंद्र निंबाळकर यांनी करून उपास्थित विद्यार्थांना मार्गदर्शन केले.

सदर कार्यशाळेसाठी रुबीकॉन प्रा. लि चे मा.तन्वीर शेख व मा.श्री चेतन शिंदे यांनी तीन दिवसीय कार्यशाळेत विद्यार्थांना व्यक्तिमत्व विकास ,मुलाखत तंत्र, व त्यामधील येणाऱ्या सर्व बाबी यावर सादरीकरण करून विद्यार्थांना भावी जीवनात यशस्वी होण्यासाठी रोजगार मिळण्यासाठी व्यवसाय यशस्वी होण्यासाठी प्रात्यक्षिकासह मोलाचे मार्गदर्शन केले.

तसेच या कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी संस्थेचे अतांत्रिक महाविद्यालयाचे संचालक डॉ.एच आर आहेर हे प्रमुख पाहुणे म्हणून हजर होते त्यांनी विद्यार्थांना या कार्यशाळेतून जे अनमोल असे ज्ञान व अनुभव घेतले आहेत त्यांचा आपल्या भावी जीवनात यशस्वी होण्यासाठी उपयोग करावा म्हणजे संस्थेचा ही कार्यशाळा  घेण्यामागील उद्देश सफल होईल असे मार्गदर्शन केले या कार्यक्रमास महाविद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती जयश्री सिनगर अध्यक्षस्थानी होत्या  सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.औटे डी एस यांनी केले व आभार प्रा.पलघडमल व्ही एस यांनी मानले सदर प्रसंगी उपप्राचार्य दिपक घोलप ,महाविद्यालयातील प्राध्यापक , विद्यार्थी विद्यार्थिनी  यांनी हजर राहून सदर मार्गदर्शनाचा लाभ घेतला .

परळी पंचायत समिती सभापतीची सोमवारी निवडी ; धनंजय मुंडे यांना करावी लागणार कसरत

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- परळी पंचायत समितीत १२ सदस्य असुन त्यापैकी आठ सदस्य राष्ट्रवादी.आहेत. सभापती पद ओबीसी प्रवर्गासाठी राखीव आहे. सभापती पदासाठी उर्मिला शशिकांत गित्ते व उपसभापती पदासाठी जानिमियाँ कुरेशी यांची नावे चर्चेत आहे. आता सभापती व उपसभापती निवडीत
आ. धनंजय मुंडे यांची कसरत आहे. बारा पैकी विद्यमान उपसभापती बालाजी मुंडे ,जानिमियाँ कुरेशी,उर्मिला गित्ते, मीरा तिडके, रेणुका फड, सटवाजी फड, सुषमा मुंडे हे सात सदस्य सभापती पदासाठी चर्चेत आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात परळीचं मोठं स्थान आहे. भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादीचे परळी मतदारसंघातील आमदार धनंजय मुंडे यांच्या राजकीय लढाईकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेले असते. सोमवारी परळी पंचायत समिती सभापती पदासाठीची निवडणूक होणार आहे. सभापतीपद ओबीसी पुरुषाला सोडण्यात आले. त्यामुळे आमदार धनंजय मुंडेंसमोर एक कडवे आव्हान उभे ठाकले आहे.

परळी पंचायत समितीवर राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदाच धनंजय मुंडे यांना बळ देत परळी मतदारसंघातील मतदारांनी भरभरून मतं दिली. विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रातला पहिला पॅटर्न सिरसाळा ग्रामपंचायतीमधून समोर आला. महाविकास आघाडीकडून पहिली निवडणूक लढवत ग्रामपंचायत ताब्यात घेऊन राज्यासमोर एक नवीन पॅटर्न ठेवला. परळी पंचायत समिती सभापतीच्या निवडणुका आहेत. परळीची निवडणूक धनंजय मुंडेसाठी प्रतिष्ठेची असते.
 तर दुसरीकडे, एक पुरुष आणि महिला सदस्य या निवडणूक रिंगणात असल्यामुळे धनंजय मुंडेंसमोर एक कडवे आव्हान आहे.

सिरसाळा सर्कलमधून जानी मिया कुरेशी तर टोकवाडी गणातून पिंटू मुंडे आणि नंदागौळ गणातून उर्मिला गीते यांचा समावेश आहे. सध्या सभापतीपदासाठी उर्मिला गीते यांच्या नावाची चर्चा आहे. ग्रामपंचायतपासून ते जिल्हा परिषदेपर्यंत सर्वच स्थानिक स्वराज्य संस्था आमदार धनंजय मुंडे यांच्या ताब्यात आहेत. मतदारसंघातील कोणत्याही जातीचा गट नाराज होऊ नये, याची धनंजय मुंडेंनी कटाक्षाने काळजी घेतली. आता धनंजय मुंडे पंचायत समितीवर कुठल्या समाजाचे नेतृत्व देणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

परळी-धर्मापुरी रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य, प्रवासी ,नागरिक, वाहनचालक वैतागले ; तत्काळ खड्डे बुजवून रस्ता दुरुस्ती करावा- माधव मुंडे

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 
परळी ते धर्मापुरी रस्त्याचे काम मागील वर्षांपूर्वी शासनाचे कोट्यावधी रुपये खर्च करुन पूर्ण केले. या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने रस्त्याचे तीन तेरा वाजले. वाहनचालक, शालेय विद्यार्थी व नागरिकांतून संताप व्यक्त होत केला जात आहे. कामाच्या दर्जाबाबत चौकशी करुन दोषींवर कार्यवाही करण्याची मागणी केली जात आहे. रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडल्याने रस्ता वाहतुकीस धोकादायक बनला आहे तरी सदर खड्डे तात्काळ बुजविण्यात यावे 
अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माधव मुंडे यांनी केली आहे. 

      गेल्या एक वर्षापासून परळी ते धर्मापुरी या २२ किलोमीटर रस्त्याची मोठी दुरावस्था झाली आहे. रस्त्यावर जागोजागी मोठाले खड्डे पडलेले असल्याने या भागातील ग्रामस्थांना प्रशासकीय कामासाठी तालुक्याच्या ठिकाणी जायचे झाल्यास तारेवरची कसरत करत परळी तालुका गाठावे लागत असत. रस्त्याचे काम व्हावे म्हणून अनेकदा नागरिकांनी शासन दरबारी वारंवार निवेदने दिली. तरी संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत आहे. रस्त्याचे काम करताना संबंधित अभियंत्याने गुणवत्तापुर्वक काम करुन घेणे गरजेचे होते मात्र संबंधित ठेकेदाराला अभियंत्याचाच आशिर्वाद मिळाल्याने ठेकेदाराने रस्त्याच्या कामातील तांत्रिक चुका ठेवुन निकष गुंडाळून ठेवले. तसेच अनेक ठिकाणी या रस्त्यावर वळणाच्या ठिकाणी योग्य स्लुप घेतले नाही. दिशादर्शक फलक देखील लावला नाही. यामुळे वाहने सरळ रस्त्याच्या खाली जाऊन अपघात होत आहेत. या रस्त्याला राष्ट्रीय मार्गाचा दर्जा मिळवला आहे. रात्री-बेराञी देखील वाहनाची वर्दळ राहत आहे. मात्र संपूर्ण रस्ताच खराब झाल्याने वाहनधारकांना या रस्त्यावर वाहने आणल्याचा मनस्ताप होत आहे. हा रस्ता लातूर व परभणी जिल्ह्यासह जोडणारा आहे. सध्या या रस्त्याची ओळख निकृष्ट कामाचा उत्कृष्ट नमुना अशी झाली असल्याचे चर्चिले जात आहे.
     परळी ते धर्मापुरी या रस्त्याची दुर्दशा झाली आहे. रस्त्याला मोठमोठे खड्डे पडले आहेत. नागरिक व वाहन धारकांना रस्त्याचा अंदाज न आल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहेत. दुचाकी व चारचाकी वाहन चालकांना खड्डे चुकवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. सध्या रस्त्यावर विविध समस्या निर्माण झाल्या आहेत. याची खबरदारी म्हणून राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून रस्त्यावरील खड्डे तात्काळ बुजवण्याचे काम सुरू करावे असे अनेक वेळा नागरिकांनी तक्रार देऊन आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. आता या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून हा रस्ता जैसे थे झाला आहे. एवढे मोठे बजेट खर्च करुन रस्ता लवकर खराब व्हावा, ही दुर्दैवाची बाब अाहे. रस्त्यावरील खड्डे लवकरात लवकर बुजवावून तत्काळ रस्ता दुरुस्ती करावा, अशी मागणी माधव मुंडे यांनाही केली आहे.

धनंजय पंडितराव मुंडे : आमदार, परळी विधानसभा मतदारसंघराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तरुण ,  फायरब्रँड नेते,  आक्रमक वक्ता त्याउपर एक उत्कृष्ट संघटक असा नावलौकिक असणारे धनंजय मुंडे हे सर्व राज्याला त्यांच्या आक्रमक , हजरजबाबी, सर्वसमावेशक, अभ्यासू वक्तृत्व शैलीमुळे परिचित आहेत. 

 जिल्हा परिषद सदस्य ते राज्याचा मंत्री व्हाया विधानपरिषद विरोधीप क्षनेता असा लांबलचक प्रवास मुडेंनी केला आहे. 

आपले काका दिवंगत नेते गोपीनाथराव मुंडे यांच्या सोबत राजकारणात आलेले धनंजय यांनी प्रत्येक संधीचे सोने करत आपले कर्तृत्व राज्याच्या राजकारणात सिद्ध केले आहे. 

