तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 1 December 2019

जागतिक दिव्यांग दिनानिमित्त " प्रश्न तुमचे,उत्तर आमचे " उपक्रमाचे आयोजन - राजेंद्र लाड


 बाळू राऊत प्रतिनिधी 
    मुंबई (आष्टी)  शासन मान्यता प्राप्त महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी संघटना शाखा बीड च्या वतिने जिल्ह्यातील दिव्यांग बंधू - भगिनींना दिव्यांग हितार्थ असलेल्या विविध दिव्यांग योजनांविषयी दि.३ डिसेंबर २०१९ रोजी जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून " प्रश्न तुमचे,उत्तर आमचे " या उपक्रमांतर्गत सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत जिल्ह्यातील दिव्यांग कर्मचारी संघटनेचे जिल्हा व तालुका पदाधिकारी दिव्यांग बांधवांना योग्य मार्गदर्शन करणार आहेत.अशी माहिती  शासन मान्य दिव्यांग कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र लाड यांनी दिली आहे.
       पुढे असेही म्हटले आहे की,जिल्ह्यातील दिव्यांग कर्मचारी,दिव्यांग सुशिक्षित बेरोजगार,दिव्यांग विद्यार्थी,दिव्यांग जेष्ठ नागरिक बंधू - भगिंनी यांच्यासाठी शासनस्तरावर असलेल्या दिव्यांग हितार्थ वेगवेगळ्या योजनांची माहिती जसे की,दिव्यांग आँनलाईन प्रमाणपत्र,दिव्यांग वैश़्विक ओळखपत्र ( युडीआयडी कार्ड ),दिव्यांगत्वाचे २१ प्रकार,दिव्यांग कायदा २०१६,दिव्यांगांचे नोकरीतील आरक्षण ,दिव्यांग शिष्यवृत्ती,बीज भांडवल योजना,दिव्यांग व्यक्तींने सुदृढ व्यक्तीसोबत विवाह केल्याबद्दल सानुगृह अनुदान योजना,विशेष समाजकल्याण मार्फत व्यावसायिक कर्ज प्रकरणे,दिव्यांग ५ टक्के निधी विनियोग,दिव्यांग घरकुल योजना,दिव्यांग कर्मचारी वाहनभत्ता,दिव्यांग कर्मचारी इन्कम टॕक्स माफी संदर्भात शासन निर्णय,व्यावसायकर माफ,दिव्यांग कर्मचारी दिव्यांगत्व प्रमाणपत्राची फेरतपासणी,कृत्रिम अवयव,सहाय्यक उपकरणे,मोफत दिव्यांग तपासणी शिबीर,दिव्यांग विद्यार्थी परिक्षा संदर्भातील शासन निर्णय,सर्व शिक्षा अभियांनातर्गत असलेल्या विविध योजना,विविध स्तरावरील दिव्यांग मतदार नोंदणी,विविध दिव्यांग थेरेपी,समावेशित शिक्षणाकडून शिक्षणाकडे आदी योजना बाबत सखोल मार्गदर्शन केले जाणार आहे.
       तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांना शालेय शैक्षणिक साहित्य व दिव्यांग सुशिक्षित बेरोजगार यांना आवश्यकतेनुसार तन,मन,धनाने मदत व सरकारी दवाखान्यातील वैद्यकीय सेवा घेणाऱ्या रुग्णांना फळे वाटप केली जाणार आहेत.
       यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात संघटनेचे तालुकाध्यक्ष व त्यांचे सर्व तालुका पदाधिकारी आपआपल्या तालुक्यात दिव्यांग हितार्थ वेगवेगळे उपक्रम राबविणार असून वेगवेगळ्या योजनांविषयी दिव्यांग बांधवांना मार्गदर्शन करणार आहेत.
         तरी बीड जिल्ह्यातील दिव्यांग कर्मचारी,सुशिक्षित बेरोजगार,दिव्यांग विद्यार्थी व दिव्यांग जेष्ठ नागरिक बंधू - भगिनींनी सदरील मार्गदर्शनाचा मोठ्या प्रमाणात फायदा घ्यावा.असे आवाहन प्रदेश उपाध्यक्ष महादेव सरवदे,जिल्हाध्यक्ष राजेंद्र लाड,जिल्हा सचिव इंद्रजित डांगे,सहसचिव मधुकर अंबाड,कोषाध्यक्ष अर्जुन बडे,उपाध्यक्ष पुंडलीक पाटील,नंदकिशोर मोरे,बाळासाहेब सोनसळे,सिद्धेश्वर शेंडगे,बाळासाहेब कांबळे,दत्तात्रय गाडेकर,शेषराव सानप,महिला प्रतिनिधी संजिवनी गायकवाड यांनी केले असून ज्या दिव्यांग बांधवांना योजनांविषयी काही अडीअडचणी असतील तर जिल्हाध्यक्ष राजेंद्र लाड यांच्या ९४२३१७०८८५,८६६८४७९१९२ या भ्रमणध्वनीवर मिस काँल करावा किंवा व्हाँटस्अप वर मेसेज करावा असेही शेवटी म्हटले आहे.

No comments:

Post a comment