तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 3 December 2019

कांद्यानी केली सफरचंदची बरोबरी ; लसुन,अदरक तुरदाळीला भारीपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- परळी शहरात कांद्याने उसळी घेतली असुन सफरचंदच्या एका किलोच्या भावा बरोबर कांदा विकला जात असुन लसुन, अदरकाच्या भावाने सुध्दा उच्चांकी गाठली आहे तर गरीबांच्या रोजच्या जेवणातली असणारी तुरदाळीचा भाव 90ते95रू.किलोवर गेला आहे .सदर भाववाढीने सर्वसामान गोरगरीब कष्टकरी जनता त्रस्त झाली असुन या भाववाढीवर सरकारने नियत्रंण ठेवावे अशी मागणी नागरिकातुन होत आहे.

महाराष्ट्रात आलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची अनेक पिके जमीन दोस्त होवुन त्यांचे अतोनात नुकसान झाले शासनतार्फे नुकसानीचे पंचनामे होत असुन शेतकऱ्यानां नुकसान भरपाई शासन देणार आहे व ती दिलीच पाहीजे या साठी राज्यातील जनतासुध्दा शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे मात्र आज  घडीला परळी शहरात कांदे 80रू.प्रती किलोने विकले जात आहे तर त्याच  भावात सफरचंदची विक्री होत आहे.तर
लसुन प्रती किलो 160ते180रू व अदरक प्रती किलो 120 ते 160रू.असी विक्री होत आहे. 
गोरगरीब,कष्टकरीच्या जेवणातील एक घटक असलेल्या तुरदाळीचा भाव प्रती किलो 90 ते 95 रू.इतका वाढला असुन या भाव वाढीने सर्वसामान्य जनता त्रस्त झाली असुन या भाववाढीवर शासनाने नियत्रंन ठेवुन आटोक्यात आणावी अशी मागणी नागरिकातुंन होत आहे.
तसेच कांदा,लसुन,अदरक व तुरदाळची  भाववाढ बाजारात झाली तर त्याचा थेट फायदा बळीराजाच्या पदरात पोहचतो का? या बाजारातील मक्तेदारी असलेले दलाल यांच्या घशात जातो याचा सुध्दा विचार शासनाने करावा व उत्पादकाला 
त्याच्या उत्पादनांला चार पैसे जर जादा मिळत असेल तर मधील दलाल पध्दती  बंद करावी तरच शेतकरी बांधवानां आपला मालाच्या विक्रीचा अधिकार मिळेल व सर्वसामान्य,कष्टकरीनां योग्य दरात मिळेल,ते ही सबंधीत शासनाची इच्छा शक्ति असले तरच, म्हणुन हि भुमिका शासनाने घ्यावी अशी मागणी जर महागाईने त्रस्त जनता करीत असेल तर ती योग्यच म्हणावी लागेल.

No comments:

Post a comment