गेल्या 20 वर्षांहून अधिक काळ सक्रिय राजकारणात असलेल्या धनंजय मुंडेंना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विरोधीपक्ष नेता पदाची जबाबदारी दिल्यानंतर त्यांनी तत्कालीन सरकारचे अक्षरशः वाभाडे काढले! सोळा मंत्र्यांचे घोटाळे त्यांनी पुराव्यानिशी बाहेर काढत राज्यासमोर मांडले.
 धनंजय मुंडे हे सत्ताधारी पक्षाच्या मंत्र्यांना सभागृह सोडून जाण्यास भाग पाडणारे ऐतिहासीक विरोधीपक्षनेते ठरले. 

शेतकरी- कष्टकरी वंचित उपेक्षित यांचा आवाज बनलेल्या धनंजय मुंडेंनी मराठा, धनगर, मुस्लिम, लिंगायत आदी समाजाच्या आरक्षण लढ्यात घेतलेल्या सक्रिय सहभागामुळे चांदा ते बांधा लोकप्रियता मिळवलेली आहे. 

पक्षबांधणीमध्ये मोलाचे योगदान करणाऱ्या धनंजय मुंडे यांनी राज्यभर गाजलेल्या हल्लाबोल यात्रा, परिवर्तन यात्रा, शिवस्वराज्य यात्रा अशा सर्वच राजकीय यात्रांमध्ये सरकारविरुद्ध आपला आवाज बुलंद करत तत्कालीन सरकारला सळो की पळो करून  सोडले होते. याशिवाय कोणतीही निवडणूक असो, आघाडीचा उमेदवार म्हटलं की धनंजय मुंडेंच्या सभेची मागणी असे समीकरणच आता बनले आहे!

राज्यभरात आपल्या नेतृत्व गुणांनी जनसामान्यांमध्ये आपली प्रतिमा बनवत असताना स्वतःच्या मतदारसंघावरही मुंडेंची मजबूत पकड होती. थेट लोकांमध्ये जाऊन काम करणे, तगडा जनसंपर्क, कार्यकर्त्यांची मजबूत फळी याच्या जोरावर धनंजय मुंडेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी -  गृहमंत्री अमित शहा  उदयनराजे,  यांच्या सभा विरोधात होऊनही राज्यभर गाजलेल्या परळी विधानसभा निवडणुकीत माजी मंत्री पंकजा मुंडे यांचा तब्बल 32000 मतांनी पराभव केला. 

त्याचबरोबर बीड जिल्ह्यातील 6 पैकी 4 जागांवर पक्षाचे आमदार निवडून आणले आहेत.

 स्वतःची अवघड विधानसभा निवडणूक लढवत असताना राज्यभरात त्यांनी तब्बल 32 मतदारसंघात प्रचार सभा घेतल्या आणि त्यापैकी 22 ठिकाणचे उमेदवार निवडून आले आहेत. 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आश्वासक, तरुण, आक्रमक व अभ्यासू नेता म्हणून धनंजय मुंडे राज्याला परिचित आहेत!

सन 2010 पासून ते विधान परिषद सदस्य आहेत तर मागील 5 वर्षात त्यांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते पद भूषवले. बीड जिल्हा परिषदेचे ते 9 वर्ष सदस्य होते त्यापैकी 2 वर्ष त्यांनी उपाध्यक्ष म्हणून ही काम केले होते.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातही काही काळ त्यांनी उपाध्यक्ष आणि प्रवक्ते म्हणून काम केले. पूर्वीच्या भाजपा या पक्षातही ते युवक आघाडीचे अध्यक्ष होते. 

राज्यातील एक मोठे नेते दिवंगत नेते गोपिनाथराव मुंडे यांचे पुतणे  असूनही धनंजय मुंडे यांना राजकारणात कोणतेच पद त्यांना सहज मिळाले नाही तर जिल्हा परिषद सदस्य ते मंत्री आणि संघटनेत विद्यार्थी आघाडी ते पक्षाचे उपाध्यक्ष अशा प्रत्येक आघाडीवर त्यांनी स्वतःला सिद्ध करून दाखवले आहे. विस्ताराच्या अंतिम टप्प्यात मुंडेंना कॅबिनेट ऐवजी दुसरे एखादे संघटनात्मक पद दिले जाईल अशा बातम्या माध्यमांमध्ये फिरत होत्या, परंतु मुंडेंनी सर्व परिस्थितिला अत्यंत संयमी पद्धतीने हाताळले. काल - परवाच्या हिवाळी अधिवेशनात मुंडेंचे विधानसभेतील पहिले भाषण कायम स्मरणात तर राहीलच परंतु त्यांच्या राजकीय परिपक्वतेचे व पक्षनिष्ठेचे उदाहरण म्हणून अनेकांच्या नोंदीत राहील... 

सत्तास्थापनेच्या घडामोडीत एक महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेले धनंजय मुंडे आज राज्याचे मंत्री म्हणून शपथ ग्रहण करत आहेत.

श्री. धनंजयजी मुंडे यांचा अल्प परिचय (BIODATA)संपुर्ण नांव :- धनंजय पंडितराव मुंडे (विरोधी पक्षनेते महाराष्ट्र विधान परिषद)

जन्म स्थळ:- नाथ्रा, ता. परळी वैजनाथ जि.बीड. (महाराष्ट्र)

जन्म तारीख :- 15 जुलै 1975

शिक्षण :- बी.एस.एल. (बॅचलर ऑफ सोशल लॉ)

प्राथमिक शिक्षण :- न्यु इंग्लीश स्कुल, परळी वैजनाथ जि.बीड.

महाविद्यालयीन शिक्षण :- वैद्यनाथ महाविद्यालय, परळी वैजनाथ
सिम्बॉयसीस कॉलेज, पुणे.
राजकारणात प्रत्यक्ष सहभाग :- 1995 च्या विधानसभा निवडणुकीपासून

ः- भारतीय जनता पार्टीमध्ये भारतीय जनता पार्टी विद्यार्थी आघाडी प्रमुख, भारतीय जनता 

ः- युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष काम केले. 

ः- भारतीय जनता पार्टीत काम करताना विविध यात्रा, कार्यक्रमांचे आयोजक म्हणुन जवाबदारी पार पाडली.

ः- बेरोजगारांच्या प्रश्नांवर दिल्ली, मुंबई, नागपूर, पुणे येथे भव्य मोर्चांचे आयोजन व नेतृत्व.

सन 2001 :- बेरोजगारी व दहशतवाद या विरोधात पाच लाख युवकांचा मोर्चा काढण्यात पुढाकार.

9 ऑगस्ट 2008 :- भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने दिल्ली येथे झालेल्या युवा क्रांती रॅलीत महाराष्ट्रातील 
15 हजार युवकांचे नेतृत्व.

*मार्च 2009 :-* युवकांच्या प्रश्नांसंदर्भात पुणे येथे राज्यव्यापी मेळाव्याचे आयोजन करून युवकांच्या हक्काची सनद प्रसिद्ध केली.

ः- बीड जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणुन 9 वर्ष, उपाध्यक्ष म्हणुन अडीच वर्ष व गटनेते म्हणुन अडीच वर्ष काम पाहिले.

सन 2002 ते 2010 :- पट्टीवडगाव या आपल्या जि.प. गटात 8 वर्षात शंभर कोटींची विकास कामे करून
हा गट विकासाच्या बाबतीत राज्यात आघाडीवर नेला.

सन 2007 ते 2010 :- बीड जिल्हा परिषदेत उपाध्यक्ष म्हणून काम करतांना जिल्ह्याच्या विकासासाठी
कोट्यावधी रूपयांचा विकास निधी आणून जिल्ह्यात विकास कामे केली.
यात पंतप्रधान ग्रामसडक योजना, पाणी पुरवठा योजनांसाठी मोठा निधी उपलब्ध केला.

सन 2003 :- केंद्र सरकारच्या क्रिडा मंत्रालयाच्या वतीने दिल्ली येथे आयोजीत अ‍ॅफ्रो एशियन गेम्सच्या
संयोजन समितीवर निवड.

10 जुन 2010 :- महाराष्ट्र विधान परिषदेवर प्रथम निवड.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष, प्रदेश प्रवक्ते म्हणुन काम पाहिले.

