तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 1 December 2019

अवेळी पावसाच्या नुकसान भरपाई याद्या बॅंकांना पोहचल्या; सोमवारपासून शेतकर्यांना मिळणार रक्कम ! ; परळी तालुक्यात 10 कोटी 76 लाखाचे होणार वाटपपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-      
        जिल्ह्यात अतिवृष्टीचा पाऊस झाल्यामुळे कृषी पिकांचे मोठे नुकसान झाले. यासाठी नुकसान भरपाई शेतकऱ्यांना देणे गरजेचे होते. या अनुषंगाने परळी तालुक्यातील नुकसान भरपाई म्हणून पहिल्या टप्प्यातील निधी मंजूर होउन आलेला आहे. मात्र अद्याप याद्या बॅंकांना पोहचल्या नसल्याने शेतकर्यांना वाटप सुरू झाले नव्हते. या याद्या तहसीलकडून पोहचल्या असून सोमवारपासून विविध बॅंकांमार्फत वाटप सुरू होणार आहे.परळी तालुक्यात 10 कोटी 76 लाखाचे वाटप होणार आहे. 
     जिल्ह्यातील सर्व अकरा तालुक्यांमध्ये अतिवृष्टीच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतक-यांचे नुकसान झाले होते. यासाठी तातडीने पंचनामे करण्याचे आदेश गाव पातळीवरील यंत्रणांना दिले होते. या अनुषंगाने जिल्ह्यातील बाधित क्षेत्र, शेतकऱ्यांची संख्या आणि नुकसान भरपाई देण्यासाठी अपेक्षित निधीची तालुकानिहाय मागणी करण्यात आली. सोयाबीन , कापूस , मका , बाजरी, ज्वारी, तूर, मूग, द्राक्ष , पपई ह्यासह विविध पिके पावसाने हातची गेली व शेतकरी हवालदिल झाले.
    शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्यासाठी शासनस्तरावर घोषणा करण्यात आली. परळी तालुक्यातील नुकसान झालेल्या  शेतकऱ्यांसाठी पहिल्या टप्प्यात10कोटी 76 लक्ष 17 हजार 592 रुपये नुकसान भरपाई निधी मंजूर होउन तो विविध बॅंकांना वर्ग करण्यात आलेला आहे. बर्याच दिवसां पासून इतरत्र शेतकर्यांना या नुकसान भरपाई चे पैसे मिळत होते मात्र परळी तालुक्यातील शेतकर्यांच्या याद्या तहसीलकडून अधिकृतरित्या बॅंकांना पोहचल्या नसल्याने रक्कम वाटप केले जात नसल्याचे पुढे आले होते. तहसील प्रशासनाला याबाबत विचारले असता शेतकर्यांचे खाते क्रमांक संकलन, त्रुटी व अन्य कामे पूर्ण करुन शनिवारी या याद्या संबंधित सर्व बॅंकांना सुपूर्द करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.त्यामुळे सोमवारपासून विविध बॅंकांमार्फत शेतकर्यांना ही रक्कम आपापल्या खात्यात प्राप्त होणार आहे.

पहिल्या टप्प्यात 29 गावाच्या याद्या सुपूर्द.....!
    परळी तालुक्यातील आतापर्यंत 10 कोटी 76 लक्ष 17 हजार 592 रूपये आले आहेत. त्यापैकी तालुक्यातील 108 गावापैकी 29 गावातील शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाईची रक्कम जमा होणार असल्याची माहिती तहसील कार्यालयकडून देण्यात आली आहे.

बॅंकांनिहाय निधीचे वाटप......!
  एचडीएफसी बॅंक - 29200 रु.
 आयडीबीआय बॅंक -1200  रु.
 म.ग्रामीण बॅंक धर्मापुरी -567800 रु.
 महाराष्ट्र बॅंक परळी- 6716720 रु.
 म.ग्रामीण बॅंक परळी -2036720 रु.
म.ग्रामीण बॅंक पोहनेर -1331280 रु.
 इंडिया बॅंक टावर परळी- 4862040 रु.
 इंडिया बॅंक गांधी मार्केट परळी- 3641480रु.
 जि.मध्यवर्ती बॅंक सिरसाळा- 22385760 रु.
जि.मध्यवर्ती बॅंक धर्मापुरी  - 22314200 रु.
 जि.मध्यवर्ती बॅंक परळी - 43090356 रु.

या 29 गावांना होणार वाटप.......!
1.लोणारवाडी       2. इंदिरानगर 
3.लेंडेवाडी            4. डीग्रस 
5. हिवरा गोवर्धन    6.नंदनज - 
7. कासरवाडी        8.कवडगाव घोडा 
9.जयगाव           10.पांगरी  
11.मरळवाडी      12.भिलेगाव  
13. भोपला         14. मालेवाडी 
15. चांदापूर         16. दगडवाडी 
17. देव्हाडा         18.दैठणा घाट  
19.आनंदवाडी      20.नंदागौळ  
21.खो.सावरगाव   22.इंजेगाव 
23.टाकळी देशमुख      24.परचुंडी 
25.वडखेल          26.लाडझरी 
27.संगम             28.कावळ्याचीवाडी 
                          29.वसंतनगर

  ╭════════════╮
   ▌प्रतिनिधी : महादेव गित्ते -
--------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 9403921114
              संपर्क ः- 9623921114
                     ╰════════════

No comments:

Post a comment