तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 9 December 2019

परळीतील राजाभाऊ पाळवदे 11 संघाचे निळकंठ चाटे व मुरलीधर मुंडे यांच्या हस्ते सत्कारपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  क्रिकेट हा खेळ अनेकांच्या जिवनाचा भाग झाला आहे, या खेळामुळे भविष्यात मोठी संधी मिळते आणि तो खेळाडू राज्य आणि देश पातळीपर्यत मजल मारतो तर स्पर्धाच्या माध्यमातूनच जिल्ह्यातील खेळाडू घडले आहेत असे प्रतिपादन निळकंठ चाटे यांनी केले तर क्रिकेट स्पर्धाच्या माध्यमातूनच अनेक खेळाडू राज्य आणि देश पातळीवर चांगल्या संधी उपलब्ध झाल्या आहेत असल्याचे मुरलीधर मुंडे यांनी सांगितले. 
तालुक्यातील राजाभाऊ पाळवदे यांच्या पुढाकाराने मराठवाडा प्रिमियर लीग अंबाजोगाई येथे क्रिकेट स्पर्धेत राजभाऊ पाळवदे 11 या संघाने प्रथम पारितोषिक मिळविल्याबद्दल आज दि.08 डिसेंबर रोजी निळकंठ चाटे व कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष मुरलीधर मुंडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 
           अंबाजोगाई येथे मराठवाडा प्रिमियर लीग, क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये राजाभाऊ पाळवदे 11 या संघाने प्रथम पारितोषिक विजेते पद पटकावले आहे. तर द्वितीय पारितोषिक विष्णू मोबाईल शाँपी ओपो या संघाने पटकावले आहे.  सामन्यात राजाभाऊ पाळवदे 11 ने  विष्णू मोबाईल शाँपी ओपो संघावर 7 विकेट राखून दणदणीत विजय मिळवला. यामध्ये प्रथम पारितोषिक 45,045 रूपयांचे पारितोषिक राजभाऊ पाळवदे 11 या टिमने मिळविले तर द्वितीय 21.045 हे पारितोषिक विष्णू मोबाईल शाँपी ओपो या संघाने विजेते पद पटकावले. आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले. त्यामुळे परळी तालुक्याला बहुमानाचा मान मिळाला आहे. त्याबद्दल युवा नेते निळकंठ चाटे व मुरलीधर मुंडे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन गौरव व सत्कार करण्यात आला. यावेळी राजाभाऊ पाळवदे, सुधीर शिंदे, शैलेश नाईकवाडे, नितीन केंद्रे, स्वप्नील चाटे, दिलीप पवार सर, मुकीद कच्छी, आण्णा काचगुंडे, रत्नाकर गित्ते, लक्ष्मण लहाने, आदी उपस्थित होते.  परळी शहराची खरी ओळख शैक्षणिक, साहित्यिक, सांस्कृतिक क्षेत्रामुळे होती, याबरोबरच आता क्रिकेटपटूंनी उल्लेखनिय काम केल्यामुळे त्यांनी परळी तालुक्याला मानाचा तुरा मिळाल्यामुळे  ही ओळख सबंध महाराष्ट्रभर झाली आहे. या उल्लेखनिय काम करणार्‍या संघामधील खेळंडुचा गौरव म्हणजे सर्वांना प्रोत्साहन मिळेल असे त्यांनी निळकंठ चाटे यांनी सांगितले. ग्रामीण विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबरच खेळ खेळण्यासाठी प्रोत्साहन देण्याची गरज आहे. खेळाकडे करीअर म्हणून पाहण्याचा दृष्टिकोन पालकांनी ठेवला पाहिजे, मुलांमध्ये खेळासंबंधी विश्‍वास निर्माण झाला तरच मुले मैदानावर जाऊन खेळ खेळतील
पालक आणि विद्यार्थ्यांनी आपली मानसिकता बदलून क्रीडा क्षेत्रात करीअर घडविण्यासाठी परिश्रम घ्यावेत. खेळामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगिन विकास होत असल्याचे कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष मुरलीधर मुंडे त्यांनी यावेळी सांगितले.

No comments:

Post a comment