02 जुलै 2013 ः- महाराष्ट्र विधान परिषदेवर दुसर्‍यांदा निवड (राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे)

22 डिसेंबर 2014 ः- महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते म्हणुन निवड

10 जून 2016 ः- महाराष्ट्र विधान परिषदेवर तिसर्‍यांदा निवड

10 जून 2016 ः- महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते म्हणुन दुसर्‍यांदा निवड

सन 2017 ः- दैनिक लोकमतच्या वतीने विधिमंडळातील उत्कृष्ट अभ्यासु वक्ता म्हणुन पुरस्कार

सन 2018 ः- दैनिक लोकमतचा पॉवरफुल राजकारणी म्हणुन पुरस्कार

सन 2019 ः- नाशिक येथील सार्वजनिक वाचनालयाचा मकार्यक्षम आमदारफ पुरस्कार

ऑक्टोंबर 2019 ः- परळी विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून 32 
हजार मतांनी विजय 

*संपर्क :- परळी निवास :*
धनंजय पंडितराव मुंडे,  जगमित्र, अंबाजोगाई रोड,सिंचन भवन समोर, परळी वैजनाथ
जि.बीड (महाराष्ट्र) 431515, दुरध्वनी :02446-223377,225777
(फॅ),02446-225777, मोबाईल : 9850777777
ई-मेल :  officeofdm@gmail.com

संपर्क :- मुंबई निवास:
धनंजय पंडितराव मुंडे, बी-4 निवासस्थान, मंत्रालयासमोर, मादाम कामा रोड, 
मुंबई - 400 032
फोन ः- 022 22820488, 22820399

संपर्क :- मुंबई कार्यालय:

बुलडाणा जिल्हा पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी अरुण जैन, कार्याध्यक्ष चंद्रकांत बर्देबुलडाणा : 29
मराठी पत्रकार परिषद मुंबईशी संलग्नीत बुलडाणा जिल्हा पत्रकार संघाच्या कार्यकारीणीची थेट निवडणूक आज रविवार २९ डिसेंबर रोजी पत्रकार भवनात लोकशाही पध्दतीने पार पडली. मराठी पत्रकार परिषद उपाध्यक्ष राजेंद्र काळे यांचे संकल्पनेतून व मार्गदर्शनात. यावेळी जिल्हा पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष सुधीर चेके पाटील हे अध्यक्षस्थानी होते. तर पिठासीन अधिकारी म्हणून नरेंद्र लांजेवार व सहाय्यक म्हणून रणजीतसिंह राजपूत यांनी काम पाहिले. यावेळी अरुण जैन यांची अध्यक्षपदी अविरोध तर शेवटच्या क्षणी चंद्रकांत बर्दे यांची कार्याध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झाली. तर प्रत्यक्ष निवडणुकीतून नितीन शिरसाट हे सरचिटणीस पदी विजयी झाले.  जिल्हा पत्रकार भवनात दुपारी १.३० वाजता सुरु झालेल्या बैठकीत या निवडणुकीमागची पृष्ठभूमी आरंभी परिषदेचे उपाध्यक्ष राजेंद्र काळे यांनी विस्तृत केली. मग त्यानंतर उपस्थितांनी आपले मत मांडले. ही चर्चा खूप वादळी ठरली. त्यानंतर लोकशाही पध्दतीनेच निवडणूक प्रक्रियेला प्रारंभ झाला.  सहसचिव पदासाठी यशवंत पिंगळे यांची अविरोध  तर राजेश डिडोळकर यांची निवडणुकीतून निवड जाहीर झाली. कोषाध्यक्षपदी अ‍ॅड.हरिदास उंबरकर बिनविरोध जाहीर झाले. जिल्हा पत्रकार संघाच्या उपाध्यक्षपदी युवराज वाघ, विश्वास पाटील आणि प्रशांत देशमुख यांचीदेखील बिनविरोध निवड जाहीर झाली. जिल्हा पत्रकार संघाचे कार्यकारणी सदस्य म्हणून संजय जाधव, निलेश राऊत, नितीन पाटील, सतीशचंद्र रोठे व अनिल उंबरकर यांची निवड करण्यात आली. तर उर्वरित कार्यकारणीच्या निवडीचे अधिकार हे नवनियुक्त अध्यक्षांना यावेळी सर्वानुमते देण्यात आले.  आज रविवार २९ डिसेंबर रोजी दुपारी दीड वाजता सुरु झालेली ही निवडणूक प्रक्रिया सायंकाळी ६ वाजे पर्यंत चालली. १९९६ नंतर पहिल्यांदाच लोकशाही पद्धतीने निवडणूक मराठी पत्रकार परिषदेचे उपाध्यक्ष राजेंद्र काळे यांनी जाहीर केली होती व विशेष म्हणजे ती पुर्णत: पारदर्शकपणे पार पडली, हे येथे उल्लेखनीय! प्रथमच बुलडाणा जिल्हा पत्रकार संघावर १३ तालुका पत्रकार संघांनी सर्वानुमते प्रतिनिधी पाठविले. त्यात बुलडाणा तालुका- महेंद्र बोर्डे, चिखली तालुका- संतोष लोखंडे व मंगेश पळसकर, मेहकर तालुका- रफिक कुरेशी, सिंदखेडराजा तालुका - गजानन काळूसे व गजानन मेहत्रे, दे. राजा तालुका - मुशीरखान कोटकर व सुषमा राऊत, लोणार तालुका- डॉ.अनिल मापारी व उमेश पटोकार, शेगाव तालुका- राजेश चौधरी, जळगाव जामोद तालुका- गुलाबराव इंगळे, संग्रामपूर तालुका- प्रशांत मानकर, मलकापूर तालुका- राजेंद्र वाडेकर, खामगाव तालुका- गजानन कुलकर्णी व किशोर भोसले यांचा समावेश असल्याची माहिती जिल्हा पत्रकार संघाचे प्रसिध्दीप्रमुख अमर राऊत यांनी दिली आहे.जमील पठाण
8805381333

परळीत वीरशैव वधु-वर परिचय मेळावा उत्साहात संपन्न


वधु-वर परिचय मेळावा काळाची गरज-बाबासाहेब कोरे

सामुहिक विवाह सोहळयासाठी सर्वोतोपरी सहकार्य करणार-नगराध्यक्षा सौ.सरोजनीताई हालगे

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 
संस्कारी मुलगा, संस्कारी मुलगी त्या दोघांचे चांगले शिक्षण असलेले स्थळ निवडणे आजच्या काळात अत्यंत अवघड आहे. चांगले स्थळ शोधत असतांना अनेक अडचणींनाही तोंड द्यावे लागते. परंतू वधु-वर परिचय मेळाव्यातून चांगल्या स्थळांचा शोध लागत असल्याने वधु-वर परिचय मेळावे ही काळाची आणि कुटूंबांचा स्थळ शोधण्याचा त्रास कमी करण्यासाठी काळाची गरज आहे असे मत महाराष्ट्र वीरशैव महासभेचे प्रांत अध्यक्ष बाबासाहेब कोरे यांनी व्यक्त केले. दरम्यान परळीत होत असलेल्या सामुहीक विवाह सोहळयासाठी आवश्यक असलेले सहकार्य करूत अशी ग्वाही नगराध्यक्षा सौ.सरोजनीताई हालगे यंानी व्यक्त केली. 

वीरशैव समाज परळी, महाराष्ट्र वीरशैव महासभा पुणे यांच्या माध्यमातून वीरशैव विकास प्रतिष्ठाण परळीच्या वतिने आज रविवार दि.29 डिसेंबर 2019 रोजी शहरात वीरशैव लिंगायत वधु -वर परिचय मेळावा (सर्व पोटजातींसह) श्री गुरूलिंग स्वामी मंदीर (बेलवाडी) येथे अत्यंत उत्साहात पार पडला. 700 पेक्षा अधिक वधु-वरांची नोंदणी या मेळाव्यात करण्यात आली असून समाज बांधवांनी या सेाहळयाला मोठा प्रतिसाद दिला. मेळाव्याच्या प्रारंभी श्री संत गुरूलिंग स्वामी, श्री मन्मथ स्वामी, महात्मा बसवेश्वर यंाच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा सौ.सरोजनीताई सोमनाथअप्पा हालगे तर उदघाटक म्हणून महाराष्ट्र वीरशैव सभेचे अध्यक्ष बाबासाहेब कोरे तसेच प्रमुख पाहुणे म्हणून नायब तहसीलदार सदानंद बरदाळे, मंगलनाथ मल्टीस्टेटचे अध्यक्ष रामेश्वरअप्पा कानडे, स्वच्छता व आरोग्य सभापती अनिल अष्टेकर, रामलिंगअप्पा काटकर, शिवशंकरअप्पा निर्मळे,श्रावणमास तपोनुष्ठान सोहळयाचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते  चेतन सौंदळे, मेळाव्याचे स्वागताध्यक्ष शाहुराव ढोबळे, संयोजक दत्ताप्पा ईटके गुरूजी, विजयकुमार मेनकुदळे, सोमनाथअप्पा हालगे,अध्यक्ष शाम शंकरअप्पा बुद्रे आदी उपस्थित होते. 

यावेळी सर्व मान्यवरांनी वधु-वर परिचय मेळावा आयोजनाचे कौतूक करून दि.12 मे 2020 रोजी सामुदायीक विवाह सोहळा होत असून सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले. वधु वरांनी या मेळाव्यात व्यासपिठावरून आपआपला परिचय करून दिला. 
कार्यक्रम यशस्वीतेसाठी वीरशैव विकास प्रतिष्ठाणचे अध्यक्ष शाम बुद्रे, उपाध्यक्ष शिवकुमार केदारी, सचिव सुधीर फुलारी, सहसचिव विकास हालगे, कोषाध्यक्ष महेश निर्मळे, सदस्य संजय स्वामी, चंद्रकांत उदगीरकर, महादेव ईटके, शिवशंकर झाडे, योगेश मेनकुदळे, आत्मलिंग शेटे, नागेश हालगे आदींसह मेळाव्याचे कार्याध्यक्ष रमेश चौंडे, सदस्य प्रभाकर वेरूळे, रविंद्र नंदीकोले, संजय कोरे, उपाध्यक्षा सौ.सुचिता पोखरकर, सहसचिव सौ.श्रद्धा हालगे आदींसह अनेकांनी विशेष परिश्रम घेतले. दरम्यान परिचय पुस्तिका एक महिन्याच्या आत नोंदणी झालेल्या परिवारासाठी उपलब्ध करून देण्यात येईल असे अध्यक्ष शाम शंकरअप्पा बुद्रे यांनी सांगितले. कार्यक्रमाचे संचलन वैशाली रूईकर व संजय स्वामी यंानी केले. सोमनाथअप्पा हालगे यांनी आपल्या खुमासदार शैलीत उपस्थितांचे आभार मानले. परिचयाचे सुत्रसंचलन वीरशैव समाज महिला मंडळाने अतिशय उत्कृष्ठपणे केले. या मेळाव्याला राज्यभरातून वधु वरांसह पालक उपस्थित होते. मागील काही वर्षात 700 पेक्षा अधिक वधु वरांचे परिचय करून देणारा हा पहिलाच मेळावा ठरला आहे. 

