तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 8 December 2019

मराठवाडा प्रिमियर लिग क्रिकेट स्पर्धात परळीतील राजाभाऊ पाळवदे 11 या संघाने प्रथम पारितोषिक घेऊन दणदणीत विजय पटकावलापरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- मराठवाडा प्रिमियर लीग अंबाजोगाई येथे क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये राजाभाऊ पाळवदे 11 या संघाने प्रथम पारितोषिक विजेते पद पटकावले आहे. तर द्वितीय पारितोषिक विष्णू मोबाईल शाँपी ओपो या संघाने पटकावले आहे.  सामन्यात राजाभाऊ पाळवदे 11 ने  विष्णू मोबाईल शाँपी ओपो संघावर 7 विकेट राखून दणदणीत विजय मिळवला. परळी तालुक्यातील क्रिकेट प्रेमींनी राजाभाऊ पाळवदे 11 या  संघाचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. 

        अंबाजोगाई येथे 24 डिसेंबर पासून मराठवाडा प्रिमीयर लीग या क्रिकेट स्पर्धा सुरू होत्या.  राजाभाऊ पाळवदे 11 ने  विश्व इंडस्ट्रीज चेअरमन विश्वजित हांडे बाग यांच्या हस्ते नाणेफेक करण्यात आली यावेळी विष्णू मोबाईल शाँपी ओपो चे कर्णधार विष्णू चव्हाण  यांनी प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. निर्धारित 8 ओव्हरची गोलंदाजी करत 7 विकेट अंती 59 धावा काढण्यात आल्या. राजभाऊ पाळवदे 11 या टिमला विजेतेसाठी 60 रण ची आवश्यक होती. या संघाचे प्रथम फलंदाजीसाठी स्वप्निल चाटे, सुधीर शिंदे व नितीन केंद्रे या तिघांनी चांगल्या धावांची खेळी करून संघाला मजबूत स्थितीत आणून ठेवले. राजाभाऊ पाळवदे 11 च्या संघाने विष्णू मोबाईल शाँपी ओपो  संघास 60 धावात विजेते पद पटकावले परंतु विष्णू मोबाईल शाँपी ओपो 59 धावा काढण्यात आल्या होत्या. यामुळे राजाभाऊ पाळवदे 11 ने 60 धावांनी विष्णू मोबाईल शाँपी ओपो संघावर मात केली व घवघवीत यश मिळवले. परळी तालुक्यातील राजभाऊ पाळवदे 11 या टिमने या स्पर्धेत चांगली कामगिरी करीत पहिल्या चार संघामध्ये पात्र होऊन सलग सेमी फायनल मध्ये पण या संघाने विजय मिळविला. मान्यवरांच्या उपस्थितीत 6 डिसेंबर रोजी या स्पर्धेचे मोठ्या उत्साहात वातावरणात बक्षीस वितरण करण्यात आले. यामध्ये प्रथम पारितोषिक 45,045 रूपयांचे पारितोषिक राजभाऊ पाळवदे 11 या टिमने मिळविले तर द्वितीय 21.045 हे पारितोषिक विष्णू मोबाईल शाँपी ओपो या संघाने विजेते पद पटकावले. उत्कृष्ट  खेळाडूंना बक्षीस व स्मृती चिन्ह देण्यात आले. माजी आ.पृथ्वीराज साठे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी, शिक्षण सभापती राजेसाहेब देशमुख, पी.आय. गाढे,  गंभीरे साहेब, डॉ. राजेश इंगोले, दत्ताभाऊ सरवदे यांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण करण्यात आले. उत्कृष्ट गोलंदाज आण्णा काचगुंडे यांना देण्यात आला. मॅन ऑफ द मँच सिमी फायनल नितीन केंद्रे, फायनल मॅन ऑफ द मँच स्वप्नील चाटे तर राजाभाऊ पाळवदे 11 या संघातील सुधीर शिंदे, शैलेश नाईकवाडे, नितीन केंद्रे, स्वप्नील चाटे, दिलीप पवार सर, मुकीद कच्छी, आण्णा काचगुंडे, रत्नाकर गित्ते, लक्ष्मण लहाने, उमा काचगुंडे, संतोष पवार, सुदर्शन घुगे, मारोती गित्ते या सर्वांनी उत्कृष्ट कामगिरी केल्यामुळे विजय प्राप्त केला. सामना जिंकल्या बद्दल परळी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आ.धनंजय मुंडे साहेब, नगरसेवक चंदुलाल बियाणी, निळकंठ चाटे, कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष मुरलीधर मुंडे यांच्या सह सर्व स्तरातून अभिनंदन केले आहे.

No comments:

Post a comment