परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- येथील दि ग्रेट पंजाब रेस्टॉरंटचे मालक बलजिंदर भाटिया उर्फ जिंकू भाटिया यांचे आज पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले.
तेलंगणा राज्यातील हैदराबाद येथे हॉटेल व्यवसायानिमित्त स्थायिक झालेले जिंकू भाटिया (वय 44 वर्षे) यांना आज रविवारी पहाटे आलेल्या हृदयविकाराच्या तिव्र झटक्याने त्यांचे दुःखद निधन झाले. त्यांचे शालेय शिक्षण परळी येथे झाल्यामुळे व त्यांच्या हसतमुख आणि बोलक्या स्वभावामुळे शहरात त्यांचा मोठा मित्र परिवार होता.
त्यांच्या पश्चात आई, पत्नी, तीन भावंडे, एक मुलगा, एक मुलगी, दोन बहिणी असा मोठा परिवार आहे. आज संध्याकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
No comments:
Post a Comment