12 मे ला परळीत सामुहीक विवाह सोहळा

वीरशैव समाजाच्या वतिने श्रीक्षेत्र परळी शहरात दि.12 मे 2020 रोजी सामुहीक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला आहे. तपोरत्न पंडितराध्य शिवाचार्य महाराज माजलगांवकर यांच्या प्रेरणेने हा विवाह सोहळा होणार आहे. आजपासूनच या विवाह सोहळयाची तयारी सुरू करण्यात आली असून समाज बांधवांनी आपआपल्य परीने या सोहळयासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. वधु वर परिचय मेळावा पूर्णपणे मोफत करण्यात आला याच पद्धतीने 12 मे रोजी होणारा विवाह सोहळाही नि:शुल्क होणार आहे.

शिवकुमार केदारी यांच्या वॉटसऍप ग्रुपचे कौतुक

आधुनिक पध्दतीने लोकांशी संपर्क साधण्यासाठी वॉटसऍप हे सोशल मिडीयाचे एक चांगले साधन असून या माध्यमातून परळीतील वीरशैव समाजाचे कार्यकर्ते शिवकुमार केदारी यांनी वॉटसऍप ग्रुपच्या माध्यमातून 47 पेक्षा अधिक विवाह जुळविण्याचे काम केले आहे. हा ग्रुप केवळ एवढ्यासाठीच तयार करण्यापासून तो सत्कारणी लावण्याचे काम शिवकुमार केदारी यांनी केले आहे. या आगळया वेगळया व समाज उपयोगी कामाचे आज उपस्थितांनी मनापासून कौतुक केले.

हिंगोली ते धानोरा भंडारी मार्गे बस सेवा सुरू करण्याची मागणी


साखरा  प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे 


सेनगाव तालुक्यातील हिंगोली वरून भंडारी मार्गे बस बंद जाल्याने त्यामुळे या भागातील विध्यार्थीना या भागातील ग्रामस्थांची देखील मोठी गैर सोय होत आहे या मार्गावरील हिंगोली आगाराने हि बस सेवा पुन्हा सुरू करावी अशी केली जात आहे सेनगाव तालुक्यातील हिंगोली ते धानोरा हि बस सेवा भंडारी मार्गे चालू होती मात्र गेल्या चार पाच महिन्यापासून हि बस बंद जाली या मार्गावरील गावे भंडारी होलगीर बिरखेडि खडकी खैरी घुमट सह आदी गावच्या विद्यार्थी व ग्रामस्थांची ये  जा असते या भागातील ग्रामस्थांना तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी एक बस सेवा नाही त्यामुळे ग्रामस्थांना साखरा येथे सात किलोमीटर जाण्यासाठी 20 रुपये देऊन व आपला जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे हिवरखेडा व बोरखेडि येथील विद्यार्थी खडकी येथे शिक्षक घेण्यासाठी जातात मात्र हि बस सेवा बंद जाल्या मुळे या विद्यार्थीना पायपीट करून शाळेत जावे लागत आहे या कडे हिंगोली आगराने लक्ष देऊन या मार्गावरील बस सेवा सुरळीतपणे सुरू करण्यात यावी अशी मागणी या भागातील विध्यार्थी व ग्रामस्थांकडून केली जात आहे

तेज न्यूज हेड लाईन्स ऑनलाईन वेब वाहिनी 

साखरा प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे

वेदांत केसरी संत श्री रंगनाथ महाराज परभणीकर गुरुजी यांचा सुवर्णमहोत्सवी पुण्यस्मरण सोहळा जिंतूरात थाटात संपन्न

--------------------------


----------------
जिंतूर
भागवत कथेची सांगता व कीर्तन महोत्सवाचा समारोप प्रसंगी आज विद्वान कीर्तनकार हभप पुंडलीक महाराज जंगले नगर यांच्या काल्याच्या किर्तनाने झाला
काल्या च महत्व सांगून भक्तांनी परमार्थ आतून तपासावा अस मार्गदर्शन त्यांनी केलं प्रसाद हा भक्तांना च मिळतो कृष्ण भक्तांना सगुण रूपाने देव भेटतो असेही त्यांनी प्रतिपादन केलं

वेदांत केसरी संत श्री रंगनाथ महाराज परभणीकर गुरुजी यांचा सुवर्णमहोत्सवी पुण्यस्मरण सोहळ्या निमित्त जिंतूरात श्री नगरेश्वर मंदिरात दि २२डिसेंबर ते २९डिसें पर्यत आयोजीला होता सात दिवस  हभप समाधान महाराज भोजेकर यांची भागवत कथा आयोजित केली होती
जिंतूर येथील आचार्य महेश महाराज जिंतूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा नियोजन बद्ध सम्पन्न झाला दररोज काकडा आरती ,ज्ञानेश्वरी पारायण गीता पठण,भागवत कथा व हरिपाठ व रात्री कीर्तन आयोजित केले गेले या महोत्सवात हभप सोपान महाराज सानप आळंदी,हभप डॉ सुदाम महाराज पानेगावकर जालना,हभप पांडुरंग महाराज घुले देहू,हभप संजय महाराज धोंडगे त्र्यंबकेश्वर, हभप समाधान महाराज भोजेकर,हभप जयवंत महाराज बोधले पंढरपूर,हभप योगीराज महाराज गोसावी पैठण,तर काल्याचे कीर्तन पुंडलिक महाराज जंगले नगर यांचे दररोज कीर्तन सम्पन्न झाले या  कार्यामुळे शहरातील वातावरण भक्तिमय झालं होतं प्रथम भव्य शोभायात्रा संपन्न झाली या सर्व कार्यात आर्य वैश्य समाज आणि महिला मंडळ युवक मंडळ यांच्या पदाधिकारी समाज बांधवांनी मोठे परिश्रम घेतले या निमित्त महाप्रसाद वाटप करण्यात आला

*काल्याच्या प्रसादाची गोडी*
~~~~~~~~~~~~~
ज्याचेेे चरण सम आहेत तो समचरणाचा देव उच्चनीचता कशाला निर्माण करेल ? त्या देवाच्या चरणीचे भक्त, संत-सत्पुरुष हे कोणीच समाजातल्या विषमतेला मानणारे नाहीत.
गोपालकृष्णांच्या अगोदरपासून ही उच्चनीचता धर्माच्या नावाखाली माणसं मानत आली होती. कृष्णांने सर्व विसकळीत धर्मधारणांना गीतेत सुयोग्यरूप आणि निश्‍चितता दिलीच पण त्यांची प्रात्यक्षिके त्यांनी गोकुळात केली. सर्वांनी एकत्र येऊन एखादी उंच आणि असाध्य गोष्ट प्राप्त करता येते हे त्यांनी ‘दहिहंडी’च्या खेळाने शिकवलं.

यात अगदी वर जाणारा खालच्यांच्यावर त्यांच्या आधाराने जात असतो. त्यामुळे खालचे वरचे एकाच समाजसंस्थेची अभिन्न आणि समान महत्त्वाची अंगे आहेत ही शिकवण देखील खेळता खेळात दिली गेली. तुकाराम महाराजांनी या संकल्पनेला शब्दरूप देऊन म्हटलं,
 ‘विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म। भेदाभेद मळ अमंगळ॥…
तुका म्हणेे एका देहाचे अवयव। सुख दु:ख जीव भोग पावे॥’

शिवाशीव, जातींचा लहान-मोठेपणा हे प्रकार भगवानांनी गोकुळात गोपाल काल्यातल्या गोडीत बुडवून टाकले. सगळ्यांची शिदोरी एकत्र करायची, श्रीकृष्णाने आपल्या हातांनी ती कालवायची आणि द्यायची. प्रत्येकाला अगदी पोटभर काल्याचा प्रसाद मिळायचा. कृष्णदेखील अतिशय आवडीनं मिटक्या मारीत तो खात असे. सगळ्या देवांना वाटलं, ‘यात एवढी काय गोडी असेल ?’ म्हणून ते ब्रह्मदेवाला विचारायला गेले. ब्रह्मदेवाच्या युक्तीनुसार सगळे देव मासे होऊन, जिथे कृष्ण आणि गोपाळ हात धुवत त्या यमुनेच्या काठाजवळ पाण्यात फिरत राहिले. हे जाणून कृष्णानं त्या दिवशी सगळ्या गोप-गोपाळांना सांगितलं की आज आपण पाण्यात हात धुवायचे नाहीत, आपल्या कांबळ्यांना पुसून टाकायचे.

देव मासे होऊन दिवसभर फिरत राहिले पण त्यांना काल्याची गोडी चाखायला मिळाली नाही. समतेची भावना नसेल तर प्रसादाची गोडी मिळणार नाही हे कृष्णानं देवांना शिकविलं. समता म्हणून सभेत विविध घटक एकत्र आले तरी त्याला काल्याची गोडी यायला त्यांच्या एकत्र येण्यामागे प्रेम असलं पाहिजे. सख्या परमेश्‍वराच्या प्रेमाने एकत्र आलेल्यांच्या सख्यप्रेमाची जी गोडी काल्याला असते ती कायद्याने येणारी नव्हे. देवापायी सर्व सम या भावनेतून ती आलेली असते.
निमित्त होते श्री संत रंगनाथ महाराज गुरुजी परभणीकर यांच्या पुण्यस्मरण सोहळ्याचे महाप्रसाद घेण्यासाठी सर्वच जातीजमातीतील भावीक भक्तांना एकाच पंगतीमध्ये बसुन काल्याचा महाप्रसाद खाण्यास मिळाला...

"मी धनंजय पंडितराव मुंडे..." आवाज येताच परळी, बीड सह राज्यभरात जल्लोष!मुंबई (प्रतिनिधी) :- महाविकास आघाडीच्या महाविस्तारातील शपथविधी आज पार पडला. परळी मतदारसंघाचे आमदार धनंजय मुंडे यांनी यावेळी कॅबिनेट मंत्री म्हणून पद व गोपनीयतेची शपथ घेतली. त्यानंतर परळी, बीड सह राज्यात मुंडेंच्या समर्थकांनी व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. 

आज (दि. ३०) महाविकास आघाडी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पार पडला, यामध्ये श्री. अजितदादा पवार,  श्री.अशोकराव चव्हाण, दिलीप वळसे पाटील यांच्यानंतर चार क्रमांकावर धनंजय मुंडे यांनी कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतली.

 जिल्हा परिषद सदस्य ते राज्याचे कॅबिनेट मंत्री म्हणून मुंडेंचा २४ वर्षाचा राजकीय प्रवेश अनेक कारणांनी चर्चेत राहिलेला आहे. 

आज मुंडेंनी "मी धनंजय पंडितराव मुंडे...." अशी शपथ ग्रहण करायला सुरुवात करताच त्यांचा मतदारसंघ असलेल्या परळी येथे अनेक कार्यकर्त्यांनी फटाके फोडून व जयघोष करून आनंद साजरा केला. बीड मध्येही व संपूर्ण राज्यात राष्ट्रवादी भवन समोर कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. 

मुंबई येथे शपथविधी साठी मुंडेंचे हजारो कार्यकर्ते जमले होते, परंतु शपथविधी समारंभासाठी मर्यादित प्रवेशिका असल्याने अनेकांनी टीव्ही स्क्रिनवरच शपथविधीला साक्ष दिली. मुंडे यांच्या ब ४ या शासकीय निवासस्थानी मोठी स्क्रिन लावून समारंभ पाहण्याची सोय करण्यात आली होती. अनेकांनी ही स्वप्नपूर्ती असून मुंडे यांच्या अविरत संघर्ष व कर्तृत्वाचे हे चीज असल्याचे सांगत हा क्षण आपल्यासाठी दिवाळी आहे अशा भावना व्यक्त केल्या. 

शपथविधीला जाण्यापूर्वी...

दरम्यान शपथविधीला जाण्यापूर्वी धनंजय मुंडे यांनी दिवंगत नेते तथा चुलते स्व. गोपीनाथराव मुंडे, वडील स्व.  पंडितराव मुंडे यांच्या प्रतिमांना वंदन करून अभिवादन केले, भगवानबाबा यांच्या प्रतिमेसमोर नतमस्तक झाले. त्याचबरोबर आईचे दर्शन घेऊन आशीर्वादही घेतले. धनंजय मुंडे हे शपथविधी पूर्वी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खा. श्री. शरदचंद्रजी पवार साहेब  यांच्याही भेटीला गेले होते, तेथे पवारांसह त्यांनी सौ. प्रतिभाताई पवार यांचेही आश्रिवाद घेतले. 

हे तर जनतेचे प्रेम

हे मंत्रिपद म्हणजे मतदारसंघातील जनतेचे प्रेम व खा. पवार साहेब यांचे आशीर्वाद असून पक्ष देईल त्या पदाचा भार आपण स्वीकारून  पदाला व महाराष्ट्रातील जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न करू अशा भावना मुंडेंनी व्यक्त केल्या.

सात्रळ महाविद्यालयात पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पा.यांच्या पुण्यतिथी निमित्त कार्यक्रम संपन्न

कार्याबद्दल मार्गदर्शन


सात्रळ/प्रतिनिधी
बाबासाहेब वाघचौरे  -
    डॉ. बाळासाहेब विखे पाटील(पद्मभूषण उपाधिने सन्मानीत ) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, सात्रळ, येथे पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पा. यांचा तृतीय पुण्यतिथी कार्यक्रम आज दि. 30/१२/२०१९ रोजी साजरा करण्यात आला सदर कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून मा. डॉ.राजेंद्र सलालकर ,विभाग प्रमुख मराठी विभाग ,पद्मश्री विखे पाटील महाविद्यालय ,प्रवरानगर, अॅड.आप्पासाहेब दिघे पाटील , माजी सिनेट सदस्य , सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व मा.रमेश पन्हाळे  हे हजर होते व  अध्यक्ष म्हणून मा..अॅड.बाळकृष्ण चोरमुंगे पा.,महाविद्यालय विकास समिती सात्रळ हे होते. सदर प्रसंगी महाविद्यालयाच्या  प्राचार्या श्रीमती जयश्री सिनगर व उपप्राचार्य प्रा.घोलप डी.एन यांच्या हस्ते सर्व उपस्थित पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला.

     सदर पुण्यतिथीनिमित्त महाविद्यालयात वृक्षारोपण, परिसर स्वच्छता ,पोस्टर प्रेसेंटेशन,व प्रमुख अतिथी यांचे पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांचे विचार व कार्य  याबाबत मार्गदर्शन आयोजित केले होते.

प्रमुख पाहुण्यांनी पद्मभूषण साहेब हे शेती , सहकार , शिक्षण , औद्योगिक या क्षेत्राचे मार्गदर्शक होते कारण त्यांना सर्व क्षेत्राचे ज्ञान व दूरद्रुस्टी होती . ते सहकाराचे तत्त्वज्ञानी  होते व पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील यांच्या स्वप्न पूर्ण करण्याचा ध्यास त्यांनी घेतलेला होता  त्यामुळे सामाजिक बांधिलकी हा गुण त्यांच्यात असल्यामुळे ते सर्व समाजाचे आवडते व तारणहार होते . विशेषतः शेतकरी व गरिबांच्या मुलांना न्याय देणारे होते.व फक्त प्रवरा परीसरा पुरते नाही तर भारतात परिचित होते असे सांगून त्यांच्या कार्याच्या आठवणींना उजाळा दिला सदर कार्यक्रमासाठी पाहुण्यांचे स्वागत व प्रास्तविक प्राचार्या प्रा. जयश्री सिनगर यांनी केले व  प्रमुख पाहुण्यांचा परिचय उपप्राचार्य प्रा.घोलप डी एन  यांनी केले  , याप्रसंगी महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेत्तर  सेवक उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  प्रा.सुसर एस आर व केदारे ए एन यांनी व प्रा. सौ.कार्ले सि एस  यांनी आभार मानले .

संताच्या विचारातून जीवनाचे कल्याणघ होईल - मानुरकर महाराज
सुभाष मुळे..
----------------
गेवराई, दि. ३० _ संतांचे विचार अनमोल आहेत आणि ते सत्संगातुन मिळत असतात, त्यांच्या विचाराप्रमाणे आचरण केल्यास जीवन खऱ्या अर्थाने सार्थकी लागेल असे प्रतिपादन श्री.ष. ब्र.१०८ विरुपाक्ष शिवाचार्य महाराज मानूरकर यांनी केले.
            लिंगक्य भावलिंग शिवाचार्य महाराज खळेगावकर यांच्या नवव्या पुण्यस्मरण सोहळ्यात आशीर्वचन देताना ते बोलत होते. श्री.ष. ब्र.१०८ शिवलिंग शिवाचार्य महाराज खळेगावकर यांच्या नेतृत्वाखाली, श्री.ष. ब्र.१०८ प्रभुदेव शिवाचार्य महाराज माढेकर, श्री.ष. ब्र.१०८ विरुपाक्ष शिवाचार्य महाराज मानूरकर व मसाननाथ महाराज चिंतेश्वर संस्थान गेवराई, श्री.भाऊसाहेब महाराज जोशी राजपिंपरीकर, श्री.किसन महाराज आहेर व श्री.कल्याण महाराज गरड यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. पुढे बोलताना विरूपाक्ष शिवाचार्य महाराज म्हणाले की, गुरुंच्या प्रसादामुळे आपल्यातील षडरुपी नष्ट होतात, माणसाला दुःखात देवाची आठवण होते, मनुष्य स्वतःच्या कर्मामुळे घडत असतो, सत्संगातील एखादा विचार आपण आचरणात आणला पाहिजे. पुढे बोलताना शिवलिंग शिवाचार्य महाराज खळेगावकर यांनी गुरुकृपा अत्यंत आवश्यक असल्याचे सांगून भावलिंग शिवाचार्य महाराज त्यागमय जीवन जगले, त्यांच्याकडे सर्वधर्म समभाव होता, गुरूवर श्रद्धा असली पाहिजे, श्रद्धेशिवाय या संसार सागरातून तरून जाता येत नाह असेही ते म्हणाले. याप्रसंगी श्री.मसाननाथ महाराज चिंतेश्वर संस्थान गेवराई म्हणाले की, आज अनीतीच्या मार्गाने संपत्ती कमावली जात असल्यामुळे मनुष्य श्रीमंत होईल परंतु समाधानी होणार नाही. नीतीने मिळवलेल्या पैशात सुख समाधान आहे. सत्संगामुळे जीवन उजागर बनते आपल्यात सद्गुणांची वाढ झाली पाहिजे. अशा सत्संग सतग्रंथातून सदविचार प्राप्त होतात. श्री. भावलिंग शिवाचार्य महाराज वैराग्याची मूर्ती होते. आज धार्मिक क्षेत्रात देखील पैशासाठी स्पर्धा निर्माण झाली ही शोकांतिका आहे. याप्रसंगी श्री.भाऊसाहेब महाराज जोशी म्हणाले की, साधू-संतांचे जीवन त्यागी असते. आपण आज सर्वजण भोगाच्या मागे लागलो आहोत, भावलिंग शिवाचार्य हे साधू होते आणि साधू कोणालाही होता येत नाही  आपण आपला अमूल्य वेळ निरर्थक गोष्टीत न घालवता तो सत्कर्मी सार्थकी लावला पाहिजे, संतांची पुण्यतिथी हा प्रेरणा दिवस असतो.
       अध्यक्षीय समारोप करताना श्री.ष.ब्र.१०८ प्रभूदेव शिवाचार्य महाराज माडेकर म्हणाले की, सत्संगातून सदविचाराची देवाण-घेवाण होते, भजनामुळे शारीरिक व्याधी नष्ट होतात, आपण आपली संस्कृती जपली पाहिजे, या खळेगावला भावलिंग शिवाचार्य महाराज यांच्या सारखा थोर महात्मा मिळाला असून त्यांचे विचार आचरणात आणल्यास आपले जीवन सार्थकी लागेल. आज प्रत्येक घरात सत्संग घडला पाहिजे मनुष्याने अहंकाराचा त्याग केला पाहिजे, संतकृपा झाल्या शिवाय जीवनात सदगती मिळत नाही. लिंगैक्य भावलिंग शिवाचार्य महाराज यांच्या नवव्या पुण्यस्मरणानिमित्त एक दिवसीय ग्रंथराज परमरहस्य पारायण सोहळा, दीपोत्सव व  दिंडी सोहळा संपन्न झाला. महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली. या वर्षी औरंगाबाद येथील श्री. संतोषअप्पा भगवानअप्पा संभेराव यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात गेवराई, औरंगाबाद, बीड, आन्वा, लाडसावंगी तसेच खळेगाव पंचक्रोशीतील असंख्य भाविक भक्त, शिष्यगण पुण्यतिथीला उपस्थित होते. सूत्रसंचालन श्री.वैजनाथअप्पा मिटकर तर प्रास्ताविक डॉ.उमेश राजूरकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिवहर प्रतिष्ठानचे प्रमुख श्री. सुनीलआप्पा संभाहरे व सर्व सदस्यांनी तसेच खळेगाव येथील ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले.

╭════════════╮
   ▌प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
 'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                   ╰════════════╯

पत्नीस तीन तलाक देणाऱ्या आरोपीस तब्बल तीन महिन्यानंतर अटकएक दिवसाची पोलीस कोठडी

 जिंतूर प

जिल्ह्यातील पूर्णा येथील मस्तानपुरा भागात राहणारा शेख अहमद शेख अफसर याने  पत्नीचा शारीरिक-मानसिक छळ करून तीस तीन तलाक देण्याची घटना सप्टेंबर 2019 मध्ये घडली होती या बाबत जिंतूर पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर तो फरार झाला होता तीन महिन्यानंतर जिंतूर पोलिसांनी त्यास सोमवार दि 30 डिसेंबर रोजी अटक करून न्यायमूर्ती समोर हजर केले असता विद्यमान न्यायमूर्तींनी एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली.
 याबाबत अधिक वृत्त असे की जिंतूर येथील राहणार शेख इशरत हिचा विवाह पाच वर्षांपूर्वी पूर्णा शहरातील मस्तानपुरा भागात राहणाऱ्या शेख अहमद शेख अफसर याच्याशी जाते रीतिरिवाजाप्रमाणे झाला होता लग्नानंतर काही काळ चांगले नादवलया नंतर सासरच्या लोकांनी तीस  मूलबाळ होत नाही व दुकान टाकण्यासाठी दहा लाख रुपये घेऊन ये म्हणून सासरच्या बारा लोकांनी छळ चालविला होता याबाबत त्याच्या वडिलांनी पाच लाख रुपये देऊन मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला परंतु राहिलेले पाच लाख रुपये घेऊन ये म्हणून तिचा पती शेख अहेमद शेख अफसर,सासरा शेख अफसर शेख सत्तार,सासू तस्लिम शेख अफसर,नंनद शेख आफ्रिन शेख आतिख,शेख यास्मिन शेख फेरोज,शेख आमरीन शेख फाजील,शेख नाजमीन शेख मुखींद,शेख अफरोज शेख अफसर,सलमा शेख अफरोज,शेख अजहर शेख अफसर  यांनी छळ केला दिनांक 16 सप्टेंबर 2019 रोजी शेख अहमद यांचा विवाह अन्य मुलीशी करून दिि 17 सप्टेंबर राजी त्याचा जाब विचारण्यास पूर्णा येथे गेलेल्या शेख इशरत हिस
शेख अहेमद शेख अफसर याने एकदाच तोंडी तीन तलाक देऊन मारहाण करून हात जाळले होते या बाबत सासरच्या 11 लोकांना परभणी जिल्हा न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला होता परतू नवरा शेख अहेमद हा तीन महिन्या पासून फरार होता त्यास जिंतूर पोलोसानी अटक करून 30 डिसेंबर रोजी न्यायालयापुढे उभे केले असता न्यायमूर्तींनी त्यास एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली

Saturday, 28 December 2019

कौठळीचे डॉ. चंद्रकांत सावंत यांची कनिष्ठ शास्त्रज्ञ म्हणून निवडीबद्दल सरपंच मधुकर झिंजुर्डे यांच्या हस्ते सत्कार

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- तालुक्यातील मौजे कौठळी येथील गावचे सुपुत्र डॉ. चंद्रकांत ग्यानबा सावंत यांची केंद्रीय कृषी विद्यापीठ, इंफाळ ,मणिपूर येथे सहायक प्रधापक तथा कनिष्ठ शात्रज्ञ म्हणून निवड झाली आहे. या निवडीचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे. 

कौठळीचे डॉ. चंद्रकांत ग्यानबा सावंत यांची केंद्रीय कृषी विद्यापीठ, इंफाळ ,मणिपूर येथे सहायक प्रधापक तथा कनिष्ठ शात्रज्ञ म्हणून निवड झाल्याबद्दल ग्रामपंचायत कौठळीच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सरपंच मधुकर झिंजुर्डे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच मधुकर (अण्णा)झिंझुर्डे, उपसरपंच भालचंद्र गुंजकर, सदस्य दत्ता घुले, रंगनाथ केंद्रे.
तसेच इतर ग्रामस्थ गोपाळ शिंगाडे, उमाकांत काटे, अर्जुन सावंत, रुस्तुम जाधव, शिवाजी शिंदे, गंगाराम शिंदे,उद्धव हाके, गोपीनाथ हनवते, गणेश केंद्रे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लक्ष्मीबाई तायडे यांचे हूदय विकाराने निधनसंग्रामपुर [ प्रतिनिधि] तालुक्यातील पातुर्डा बु येथील पिठ गिरणी संचालक मनोज तायडे यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई पुरुषोत्तम तायडे यांचे वयाच्या 64 व्या वर्षी हृदयविकार च्या झटक्याने दि 27 रोजी रात्री 9:30 दुःखद निधन झाले त्यांच्या पश्चात 1 मुलगा,3 मुली,नातू,नातवंडे असा बराच मोठा परिवार आहे

कोद्री येथील गजानन खोंड यांचा हूदयविकाराने निधन 

संग्रामपुर [ प्रतिनिधि] तालुक्यातील कोद्री येथील गजानन शालीग्राम खोंड यांचा हुदयविकाराच्या तिव्र झटक्याने निधन झाले मुत्यू समयी त्यांचे वय ६० वर्ष होते गजानन खोंड यांना अस्वस्थ व छातीत त्रास होत होता त्यांना नातेवाईकांनी पातुर्डा येथील श्रीराम किलीनील खाजगी रुग्णालयात उपचार साठी दाखल केले असता उपचारा पुर्वीच हूदय विकाराचा तिव्र झटका आला डॉक्टर यांनी तपासले असता मृत्यू घोषीत केले  त्यांच्या पश्चात पत्नी, १ मुलगा, १मुलगी आप्त परिवार आहे

परळीत डोळ्यात मिरची पुड टाकुन 95 हजार लंपास
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- डोळ्यात मिरचीची पूड टाकून शहरातील एका प्रसिद्ध व्यापार्‍याचे 95 हजार रुपयाची रक्कम असलेली बॅग दोघा अज्ञात युवकांनी लंपास केल्याची घटना दि. 27 डिसेंबर 2019 रोजी रात्री 8 .45 वाजण्याच्या सुमारास नाथ रोडवर घडली असून या घटनेचा तपास सुरु असल्याची माहिती परळी शहर ठाण्याचे पोलीस निरीक्षक कदम यांनी दिली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. 
          या बाबत प्राप्त माहिती असेकी मोढ्यातील प्रसिद्ध व्यापारी बुद्धराम पवनकुमार अग्रवाल हे आपल्या दुकानाचा नित्यक्रम पूर्ण करून दुकानातील 95 हजार रुपये व व्यवहारातील पट्या एका बॅगमध्ये घेऊन आपल्या स्कुटीने घराकडे निघाले. नाथ रोडवरील असलेल्या आपल्या घराचे गेट उघडून कंम्पोडवॉल मध्ये गाडी लावून घरामध्ये जात असताना स्कुटीवर पाठलाग करत आलेल्या 18 ते 20 वर्षाच्या दोघा अज्ञात युवकांनी अग्रवाल यांच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकून त्यांच्या जवळील 95 हजार रुपये असलेली बॅग घेऊन पोबारा केला. सदरील प्रकारामुळे  व्यापार्‍यांमध्ये एकच खळबळ उडाली असून लुटारूंनी दुकाना पासूनच अग्रवाल यांचा पाठलाग केला असावा पण रस्त्यात कुठेही बॅग हिसकावून घेण्याची संधी न मिळाल्याने अखेर घराच्या  कंम्पोडवॉल मध्ये येऊन अग्रवाल यांच्या डोळ्यात पूड टाकून त्यांनी आपले काम फत्ते केले. वृत्त लिहीपर्यंत याबाबत गुन्हा दाखल झाला नव्हता. 
               नाथ रोड  हा नेहमी गजबजलेला रस्ता असून घटना घडली तेथून जवळच शिवाजी चौक आहे. या रहदारीच्या रस्त्या लगत असलेल्या घराच्या परिसरात हि घटना घडल्याने असे लूटमार करणार्‍यांचे मनोर्धय किती वाढले हे यावरून सिद्ध होत आहे. 31 डिसेंबर अवघ्या तीन दिवसावर आला असून पोलिसांनी आपली गस्त वाढवावी जेणेकरून व्यापारी व नागरिक सुरक्षित राहतील अशी मागणी परळीकरांकडून केली जात आहे.

परळीत बीड जिल्हा ग्रंथालय संघाचे 47 वे वार्षिक अधिवेशनपरळी वैजनाथ (प्रतिनिधी ) :-
बीड जिल्हा ग्रंथालय संघ आणि कै. लक्ष्मणराव शामराव मुंडे सार्वजनिक वाचनालय टोकवाडी तालुका परळी यांच्या संयुक्त विद्यमाने बीड जिल्हा ग्रंथालय संघाचे 47 वे वार्षिक अधिवेशन रविवार दि 29 डिसेंबर 2019 रोजी संपन्न होत असून याचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
        परळी पासून जवळच असलेल्या टोकवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा याठिकाणी रविवारी सकाळी ‌9 वाजता संपन्न होणाऱ्या या अधिवेशनाचे उद्घाटन बालाजी प्रभूराव मुंडे उपसभापती पंचायत समिती परळी तर कार्यक्रमाचे अध्यक्ष सुनील हुसे सहाय्यक ग्रंथालय संचालक औरंगाबाद यांच्या हस्ते होत असून प्रमुख पाहुणे सुभाष मुंडे , डॉक्टर राजाराम मुंडे अध्यक्ष वरद गणेश मंडळ तथा संचालक आनंद हॉस्पिटल परळी, अनिल बाविस्कर , विश्वंभर बराट‌ ग्रामीण कवी, आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
       अधिवेशनाच्या दुसऱ्या सत्रात सार्वजनिक ग्रंथालय समोरील समस्या व उपाय ह्या विषयावर चर्चासत्र होणार असून या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे उद्धव आघाव गंगाखेड, दिपकराव काळे बीड,  गोवर्धनराव मालोजी मुंडे टोकवाडी, नागनाथ आप्पा केचाळे बीड हे राहणार आहेत. तिसऱ्या सत्रात खुले अधिवेशन व समारोप कार्यक्रमाचे अध्यक्ष नरहरी मंठेकर ग्रंथमित्र अध्यक्ष बीड जिल्हा ग्रंथालय संघ बीड हे राहणार आहेत.
       तरी ह्या अधिवेशनास जास्तीत जास्त सहभाग घ्यावा असे आवाहन राजेंद्र सानप उपाध्यक्ष, अनंतराव चाटे ग्रंथमित्र कार्यवाहक, पवन सोमनाथ आप्पा गिरवलकर कोषाध्यक्ष,  राजकुमार धोवरे सहकार्यवाह व संचालक मंडळ बीड जिल्हा ग्रंथालय संघ बीड, डी जी धाकडे, प्रभाकर सानप, चंद्रकांत गायकवाड, प्रकाश सिंग ठाकूर, विजयकुमार पोकळे, वासुदेव गायकवाड, गोवर्धन मुंडे, मिलिंद जोगदंड, रामदास नागरगोजे, शेख इब्राहिम, विश्वंभर गणाचार्य, पद्मराज वैराळे, बलसिंगआप्पा ओपळे, शालीका लव्हारे, योगेश्वरी मुंडे, श्रीहरी कांदे
, आणि सौ गोदावरी राजाराम मुंडे अध्यक्ष व सरपंच टोकवाडी ग्रामपंचायत, अनिता मुंडे, मंगल मुंडे, सोमनाथ संभाजी मुंडे आणि नागनाथ भानुदास पारधे ग्रंथपाल कै लक्ष्मणराव शामराव मुंडे सार्वजनिक वाचनालय टोकवाडी आदींनी केले आहे.

सरसंघचालक मोहनजी भागवत अंबाजोगाईत कार्यक्रमाची तयारी पुर्ण- महोत्सव समितीचे समन्वयक प्रसाददादा चिक्षे


अंबाजोगाई (प्रतिनिधी) :- 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक प.पू.मोहनजी भागवत सोमवार,दि.30 डिसेंबर रोजी अंबाजोगाईत येत असुन प्रसिद्ध इतिहास संशोधक प्रा.डॉ.शरदराव हेबाळकर यांच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्यांची उपस्थिती राहणार असल्याची माहिती महोत्सव समितीचे समन्वयक प्रसाददादा चिक्षे यांनी दिली.दोन दिवसांच्या अमृत महोत्सव कार्यक्रमात विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असुन तत्कालीन समवयस्क संघ प्रचारक यांच्यासाठी शांती यज्ञ केला जाणार असल्याचे त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.दरम्यान यापुर्वी एकदा भागवत हे शहरात आले होते.सरसंघचालक झाल्यानंतर प्रथमच येत असून संघ परिवारात उत्साहाचे वातावरण दिसुन येत आहे ,


प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात प्रसाददादा चिक्षे यांनी म्हटले आहे की,जागतिक किर्तीचे इतिहास संशोधक डॉ. शरदरावजी हेबाळकर यांच्या वयाला 75 वर्षे पुर्ण झाली म्हणुन उत्सव समितीच्या वतीने रविवार,दि.29 आणि सोमवार, दि.30 डिसेंबर रोजी अमृत महोत्सवाचे आयोजन केलेले आहे.डॉ.हेबाळकर हे भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे माजी कार्यवाह आणि खोलेश्वर महाविद्यालयाचे उपप्राचार्य राहिलेले आहेत.संघ प्रणित इतिहास संकलन समितीचे ते केंद्रिय सदस्य ही आहेत.भारतीय हिंदु संस्कृतीच्या प्रसार आणि जनजागृतीसाठी त्यांनी जगाच्या पाठीवर देश आणि परदेशात भ्रमण करून ऐतिहासिक सांस्कृतिक ठेवा जतन करण्यात त्यांनी घेतलेला पुढाकार फार मोठा आहे.हेबाळकर कुटुंबियांचे संपुर्ण आयुष्य हे राष्ट्रभक्तीने प्रेरित असुन समाजोन्नतीच्या मार्गावर जाताना समर्पित भावनेतुन जीवन जगणारे आहे हे लोकांनी पाहिलेलं आहे.संघ कार्यासाठी त्यांचे योगदान अवर्णनीय आहे.इतिहास संशोधनात त्यांच्या कार्याची दखल घेत राष्ट्रीय आणि जागतिक पातळीवर सुद्धा त्यांना अनेक पुरस्कार मिळालेले आहेत.एक आदर्श शिक्षक कसा असावा ? इथपासुन मानवी जीवन,शिस्त आणि संस्कार याचा आदर्श दाखवुन देणारं व्यक्तिमत्व म्हणजे प्रा.हेबाळकर बापु होय.संघ कार्यात सक्रिय असताना तत्कालीन काळात समवयस्कर म्हणुन ज्या लोकांनी योगदान दिले अशा तीस संघ प्रचारकासाठी शांती यज्ञाचे आयोजन करण्यात आले असुन प.पु.यज्ञेश्वर शास्त्री सेलुकर महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली रविवार,दि.29 डिसेंबर रोजी कार्यक्रम होणार आहे.राष्ट्रीय सेविका समितीच्या संचालिका श्रीमती शांताक्का यांची उपस्थिती विशेष असुन कार्यकर्त्यांना मार्गदर्शन लाभणार आहे.स्वयंवर मंगल कार्यालयात आयोजित कार्यक्रमाची सांगता सोमवार, दि.30 डिसेंबर रोजी सायंकाळी 4 वाजता होणार आहे.याप्रसंगी सरसंघचालक मोहनजी भागवत यांची विशेष उपस्थिती असुन ठिकठिकाणावरून येणाऱ्या संघ प्रचारक,कार्यकर्ते व परिवारातील तमाम सहकाऱ्यांना त्यांचं मार्गदर्शन होणार असल्याची माहिती या पत्रकात देण्यात आलेली आहे. इतिहास संशोधनासाठी देशात आणि परदेशात प्रा.शरदराव हेबाळकरांचा झालेला प्रवास, त्यांनी केलेलं लेखन आदी गोष्टी जवळुन पहाता याव्यात म्हणुन या कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.दरम्यान या कार्यक्रमाची शहरात सध्या जोरदार तयारी सुरू आहे.यापुर्वी देखील मोहनजी भागवत अंबाजोगाईत आले आहेत. सरसंघचालक या नात्याने ते दुसऱ्यांदा अंबाजोगाईत येत असुन त्यांच्या बोलण्याकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे. कार्यक्रमाची जय्यत तयारी झाली आहे.

परळीत काँग्रेस पक्षाचा स्थापना दिवस साजरा


परळी वैजनाथ (प्रतिनिधी):-  दिनांक 28/12/2019 रोजी परळी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष अ‍ॅड अनिल मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस पक्षाचा स्थापना दिवस साजरा करण्या आला. 
यावेळी परिसंवाद करतेवेळी अ‍ॅड. अनिल मुंडे आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, काँग्रेस पक्षाने भारत देशाच्या स्वतंत्र्यासाठी अनेक नेत्यांनी चळवळ करून भारत देशाला स्वातंत्र्य मिळवुन दिले. त्यामध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, दादाभाई नौरोजी, मौलाना आझाद, सुभाषचंद्र बोस, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अशा महान नेत्यांनी योगदान दिले असून ज्यांनी आपणाला स्वातंत्र्य निर्माण करून दिले त्याचे आपण त्याचे विचारांचे पालन करावे असे अ‍ॅड. अनिल मुंडे यांनी काँग्रेस पक्ष गाव पासून शहरांमध्ये वाढवण्याचा निर्धार करावा असे मनोगत व्यक्त केले. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रा. एस.एल. देशमुख, अमर देशमुख सर, राहुल देशमुख, ज्येष्ठ नेते बहादुर भाई, गणपत आण्णा कोरे, विश्‍वनाथराव गायकवाड, फरकुंद बेग, शेख शारेक, अल्ताफभाई, लहुदासराव तांदळे, फारूख भाई, भंडे साहेब आदीसह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

भारतीय संविधान हे सर्वोच्च आहे - न्यायमुर्ती सचिन खिरापते


तेजन्यूज हेडलाईन्स प्रतिनिधी
सोनपेठ : भारतीय लोकशाही ही विविध धर्म, संस्कृती, भाषा यांना एकत्रीत घेऊन कायद्याचे राज्य प्रस्थापित करणारी असून कायद्यापुढे सर्व समान असतात, सर्वांना कायद्याचे समान संरक्षण आहे, हक्क व अधिकारांबरोबर कर्तव्याची जाणीव करून देणारे भारतीय संविधान सर्वोच्च असल्याचे मत न्यायमुर्ती सचिन खिरापते यांनी व्यक्त केले. ते संविधान जनजागृती मोहीम कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपात बोलत होते. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून अँड. अमोल गिराम, प्रमुख उपस्थितीत परमेश्वरराव कदम, प्राचार्य डॉ. वसंत सातपुते, प्राचार्य शेख शकिला या मंचावर उपस्थित होते
शहरातील कै. रमेश वरपुडकर महाविद्यालय व  विधि सेवा प्राधिकरण मंडळ परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान जनजागृती मोहीमे अंतर्गत कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमाचे लोकप्रशासन विभागाच्या वतीने आयोजन करण्यात आले होते. जगातील सर्वात मोठी लोकशाही असणाऱ्या विविधतेने नटलेल्या भारतीय समाजाला एकसंध ठेवण्याचे कार्य भारतीय संविधानाने केले असून भारताची एकता व अखंडता संविधानामुळे अबाधित आहे, तसेच अधिकार व हक्कांबरोबरच मुलभुत कर्तव्यांबद्दल नागरिकांनी सतर्क राहील्यास भारत हा जगातील स्वर्ग बनेल असे मत व्यक्त करत यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलताना नागरिकांच्या मुलभुत अकरा कर्तव्यांविषयी समर्पक अशी मांडणी अँड. अमोल गिराम यांनी केली.
अध्यक्षीय समारोपात नागरीकांचे हक्क, अधिकार यांचे रक्षण करताना कायद्याची अंमलबजावणी करणे व नागरिकांना त्यांच्या मुलभुत अधिकारांबद्दल व कायद्याचे राज्य प्रस्थापित करण्यासाठी त्यांचे संरक्षण करणे आवश्यक आहे. भारतात कोणी व्यक्तीविशेष सर्वोच्च नसून भारतीय संविधान सर्वोच्च असल्याचे मत न्यायमुर्ती सचिन खिरापते यांनी व्यक्त केले. कार्यक्रमात अविष्कार संशोधन महोत्सवात प्रथम व द्वितीय क्रमांक मिळवल्याबद्दल विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच संविधान या विषयावर भित्तीपत्रकाचेही विमोचन करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. डॉ. मुक्ता सोमवंशी, प्रास्ताविक प्राचार्य डॉ. वसंत सातपुते तर आभार प्रा. आशोकराव जाधव यांनी मानले. सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व विद्यार्थीनी उपस्थित होते.

परळी झोनमधील सर्व खरेदी केंद्रांवर सोमवार पासुन कापुस पुर्ववत खरेदी केला जाईल -महाराष्ट्र राज्य कापुस पणन महासंघाचे उपाध्यक्ष अ‍ॅड.विष्णुपंत सोळंके व संचालक राजकिशोर मोदी यांची माहिती


(प्रतिनिधी) :- महाराष्ट्र राज्य सहकारी कापुस उत्पादक पणन महासंघाने आत्तापर्यंत 9 लाख 26 हजार क्विंटल कापुस खरेदी केला आहे.त्यापोटी शेतकर्‍यांना तब्बल 250 कोटी रूपये अदा केले आहेत.उर्वरीत 175 कोटी रूपयांचे बिले ही लवकरच अदा करण्यात येणार आहेत.राज्यात पणन,सीसीआय व व्यापारी यांनी मिळून आत्तापर्यंत जवळपास 48 लाख क्विंटलवर कापुस खरेदी केला आहे.सीसीआय व पणन महासंघाकडे कापसाची आवक वाढली आहे.कारण,पाच हजार 550 रूपयांचा चांगला भाव मिळत असल्याने शेतकर्‍यांचा ओढा पणनकडे वाढला आहे. मध्यंतरी अवकाळी वातावरण व काही ठिकाणी पाऊस झाल्याने हे वातावरण निवळेपर्यंत केंद्र बंद ठेवण्याचा निर्णय पणन संघाने घेतला होता.आता पुन्हा पुर्ववत कापुस खरेदी केंद्र सुरू होणार आहेत.परळी झोनमधील सर्व खरेदी केंद्रांवर कापुस खरेदी सोमवार,दि.30 डिसेंबर पासुन केला जाणार असल्याची माहिती राज्य कापुस पणन महासंघाचे उपाध्यक्ष अ‍ॅड. विष्णुपंत सोळंके व संचालक राजकिशोर मोदी यांनी दिली आहे.

पणनमुळे वाढले कापसाचे भाव-उपाध्यक्ष अ‍ॅड.विष्णुपंत सोळंके

सरकीच्या भावात प्रति क्विंटल 300 रूपयांनी वाढ झाल्याने व महाराष्ट्र राज्य सहकारी कापुस उत्पादक पणन महासंघाने कापसाला कापसाला प्रति क्विंटल 5 हजार 550 रूपयांचा चांगला भाव दिल्याने खासगी बाजारातही आता कापसाचे भाव वाढले आहेत.सरकीच्या भावात आणखीन ही वाढ होण्याची शक्यता आहे.खासगी व्यापार्‍यांनी प्रारंभी कमी भावाने कापुस खरेदी केल्याने शेतकर्‍यांचे नुकसान झाले.परंतु, पणन महासंघाने या बाबत तात्काळ खरेदी केंद्र सुरू केल्याने शेतकर्‍यांना दिलासा मिळाला.मध्यंतरी काही भागात पावसाळी वातावरण निर्माण झाले.हे वातावरण निवळेपर्यंत खरेदी बंद ठेवण्याचा निर्णय पणन महासंघाने घेतला होता. आता पुन्हा पुर्ववत कापुस खरेदी केंद्र सुरू होणार आहेत. परळी झोन मधील सर्व खरेदी केंद्रांवर कापुस खरेदी सोमवार, दि.30 डिसेंबर पासुन केला जाणार आहे.यासाठी मी, संचालक राजकिशोर मोदी व संचालक भारत चामले प्रयत्नशील आहोत.


शेतकर्‍यांचे उर्वरीत चुकारे लवकर अदा करणार- संचालक राजकिशोर मोदी

राज्यात आत्तापर्यंत 24 लाख 42 हजार क्विंटलवर कापसाची खरेदी झाली असून पणनने अपवाद वगळता प्रति क्विंटल 5 हजार 550 रूपयांंनी सुमारे 9 लाख 26 हजार क्विंटल कापुस खरेदी केला आहे.शेतकर्‍यांना या खरेदीचे 425 कोटी रूपये चुकारे द्यायचे होते.त्यातील सुमारे 250 कोटी रूपयांचे चुकारे अदा करण्यात आले असून उर्वरीत 175 कोटी रूपयांचे चुकारे ही शेतकर्‍यांना लवकरच अदा केले जातील. त्यासाठी शेतक-यांनी त्यांचे अद्ययावत बँक पासबुक खाते उतारे,आधारकार्ड इत्यादी कागदपत्रे पणन महासंघाकडे देणे आवश्यक आहे.कारण, शेतक-यांना देणे असलेली रक्कम पणन महासंघाकडे उपलब्ध आहे.तसेच पावसाळी वातावरण निवळल्यास सोमवार पासून नव्याने कापुस खरेदी केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. त्यामुळे कापुस उत्पादक शेतकर्‍यांनी घाबरून जाण्याचे कारण नाही.पणन महासंघ शासनाचे सुचनेनुसार कापुस खरेदी करेल.